(वृत्त -
भुजंगप्रयात, अक्षरे-12, गण - य य य य)
अहं नामरो नैव मर्त्यो न दैत्यो ।
न गन्धर्वरक्षःपिशाचप्रभेदः।
पुमान् नैव न स्त्री तथा नैव षण्डः । प्रकृष्टप्रकाशस्वरूपः
शिवोऽहम्।।1
( रक्षस् - भूत,प्रेत।
प्रभेद - अंतर,भेद, प्रकार । प्रकृष्ट –
अतिविस्तृत,सर्वोत्तम,श्रेष्ठ,पूज्य, प्रमुख,गौरवशाली। जे सामान्यपणे दिसत नाही, लक्षात येत नाही ते न दिसणारं जग ज्ञान होताच वेगळेपणाने त्याच्या सत्यस्वरूपात समोर उभं राहतं . स्वच्छ
दिसू लागतं. प्रकाश पडल्यावर जशी एखादी वस्तू दिसावी त्याप्रमाणे. प्रकाशालाही दाखवणारा
हा प्रकाश म्हणजेच आत्मानुभूती, ब्रह्मज्ञान.)
नसे देव मी
दैत्य गंधर्व नाही । नसे भूत प्रेतादि वेताळ कोणी।
नसे मर्त्य
स्त्री षंढ वा मी नरादि । नसे कोणता भेद माझ्या ठिकाणी।।1.1
असे सर्वव्यापीच
कल्याणरूपी । स्वयंभू स्वयंसिद्ध मी ब्रह्म तेची।
प्रकाशस्वरूपी
असे ज्ञानरूपी । चिदानंद आनंद मी ब्रह्मरूपी।।1.2
अहं नैव बालो युवा नैव वृद्धो
। न वर्णी न च ब्रह्मचारी गृहस्थः।
वनस्थो हि नाहं न सन्यस्तधर्मा । जगज्जन्मनाशैकहेतुः शिवोऽहम्।।2
नसे बाल मी
वा युवा वृद्ध कोणी । मला ब्राह्मणा क्षत्रियादी
न जाती
नसे ब्रह्मचारी
नसे मी गृहस्थी । नसे वानप्रस्थी न सन्यस्त कोणी।2.1
जगाची करे
निर्मिती वा विनाशू । असे तोचि मी या जगाचाचि
हेतू।
अधिष्ठान
मी या सार्या जगासी । चिदानंद आनंद मी ब्रह्मरूपी।।2.2
अहं नैव मेयस्तिरोभूतमायस्तथैवेक्षितुं
मां पृथङ्नास्त्युपायः।
समाश्लिष्टकायत्रयोऽप्यद्वितीयः । सदातीन्द्रियः सर्वरूपः शिवोऽहम्।।3
( मेय- प्रमेय- मोजता
येण्यास योग्य, निश्चित ज्ञान होईल अशी वस्तु, सिद्ध करता येईल अशी गोष्ट तिरोभूतमाया –- मायेचा पडदा दूर होणे, अज्ञान निरस्त झालेला प्रमाता )
नसे वस्तु मी ती जिला मोजता ये । कळोनीच ये गोष्ट
ती मीच नोहे
कराया मला
सिद्ध सिद्धांत नाही । निमालेचि अज्ञान ज्याचे न तो मी।।3.1
मला पाहण्या
वेगळ्या साधनाची । जरूरी नसे अन्य माझ्याहुनी ही
कळे विश्व
हे सर्व माझ्या प्रकाशे । मला दे प्रकाशू असा कोण आहे।।3.2
घडे स्थूल-लिंगादि
वा कारणादि । जरी देहसंपर्क माझ्या ठिकाणी
तरी तत्त्वता
मी असे अद्वितीय । निराकार मी हा असे गात्रहीन।।3.3
मला जाणण्यासी
मला पाहण्यासी । कराया मला स्पष्ट देण्यास
दीप्ति
न हे कान
दोन्ही न चक्षू न जिव्हा । न स्पर्शेंद्रिये नासिका वा समर्था।।3.4
असे सर्वरूपी
असे चित्स्वरूपी । असे विश्वव्यापी च कल्याणकारी
स्वयंसिद्ध
मी हा प्रकाशस्वरूपी । चिदानंद आनंद मी ब्रह्मरूपी।।3.5
अहं नैव मन्ता न गन्ता न वक्ता । न कर्ता न भोक्ता न मुक्ताश्रमस्थः।
यथाऽहं मनोवृत्तिभेदस्वरूपस् ।
तथा सर्ववृत्तप्रदीपः शिवोऽहं।।4
( मन्ता – मनन करणारा, मनन- विचार,विमर्श,गहन चिन्तन, तर्कसंगत
अनुमान, अंदाज, गन्ता – जाणारा । वृत्ति - अस्तित्व,सत्ता,अवस्था ,दशा, कार्य,गति,कृत्य,आचरण, व्यवहार,व्यवसाय,जीवनचर्या,
)
करी ना कधी
चिन्तना कल्पना वा । न चाले न बोले करी ना क्रिया वा।
नसे मीच कर्ता
नसे मी हि भोक्ता । नसे मुक्त मी जीवनी या
विरक्ता।।4.1
मनाच्या प्रणालीस
मी चेतवीतो । करी इंद्रियासीच उद्युक्त मी तो।
जगाचे अधिष्ठान
मांगल्यदायी । चिदानंद आनंद मी ब्रह्मरूपी।।4.2
न मे लोकयात्राप्रवाहप्रवृत्तिर्न
मे बन्धबुध्या दुरीहानिवृत्तिः।
प्रवृत्तिर्निवृत्तिश्च चित्तस्य वृत्तिर्यतस्त्वन्वहं
तत्स्वरूपः शिवोऽहम्।।5
( लोकयात्रा –- लौकिक
जीवनचर्या,लोकव्यवहार,सांसारिक अस्तित्त्व,आजीविका , प्रवृत्ति –
-क्रियाशीलता, सक्रिय सांसारिक
जीवन, उदय,मूळ, स्त्रोत शब्दांचा प्रवाह-प्रवृत्तिरासीच्छब्दानां
चरितार्था चतुष्टयी ।चरितार्थ- ज्याने
आपले अभीष्ट ध्येय पूर्ण केले आहे )
घडायाचि साफल्य
या जीवनाचे । क्रियाशीलता ही न माझी असे रे
नसे ध्येयपूर्तीस
आसक्त हा मी । करायाचि निवार्थ ना जीविका ही।।5.1
नसे कोणती
बंधनेही मला ती । परावृत्त दुःखामुळे होत नाही
प्रवृत्ती
असो वा असो वा निवृत्ती । मनोधर्म दोन्हीच त्या चित्तवृत्ती।।5.2
जयाच्यामुळे
चित्ति निर्माण होती । क्रीयाशीलता वा परावृत्तता ती
असे अंश तो
मीच कल्याणकारी । चिदानंद आनंद मी ब्रह्मरूपी।।5.3
यतोऽहं न बुद्धिर्न मे कार्यसिद्धिर्यतो नाहमङ्गं
न मे लिङ्गभङ्गः।
हृदाकाशवर्ती गताङ्गत्रयार्तिः । सदा सच्चिदानन्दमूर्तिः शिवोऽहं।।6
नसे बुद्धि
हेची खरे रूप माझे । मिळे बुद्धिला प्रेरणा तोचि मी रे
जरी कार्य
सिद्धीस गेले न गेले । न उल्हास वैषम्य स्पर्शे मला ते ।।6
दिसे देह दृष्टीस तोची नसे मी । नसे लिंगभेदादि काही मला ही।।6
निदानं यदज्ञानकार्यस्य कार्यं
। विना यस्य सत्त्वं स्वतो नैव भाति।
यदाद्यन्तमध्यान्तरालान्तरालप्रकाशात्मकं स्यात्तदेवाहमस्मि।।7
( निदानम् –
प्राथमिक कारण )
करे कार्य
अज्ञान; ज्याने दिसे हा । पसारा जगाचा चहूबाजुला
हा
परी त्यास
आधार जे तत्त्व आहे । जयावीण प्रत्यक्ष ना
कार्य होते।।7.1
प्रकाशेच
जे आदि अंतामधेही । असे आदि मध्याचिया अंतराळी
असे अंतराळाचिया
अंतराळी । असे तत्त्व मी ते प्रकाशस्वरूपी।।7.2
यदासीद्विलासाद् विकारो जगद्यद्विकाराश्रयो
नाद्वितीयत्वत स्यात्।
मनोबुद्धिचित्ताहमाकारवृत्तिप्रवृत्तिर्यत स्यात्तदेवाहमस्मि।।8
जसे पालटे
रूप ते कांचनाचे । अलंकार रूपेचि जेंव्हा करी
ये
तसे विश्वरूपी
सदा ये दिसोनी । विलासामुळे हेचि चितत्त्व नेत्री।।8.1
नसे विकृती
ही विकारादि काही । अलंकार संपूर्ण सोने जसेची
मिळे प्रेरणा
बुद्धि चित्तास ज्याने । मनासी मिळे शक्ति ज्याच्या प्रभावे।।8.2 - -
अहंकार उत्पन्न
होतो जयाने । उठे चित्तवृत्तीच नाना जयाने
प्रणेता चि
आरंभितो कार्य सारे । असा एक तो एक आत्माचि मी रे।।8.3
यदन्तर्बहिर्व्यापकं नित्यशुं । यदेकं
सदा सच्चिदानन्दकन्दम्।
यत स्थूलसूक्ष्मप्रपञ्चस्य भानं
। यतस्तप्रसूतिस्तदेवाहमस्मि।।9
जगा आत बाहेर
जे पूर्ण व्यापी । असे एकची सत्य जे नित्य तेची
असे शुद्ध
जे तत्त्व ते चित्स्वरूपी । असे तोचि मी नित्य आनंदरूपी।।9.1
जयाच्यामुळे
स्थूल वा सूक्ष्म यांचे । घडे ज्ञान बुद्धीस ह्याची जगाचे
करे जोची निर्माण विश्वप्रपंचू । असे तोचि मी सर्वव्यापीच
एकू।।9.2
यदर्केन्दुविद्युप्रभाजालमाला
। विलासास्पदं यत्स्वभेदादिशून्यम्।
समस्तं जगद्यस्य पादात्मकं स्याद्
। यत शक्तिमानं तदेवाहमस्मि।।10
( स्वभेदादिशून्य –
स्वगतभेद,सजातीयभेद,विजातीयभेद रहित . स्वगतभेद
म्हणजे शरिराच्या ठिकाणी जे हात,पाय असे भेद.आत्मा निरंश निरवयव असल्यानी त्यास हे
भेद संभवत नाहीत. सजातीय भेद म्हणजे माणसामाणसांच्या शरीरातील वेगळेपण. ह्याचं
शरीर त्याच्या शरीरापासून वेगळ ओळखता येणं. विजातीय भेद - म्हणजे माणसाचं शरीर म्हणजे पशूचे शरीर नव्हे अथवा
कीटकादिंचेही नव्हे. आत्मतत्त्व हे एकच असून सर्व व्यापून राहिले असल्यानी त्यास हे
भेद नाहीत. )
दिसे
तेज-संघात नेत्रांस जोची । रवी चंद्र सौदामिनी
अंबरी ही
तयांच्या
विलासा अधिष्ठान ते मी । घडे सर्व सत्तेमुळे माझियाची।।10.1
नसे हात पायादि
गात्रे मला ती । उरे तो कुठे भेद गात्रादि
काही
नसे भेद मी,
तूच, तो, ती असाची । पशू पक्षि वा कीटकादी
मलाही।।10.2
स्वजातीय
नाही विजातीय नाही । दिसे ना कधी भेद माझ्याठिकाणी
असे रूप माझे
स्वभेदादिशून्य । असे विश्व हे एक माझाचि अंश।।10.3
जगाची असे
शक्ति मी मूर्तिमंत । दिसे शक्ति तेथे असे मीच नित्य
असे सर्वव्यापी
अनादि अनंत । असे एक आत्माचि मी तो विशाल।।10.4
यतः कालमृत्युर्बिभेति प्रकामं
। यतश्चित्तबुद्धीन्द्रियाणां विलासः।
हरिब्रह्मरुद्रेन्द्रचन्द्रादिनामप्रकाशो यतः स्यात्तदेवाहमस्मि।।11
( प्रकाम –- अत्याधिक )
जया घाबरे
काळ हाची मुजोर । बघोनी जया कापतो मृत्यु थोर।
मना बुद्धिचा
इंद्रियांचा विलास । घडे आश्रयानेच ज्याच्या
सदैव।।11.1
विधाता असो
चंद्र वा चंद्रमौली । असो इंद्र देवेंद्र श्रीरंग
वा ची।
तयांचाच डंका
जगी वाजण्यासी । असे तत्त्व आधार तेची असे मी।।11.2
यदाकाशवत्सर्वगं शान्तरूपं । परं ज्योतिराकारशून्यं वरेण्यम्।
यदाद्यन्तशून्यं परं शंकराख्यं । यदन्तर्विभाव्यं तदेवाहमस्मि।।12
जसे व्यापिते
हेचि आकाश पूर्ण । जगी गोष्ट प्रत्येक ती सान
थोर
महादेव हा
सर्वव्यापी तसाच । असे शांत गंभीर आकारशून्य।।12.1
प्रकाशस्वरूपी
नसे आदि-अंत । असे श्रेष्ठ ते तत्त्वची वंदनीय
कळे चिंतनानेचि
बुद्धीस नित्य । असे मीच तो सर्वसाक्षी महेश।।12.2
---------------------------------
शालिवाहन
शक 1935 विजयनाम संवत्सर चैत्र शुद्ध पंचमी । 15 एप्रिल 2013
No comments:
Post a Comment