जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महाद्युतिम्
तमोरिं सर्व पापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्।।1
जसे कुसुम जास्वंदी । रक्तवर्णी तसा रवी
अंधार दूर सारी हा। पापहारीच सर्वही।।
कश्यपाच्याच पुत्रासी । तेजस्वी भास्करास मी
प्रणाम करितो भावे। प्रातःकाळीच नित्यही।।1
----------------------------------------------
दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णव सम्भवम्।
नमामि शशिनं सोमं शभोर्मुकुट भूषणम्।।2
दही शंख हिमाजैसा। शुभ्र शीतल चंद्रमा
सागरातून ये जन्मा । मस्तकी शोभतो शिवा।।
सुखवी भूतमात्रांसी। जीववी औषधींस ही
नमस्कार असो माझा। चंद्रासी शुभलक्षणी।।2
धरणीगर्भसंभूतं विद्युत्कांति समप्रभम्।
प्रियङ्गुकलिकाश्यामं रूपेणाप्रतिमम् बुधम्
सौम्यं सौम्य गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् ।।4
असे श्यामल तेजस्वी। प्रियंगुच्या कळी परी
रूपवान मनोवेधी। देखणा अप्रतीमची।।
सौम्य शांत असे भारी । गुणसंपन्न तोषवी
मृदु मृदुल सर्वांसी। बुध तो नमितोच मी।।4
देवानां च ऋषिणां च गुरुं काञ्चनसन्निभम्।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्।।5
सुवर्ण वर्ण तेजस्वी । प्रज्ञाभास्कर एकची
देव आणि ऋषी यासी । गुरू मानून वंदिती।।
बुद्धिचा हा असे स्वामी । गुरूग्रह सुधामयी
त्रैलोक्याचा असे राणा । वंदितो मी बृहस्पती।।5
---------------------------------------------------
हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम्
सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्।।6
अंगकांतीच शुक्राची। कुंदपुष्प हिमापरी
पराग जणु पद्माचा। ऐसा कोमल मानसी।।
दानवांचा गुरू ऐसी । कीर्ति ज्याचीच जाहली
शास्त्रवेत्त्याच शुक्रासी। आदरे नमितोच मी।।6
------------------------------------------
नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्
छायामार्तंडसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्।।7
झोंबे चुरचुरे भारी । काळ्या त्या अंजनापरी
भेदून जाई पृथ्वीसी । देई दृष्टी अशी परी ।। 7.1
सामान्यांसी दिसे ना जे । दाखवी सत्य ते भले
मोठा भाऊ यमाचा हा । नीलांजनसमा असे ।। 7.2
सावली आणि सूर्याचा । पुत्र चाले धिमे धिमे
शनी देवास त्या माझे । नित्य वंदन मी करे ।। 7.3
---------------------------------------------------
अर्धकायं महावीर्यं चद्रादित्यविमर्दनम्
सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम्।।8
ग्रासीतो सूर्य चंद्रासी। अर्धकाया-स्वरूपची
गर्भातून जन्मा ये । सिंहिकेच्या महाबळी
दैत्यराजचि राहूसी। प्रणाम करितोच मी।।8
---------------------------------------------------
पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रहमस्तकम्।
रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् ।।9
पळसाच्या फुलाजैसी। अंगकांतीच केतुची
ग्रह मस्तकरूपी हा। तारका शोभते शिरी ।। 9.1।।
भीतीदायक केतु हा । दिसे रौद्र भयंकरी
नमस्कार असो माझा । केतुसी वरचेवरी ।।9.2।।
पृथ्वी स्थिर आहे असं काही काळासाठी गृहीत धरलं तर सूर्य पृथ्वीभोवती ज्या लंबगोल मार्गाने फिरतो ते प्रतल (ecliptic plane) आणि चंद्र पृथ्वीभोवती ज्या मार्गाने फिरतो ते प्रतल ह्यांच्यामधे 5.14 अंशाचा फरक असतो म्हणजेच 5.14 अंशाचा कोन असतो. ही प्रतलं ज्या दोन काल्पनिक बिंदूंमधे एकमकांना छेदतात ते राहू आणि केतू. (lunar nodes.) आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार्या चंद्राच्या ascending node ला राहू म्हणतात तर चंद्राच्या उत्तरेकडून दक्षिणेकडच्या descending node ला केतू म्हणतात.


इति व्यासमुखोद्गीतं यः पठेत् सुसमाहित: ।
दिवा वा यदि वा रात्रौ विघ्नशांतिर्भविष्यति।।10
गाईले स्तोत्र व्यासांनी । म्हणे जो हात जोडुनी
दिवसा अथवा रात्री । संकटे ना तयावरी।।10
नरनारीनृपाणां च भवेद्दुःस्वप्ननाशनम्
ऐश्वर्यमतुलं तेषामारोग्यं पुष्टिवर्धनम्।।11
नर नारी नृपांच्याही । क्लेशकारी भयंकरी
दुःखदायीच स्वप्नांचा । नाश होतोचि सत्वरी
ऐश्वर्य लाभते मोठे। आरोग्य मनुजासही
तुष्टि,पुष्टि मनोशक्ति। लाभते सर्व सर्व ही।।11
ग्रहनक्षत्रजाः पीडास्तकराग्निसमुद्भवाः
ताः सर्वाः प्रशमं यान्ति व्यासो ब्रूते न संशयः।।12
ग्रह नक्षत्र अग्नि चे । चोरांचे भय त्या नसे
महर्षि व्यास हे सांगे । तेथे संशय ना धरे।।12
इति व्यास-विरचितं नवग्रह-स्तोत्रं सम्पूर्णम् ।
असे महर्षी व्यासांचे । स्तोत्र संपूर्ण जाहले
अनुवाद तयाचा हा । अरुंधती करीतसे
-----------------------------------------
शालिवाहन शक 1935 विजयनाम संवत्सर चैत्र शुद्ध पंचमी । 15 एप्रिल 2013
No comments:
Post a Comment