नर्म
म्हणजे
सुख.
नर्मदा
म्हणजे
सुखदायिनी.
ती
अमरकंटक
या
पर्वतराजीवर
उगम
पावते
म्हणून
तिला अमरजा असेही
म्हणतात.
तिचे
अजून
एक
नाव रेवा असे
आहे.
ते
संस्कृतमधील
रेव
या
धातूपासून
आले
आहे.
रेव्
ह्या
क्रियापदाचा
अर्थ
उड्या
मारणे
असा
आहे.
नर्मदेवर
भेडा
घाट
येथे
असलेले
सुंदर
धबधबे
तिचे
हे
नाव
सार्थ
ठरवितात.
अशा
ह्या
उड्या
मारत
जाणार्या
नर्मदेचं
मोठ
सुरेख
वर्णन
श्री
आद्य
शंकराचायार्यांनी
आपल्या
नर्मदाष्टकात
केलं
आहे.
ह्या
स्तोत्राचं
प्रमाणिका
किंवा
पंचचामर
हे
वृत्तही
फार
सुंदर
आहे.
सबिन्दु-सिन्धु-सुस्खलत्तरङ्ग-भङ्ग-रञ्जितं
द्विषत्सु पापजात-जातकारि-वारि-संयुतम्।
कृतान्तदूत-कालभूत-भीतिहारि-वर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।1
( सबिन्दु –- तुषारांचे फवारे उडवित जाणारे। सिन्धु-सुस्खलत् –वेगाने समुद्राकडे जाणारा प्रवाह । तरङ्गभङ्ग - तरंगांची मालिका । रञ्जित - सुशोभित । (काही पुस्तकात सबिन्दु- सिन्धुर-स्खलत् असा पाठ आहे. सिन्धुर- हत्ती, सबिन्दु - गंडस्थलातून दानोदकाचे थेंब पझरत आहे असा किंवा ज्यांच्या सोंडेवर अनेक रंगांची वेलबुट्टी काढली आहे असे हत्ती प्रवाहात प्रवेश करतांना प्रवाह कुंठीत होतो.)
पुढे पुढेचि धावतो जलौघ नर्मदे तुझा
मिळावयासि सिंधुलाचि ओढ लागली तुला
सहस्र खेळती तुषार सप्तरंगि सुंदरा
उफाळती सवेग तेचि पांगती इतस्ततः ।।1.1
तरंगमालिका असंख्य रम्य सौम्य सुंदरा
तुझ्या पदास भूषवी अनंत ह्या अनंत ह्या
प्रवेशता गजेंद्र झुंडिने प्रवाहि गे तुझ्या
तरंग भंग पावती प्रवाह थांबतो जरा ।।1.2
छळीति पाप, ताप, दुःख वैरि जे सदा कदा
पिशाच भूत प्रेत जे शहारवीच मन्मना
असो भयाण प्राणघाति दुःख जे यमासमा
तयास वारितेचि वारि नर्मदे तुझेचि गा।।1.3
समर्थ हे सलील जे भयास थोपवी महा
तुझ्याचि कोमला पदास भूषवी पुन्हा पुन्हा
अशाचि मोददायि पादपद्मि कोमला तुझ्या
असो प्रणाम गे तुलाचि नर्मदे पन्हा पुन्हा।।1.4
त्वदम्बुलीन-दीन-मीन-दिव्य-सम्प्रदायकं
कलौ मलौघ-भारहारि सर्वतीर्थनायकम्।
सुमत्स्य-कच्छ-नक्र-चक्र-चक्रवाक-शर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।2
{ त्वदम्बुलीन – (त्वत्
+ अम्बु
+ लीन) तुझ्या पाण्यात लीन झालेले म्हणजे लपलेले. दीन – ज्यांच्यावर
कृपा करण्यास योग्य आहेत असे म्हणजेच जलचर. दिव्यसम्प्रदायकं –स्वर्गीय
सुख देणारे (तुझे पाणी) कलौ- कलीयुगातील. मलौघ –मळाचा, पातकांचा भारहारी –
भार हरण करणारे. शर्मदा –
सुख देणारी. हे माते तू तुझ्या जलात राहणार्या,
तुझ्या किनार्यावर
राहणार्या
सर्वांना
सुख देतेस. }
तुझ्या जळीच जीव जंतु घेति आश्रया सदा
असोत कासवे भलीच मत्स्य नक्र प्राणि वा
मयूर चक्रवाक आदि पक्षि राहती तिरा
मिळे अपूर्व स्वर्गिचेचि सौख्य त्यांसि दुर्लभा।।2.1
कलीयुगातलाचि पापभार सर्व नाशिण्या
तुझे सलील श्रेष्ठ गे जलात सर्व सर्व या
अशाचि मोददायि पादपद्मि कोमला तुझ्या
असो प्रणाम गे तुलाचि नर्मदे पन्हा पुन्हा।।2.2
महा-गभीर-नीर-पूर-पात-धूत-भूतलं
ध्वनत्समस्तपातकारि दारितापदाचलम्।
जगल्लये महाभये मृकुण्डु-सूनु-हर्म्यदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।3
{ महागभीर –
अत्यंत खोल. पात
धूत
भूतलम् –
भूतलावरील
पाप तू धुवून टाकले आहेस. ध्वनत् –
गर्जना करणारे. (नर्मदेवर
असलेल्या
धबधब्यांमुळे
तेथे प्रचंड आवाज येतो.) समस्त
पातकारि – अरि म्हणजे शत्रू. समस्त पातकांचा
नाश करणारी. ध्वनत् हे पातकांचे
विशेषण घेतल्यास
मानवाला दुःखे देण्यासाठी
मी मी म्हणून गर्जना करीत येणार्या
पापांचा तू नाश करतेस. दारितापदाचलम् –
भक्तजनांच्या
संकटाचे पर्वत फोडून टाकतेस. }
अलोट हा प्रवाह गे कधी गभीर खोल हा
खळाळतो पथी कधी करीत जाई गर्जना
कड्यांवरून घे उड्या ध्वनी घुमे गभीर हा
सहस्र धार कोसळे निनादतो ध्वनी पुन्हा।।3.1
पवित्र हा जलप्रपात देवि नर्मदे तुझा
करीच चूर्ण चूर्ण पातकांचियाच पर्वता
करीसि भक्तवृंद गे अपाप तूचि सर्वथा
हरीसि दुःख दैन्य ताप भूतलावरील या।।3.2
तुझ्या रुपे प्रसन्नता मिळे सदैव भूतला
सुखेच देत चालली पुढेपुढेहि नर्मदा
महान संकटी मृकंडपुत्र तूचि तारिला
तिरी तुझ्याचि भव्य या दिलास आसरा तया ।।3.3
अशाचि मोददायि पादपद्मि कोमला तुझ्या
असो प्रणाम गे तुलाचि नर्मदे पुन्हा पुन्हा।।3.4
गतं तदैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा
मृकण्डु-सुनू-शौनकासुरारिसेवितं सदा।
पुनर्भवाब्धि-जन्मजं भवाब्धि-दुःख-वर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।4
{ अम्बु
– पाणी. वीक्षितं –
अवलोकन करताक्षणीच. पुनर्भवाब्धिजन्मजम्
– पुन्हा पुन्हा संसारसागरात
जन्म घ्यायला लागून भवाब्धिदुःख म्हणजे संसारसागराचे
दुःख भोगावे लागते. असुरारि –
दैत्यांचे
शत्रू म्हणजे देव. वर्म – चिलखत. भवाब्धिदुःखवर्मदे
– संसारसागरातील
दुःखापासून
भक्तांचे
चिलखताप्रमाणे
रक्षण करतेस. }
तुलाचि पाहता क्षणी पळून जाय भीति गे
अपार दुःखदायि त्या भवाब्धिची समूळ गे
मृकंडु पुत्र, शौनका सवेचि देव थोर ते
सुधासलील सेवुनी तुझ्या तिरीच राहिले।।4.1
भवाचिया अथांग सागरासि नाशि तूच गे
भयास जन्म मृत्युच्या उपाय एक तूचि गे
अशाचि मोददायि पादपद्मि कोमला तुझ्या
असो प्रणाम गे तुलाचि नर्मदे पन्हा पुन्हा।।4.2
अलक्षलक्ष-किन्नरामरासुरादि-पूजितं
सुलक्ष-नीर-तीर-धीर-पक्षि-लक्ष-कूजितम्।
वसिष्ठ-शिष्ट-पिप्पलादि-कर्दमादि-शर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।5
{अलक्ष- डोळ्याने न
दिसणारे असे जे `लक्ष’ म्हणजे
लक्षावधि यक्ष, किन्नर, गंधर्व, देव असुरादि म्हणजे दैत्य राक्षस
ह्यांनी पूजा केलेले अत्यंत सुंदर असे तुझे नीर म्हणजे पाणी,
त्या पाण्याच्या प्रवाहाच्या दोन्ही किनार्यांवर असलेल्या वृक्षराजीत वास्तव्य
करीत असलेले धीर म्हणजे धैर्यशालि, बुद्धिमान किंवा स्वच्छंद
विहरणारे लक्षावधि पक्षी त्यांच्या मधुर शब्दांनी तुझे चरण `कूजित’ म्हणजे निनादत
आहेत. त्यामुळे तुझे काठ रमणीय वाटतात. शिष्ट – वेदविहित
कर्मांचे आचरण करणारे तपस्वी व ज्ञानी वसिष्ठ, पिप्पलाद, कर्दम आदि महर्षि यांना
आई नर्मदे तू `शर्मदा’ म्हणजे सुख देणारी
आहेस. तुझ्या चरणकमली मी नमस्कार करतो. }
दिसे न लोचनांसि या असोचि देव दैत्य ते
असोचि यक्ष किन्नरादि पूजिती तुलाचि हे
तुझ्या तिरीच दाट वृक्षराजि हीच डोलते
सहस्र लक्ष पक्षि त्यात गोड गोड गाति गे।।5.1
वसिष्ठ पिप्पलासवेचि थोर कर्दमा ऋषी
सुधर्म आचरोनि जेचि राहिले तुझ्या तटी
तयांस नीर रम्य हे करी प्रदान सौख्य गा
प्रणाम हा तुझ्या पदीच नर्मदे पुन्हा पुन्हा।।5.2
सनत्कुमार-नाचिकेत-कश्यपात्रि-षट्पदै-
र्धृतं स्वकीयमानसेषु नारदादि-षट्पदैः।
रविन्दु-रन्तिदेव-देवराज-कर्म-शर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।6
अनन्य भक्तिने जलास या पवित्र प्राशुनी
हृदी धरून ध्यास गे तुझाच राहिले ऋषी
जसा मिलिंद एकरूप हो फुलासवे तसे
सनत्कुमार,नाचिकेत, कश्यपादि राहिले।।6.1
तुझ्या तिरीच सूर्य चंद्र इंद्र आचरी तपा
नरेंद्र रन्तिदेव नारदासमा महर्षि वा
तयांवरी प्रसन्न तू दिले अमाप सौख्य त्यां
प्रणाम हा तुझ्या पदीच नर्मदे पुन्हा पुन्हा।।6.2
अलक्ष-लक्ष-लक्ष-पाप-लक्षसार-सायुधं
ततस्तु जीवजन्तु-तन्तु-भुक्ति-मुक्ति-दायकम्।
विरिञ्चि-विष्णु-शङ्कर-स्वकीय-धाम-वर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।7
( लक्षसार- वज्र )
करून लक्ष लक्ष दुष्कृती न जाणितोचि मी
असेहि पाप नाशिण्यास वज्र हे तुझ्या करी
सुचिन्ह शंख चक्र वज्र पद्म जे शुभंकरी
तुझ्याचि कोमला पदांस भूषवी निरंतरी।।7.1
तुझ्या कृपे समस्त जीव भोगती सुखे महा
लयास जाय दुःख सर्व मोक्ष तो मिळे पहा
करी प्रदान भाविकांसि सत्यलोक मंगला
तसाचि विष्णुलोक वा महेशलोक चांगला।।7.2
स्वकीयधाम ब्रह्म पूर्ण तेहि देसी उज्ज्वला
प्रणाम हा तुझ्या पदीच नर्मदे पुन्हा पुन्हा।।7.3
अहो मृतं स्वनं श्रुतं महेश-केशजा-तटे
किरात-सूत-वाडवेषु पण्डिते शठे नटे।
दुरन्त-पाप-ताप-हारि सर्वजन्तुशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे।।8
तरंगसंगितास साठवीत कर्णसंपुटी
पडे तुझ्या तटीच देह; भाग्यदायि मृत्युही
सखेच जन्मलीस तूचि शंभुच्या जटांतुनी
नसेचि अंत तेहि पाप लीलया करी दुरी।।8.1
असो चि भिल्ल, जातिहीन, सद्गुणीच वा कुणी
लबाड धूर्त नाटकीच पापमुक्त त्या करी
अशाचि मोददायि पादपद्मि कोमला तुझ्या
असो प्रणाम गे तुलाचि नर्मदे पन्हा पुन्हा।।8.2
इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा
पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा।
सुलभ्य देवदुर्लभं महेशधाम-गौरवं
पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम् ।।9
तिन्ही त्रिकाळ भक्तियुक्त चित्तवृत्तिनेचि जो
म्हणेचि नर्मदाष्टका न जाय दुर्गतीस तो
न जन्ममृत्युशृंखलेत जाय तोचि बांधला
मिळे न त्यास नर्क घोर रौरवासमा पुन्हा।।9.1
मिळे न जे सुरांसही तपेचि आचरूनही
महेश धाम प्राप्त त्यांसि सत्वरी सुखासुखी
मिळेचि मान गौरवादि त्यांस शंभुच्या घरी
सुखेचि राहती तिथे अनंतकाळ तोषुनी।।9.2
---------------------------
खळाळतेच नर्मदा सदैव संस्कृतामधे
तिला अरुंधती करेचि प्रार्थना मनामधे
मराठमोळ भूमिला करावया सुजीवना
ममाक्षरांसवे सदैव राहिगे इथे सदा
--------------------------------------------------------------
नंदननाम संवत्सर,चैत्र अमावस्या । 21 एप्रिल 2012
अरुन्धाणां अरुन्धति।
ReplyDeleteखुप सुंदर अनुवाद!
धन्यवाद!
Deleteअप्रतीम अनुवाद👌🏻👌🏻
Deleteखूप सुंदर काव्यानुवाद...मनापासून धन्यवाद अरुंधती
Deleteमनापासून धन्यवाद!
Delete