।। परा पूजा ।।





अखण्डे सच्चिदानन्दे । निर्विकैल्पैकरूपिणि
स्थितेऽद्वितीयभावेस्मिन्कथं पूजा विधीयते ।। 1 ।।

निर्विकार निराकारी एकरूप अखंड जो
भेद नाही जया ठायी । सत् चित् आनंदरूप जो ।।

परब्रह्मस्वरूपी तो । भाव अद्वैत जागता
दृढ होता हृदी कैसे । पूजावे परमेश्वरा ।। 1 ।।



पूर्णस्यावाहनं कुत्र । सर्वाधारस्य चासनम्
स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं च । शुद्धस्याचमनं कुतः ।। 2 ।।

व्यापून विश्व जो राहे । आवाहन कसे तया
असे आधार विश्वाचा । त्या कैसे अर्पु आसना ।।

निर्मळासीच त्या द्यावे । कैसे पाय धुण्या जल
आचमन कसे द्यावे । आहे जो शुद्ध निर्मल ।। 2 ।।


निर्मलस्य कुतः स्नानं । वासो विश्वोदरस्य च।
अगोत्रस्य त्ववर्णस्य । कुतस्तस्योपवीतकम् ।। 3 ।।

मळ नाही जया त्यासी । घालावे स्नान ते कसे
ज्या पोटी विश्व सामावे । वस्त्र त्या कोणते भले ।।

वर्ण गोत्र नसे ज्यासी । नसे आश्रम कोणता
यज्ञोपवीत त्या कसे । कर्माधिकार ना जया ।। 3 ।।



निर्लेपस्य कुतो गन्धः । पुष्पं निर्वासनस्य च
निर्विशेषस्य का भूषा । कोऽलङ्कारो निराकृतेः ।। 4 ।।

गंध लेपन त्या कैसे । लागे ना लेपही जया
जयासी वासना नाही । पुष्प वासार्थ काय त्या ।।

विश्वरूपे नटे जोची । सजवावे कसे तया
आकारही नसे ज्यासी ।  भूषवावे कसे तया ।। 4 ।।


निरञ्जनस्य किं धूपैर्दीपैर्वा सर्वसाक्षिणः ।
निजानन्दैकतृप्तस्य नैवेद्यं किं भवेदिह ।। 5 ।।

संसारधर्म नसे त्यासी । धूप दावावा कसा
सर्वसाक्षी असे त्याला । लावावा कोणता दिवा ।।

स्वस्वरूपी रमे जोची । निजानंदीच तृप्त जो
अर्पावा कोणता कैसा । स्वादु नैवेद्य त्यास तो ।। 5 ।।



विश्वानन्दयितुस्तस्य किं ताम्बूलं प्रकल्प्यते ।
स्वयंप्रकाशचिद्रूपो योऽसावर्कादिभासकः ।।
गीयते श्रुतिभिस्तस्य नीराजनविधिः कुतः ।। 6 ।।

असे स्वयंप्रकाशी जो । तेज देईच भास्करा
प्रकाशित करी चंद्रा । देई अग्नीस उष्णता ।।

वेदांनी वर्णिले ऐसे । दीप त्या उजळी कसा
विश्व मोदे भरे त्यासी । तांबूल सुखवी कसा ।। 6 ।।


प्रदक्षिणमनन्तस्य प्रणामोऽद्वयवस्तुनः ।
वेदवाचामवेदस्य किं वा स्तोत्रं विधीयते ।। 7 ।।

अनंत अक्षयासी त्या । घालू कैची प्रदक्षिणा
दक्षिणा काय द्यावी त्या । तयाहून दुजी तया ।।

द्वैत नाही जिथे तेथे । प्रणाम करणे कुणा
वेद ज्याच्यापुढे मौन । स्तुति स्तोत्रे फुकी तया ।। 7 ।।



अन्तर्बहिश्च पूर्णस्य कथमुद्वासनं भवेत् ।
एकमेव परा पूजा सर्वावस्थासु सर्वदा  ।।
एकबुद्ध्या तु देवेशे विधेया ब्रह्मवित्तमैः ।। 8 ।।

अर्न्तबाह्यचि सर्वत्र । सर्वकाळी असे सदा
आवाहन तया कैसे । करू कैसे विसर्जना ।।

परब्रह्मस्वरूपी त्या । परेशासीच सर्वदा
रूप अद्वैत जाणोनी । पूर्णरूपी गजानना ।।

भजावे ब्रह्मवेत्यांनी । चित्त एकाग्र ठेऊनी
परा पूजा करावी ही । सर्वावस्थेमधे  मनी ।। 7 ।।

सर्वश्रेष्ठ परा पूजा । भावली माझिया मना
अरुंधती मराठीत । करोनी अर्पिते जना ।।
------------------------------------------------------------------
विकारी नाम संवत्सर भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषिपंचमी ) 3 सप्टेंबर 2019 

(आधार ग्रंथ - कै. पांडुरंगशास्त्री गोस्वामी यांचा सुबोध स्तोत्र संग्रह  )