।। श्रीवेङ्कटेशसुप्रभातम्
वेंकटाद्रि समं स्थान ब्रह्मांडे नास्ति किंचन ।
वेंकटेश समो देवो न भूतो न भविष्यति ॥
वेंकटाद्रि समा नाही । ब्रह्मांडी
स्थान एकही
वेंकटेशा समा नाही । देव एकहि ह्या
जगी
(
वृत्त - अनुष्टुभ् श्लोक)
कौसल्या
सुप्रजा राम पूर्वा सन्ध्या प्रवर्तते ।
उत्तिष्ठ
नरशार्दूल कर्तव्यं दैवमाह्निकम् ॥दैवमाह्निकम् १॥
कौसल्या
सुप्रजा राम - कौसल्या देवी च्या हे सुपुत्रा श्रीरामा
; पूर्वा संध्या प्रवर्तते – पूर्वेला पहाट होत आहे; नरशार्दूल - हे
पुरुषश्रेष्ठ ; उत्तिष्ठ - उठ ; दैवम्
आह्निकम् – सकाळी केली जाणारी देवाची पूजा अर्चा ; कर्तव्यम्
- करावी. (१)
कर्तव्यदक्ष
श्रीरामा । कौसल्यानंदना बघ
प्राची
ही जाहली लाल । होतसे अरुणोदय ।
ऊठ
हे नरशार्दूल । वीर धीर सुनिर्मल
वेळ
झालीच पूजेची । करावे नित्य आह्निक ॥ दैवमाह्निकम् १॥
उत्तिष्ठोत्तिष्ठ
गोविन्द । उत्तिष्ठ गरुडध्वज ।
उत्तिष्ठ
कमलाकान्त । त्रैलोक्यं मङ्गलं कुरु ॥ २ ॥
उठी
रे उठि गोविंदा । उठी रे गरुडध्वजा
उठि
रे कमलाकान्ता । करी त्रैलोक्य मंगला ॥ २ ॥
गोविंद
- हे गोविंदा; उत्तिष्ठ उत्तिष्ठ – उठ, निद्रा सोड ; गरुड
ध्वज ज्याच्या ध्वजावर गरुडचिह्न अंकित आहे अशा विष्णो; उत्तिष्ठ – उठ; कमलाकान्त – हे कमला म्हणजे लक्ष्मीचा पती , उत्तिष्ठ
– निद्रा सोड, त्रैलोक्यं मंगलं मंगलं कुरु – तिन्ही लोकांचे कल्याण कर. (२)
(
वृत्त – वसंततिलका/ सिंहोन्नता ; अक्षरे – 14; गण – त, भ, ज, ज, ग ; यति- पाद)
मातस्समस्तजगतां
मधुकैटभारेः वक्षोविहारिणि मनोहरदिव्यमूर्ते ।
श्रीस्वामिनि
श्रितजन प्रियदानशीले श्रीवेङ्कटेशदयिते तव सुप्रभातम् ॥सुप्रभातम्३॥
समस्त
जगतां – सार्या जगाची;
मातः - माता; मधुकैटभारे: - मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसांचा जो शत्रू
त्या विष्णु च्या; वक्षो विहारिणि
-छाती पर विहार करणारी; मनोहर दिव्यमूर्ते - सुंदर दिव्य आकृति असलेली; श्रीस्वामिनि – सर्व धनाची स्वामिनी;
श्रितजन प्रियदानशीले- आश्रयाला आलेल्यांची कामना पूर्ण करणारी; श्रीवेंकटेशदयिते
– श्रीवकटेश्वराची पत्नी; तव -तुला ; सुप्रभातम् – शुभ प्रभात.(३)
हे व्यंकटेश-सहचारिणि पद्मजा गे
लावण्यमूर्ति छबि दिव्य तुझी विराजे ।
वाटे कृतांत मधुकैटभ राक्षसा जो
त्या गे मुकुंद हृदयी नित राहसी गे ॥३.१॥
येतीच भक्तगण जे तव आश्रयासी
त्याचे अभीष्ट पुरवी नित माय तूची ।
तू सर्व वैभवयुता जननी जगाची
होवो सुमंगल पहाटच श्रीधरीची ॥३.२ ॥
॥सुप्रभातम्३॥
(
वृत्त – मंजुभाषिणी; अक्षरे- 13; गण - स,ज,स,ज,ग ; यति - 5, 8.)
तव सुप्रभातमरविन्दलोचने भवतु प्रसन्नमुखचन्द्रमण्डले ।
विधिशङ्करेन्द्रवनिताभिरर्चिते वृषशैलनाथदयिते दयानिधे ॥ ४॥
जननी प्रसन्न मुख शोभते तुझे
कमलांस लाजवित नेत्र हे तुझे ।
पति व्यंकटेश वृषशैलनाथ गे
रमणी तयाचि प्रिय तू दयानिधे ॥ ४.१॥
शिव, विष्णु, इंद्र, विधिच्याच पत्नि ह्या
तव पूजनी सतत मग्न ह्या पहा ।
तुज ही प्रभात सुखदायि होऊ दे
तव पादपद्मि नमितोच माय गे ॥ ४. २ ॥
(
वृत्त – वसंततिलका/ सिंहोन्नता ; अक्षरे – 14; गण – त, भ, ज, ज, ग ; यति- पाद)
अत्र्यादि
सप्तऋषयस्समुपास्य सन्ध्यां । आकाशसिन्धुकमलानि मनोहराणि ।
आदाय
पादयुगमर्चयितुं प्रपन्नाः शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम्
॥सुप्रभातम्
५॥
अत्री महर्षिगण सप्तऋषीच सारे
ध्यानादि पूजन करून त्वरे निघाले ।
वाटेत ते खुडति ही कमळे सुरेख
आकाशसिंधुमधली तुज वाहण्यास ॥५.१॥
अर्पून रम्य कमळे तव पावली ह्या
पूजा तुझीच करती अति नम्रभावे
हे शेष-शैल- रहिवासि प्रभो तुझी रे
होवो प्रसन्न सु-प्रभात सुमंगला हे ॥५.२॥
॥
सुप्रभातम् ५॥
पंचाननाब्जभव षण्मुख वासवाद्याः
त्रैविक्रमादिचरितं विबुधाः स्तुवन्ति।
भाषापतिः पठति वासर शुद्धिमारात्
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥ ६ ॥
पंचानन
– शिव ; अब्जभव- ब्रह्मा ; षण्मुख – कुमार कार्तिकेय ;
वासवाद्य – इंद्र ; त्रिविक्रमादि चरितं – बटु वामन इत्यादि आपल्या अवतारांविषयी
; भाषापति – बृहस्पति; आरात् – जवळ, समीप; वासरशुद्धिं पठति – पंचांग पाहून दिनशुद्धी सांगत आहेत
; शेषाद्रिशेखरविभो - हे शेषाचलवासी प्रभो (६)
ही वामनादि तव रे अवतारकार्ये ।
वाखाणती यश पराक्रम देव जैसे ।
विष्णू महेश विधि इंद्र कुमार तैसे ।
श्रीव्यंकटेश स्तुतिचे म्हणती पवाडे ॥६.१॥
राहे बृहस्पति उभे जवळी तुझ्या रे ।
पंचाग पाहुन तुला दिनशुद्धि सांगे
होवो प्रभात सुखदायक सुप्रसन्ना ।
हे शेष-शैल- रहिवासि प्रभो तुझी रे ॥ ६.२ ॥
॥
सुप्रभातम् ६॥
ईषत्प्रफुल्ल
सरसीरुह नारिकेल । पूगद्रुमादि सुमनोहर पालिकानाम्
आवाति
मंदमनिलः सह दिव्यगंधैः शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥ ७ ॥
ईषत्
प्रफुल्ल – थोड्याशा उमललेल्या; सरसीरुह- कमळ; नारिकेल – नारळ; पूग – सुपारी; द्रुमादि – इत्यादि झाडांच्या; सुमनोहर पालिकानाम्- मोहक फुलांचा; दिव्यगंधै: - स्वर्गीय, अलौकिक सुगंधाने; अनिल - हवा; मंद -
हळु हळू ; आवाति - वहात आहे, येत आहे; शेषाद्रि शेखर विभो
- हे शेषाचलाधीश ; तव - तुला; सुप्रभातम्
- सकाळ आनंदी जावो. ( अर्धोन्मिलित कमळे,
नारळ, सुपारी ह्या झाडांच्या फुलांच्या सुगंधाने भरलेली हवा मंदमंद वहात आहे. हे श्री
व्यंकटेशा तुझी पहाट प्रसन्न होवो.) (७)
अर्धोन्मिलीत
किती ही सुमने तरुंची
पद्मे
सुगंधितचि नारळ अन् सुपारी ।
त्यांचा
अलौकिक सुगंधचि आसमंती
ह्या
मंदमंद पवनासह वाहतोची ॥ ७. १ ॥
हा
आसमंत सुप्रफुल्लित जाहलासे
सांगेच
हा परिमलू बघ ही उषा ये ।
ही
सुप्रभात उठवी तुज व्यंकटेश
शेषाद्रिशेखरविभो
तुज सुप्रभात ॥ ७.२ ॥
उन्मील्यनेत्रयुगमुत्तमपंजर
स्थाः पानावशिष्ट कदली फल पायसानि ।
भुक्त्वा
सलीलमथ केलिशुकाः पठन्ति शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥ ८ ॥
उत्तम पंजरस्थाः - आरामदायी पिंजर्यांमधे
राहणारे ; क्रीडाशुक – पाळीव पोपट; नेत्रयुग - दोन्ही डोळे; उन्मील्य – उघडून , झोपेतून
जागे होऊन ; पात्रावशिष्ट कदलीफलपायसानि –पात्रात उरलेलेले केळ आणि खीर
; भुक्त्वा - खाऊन ; अथ – आता ; सलील - सविलास
, क्रीडा करत, पठन्ति – बोलत आहेत; शेषाद्रि शेखर विभो - हे शेषशैलाधीश ; तव सुप्रभातम् - तुझी पहाट प्रसन् होवो.(८)
ह्या
पिंजर्यां मधिल पोपट पाळलेले
नेत्रद्वया
उघडती बघ होत जागे ।
वाटीत
काल उरली बघ खीर खाती
खातीच
केळ तुकडे उरलेच रात्री ॥ ८. १॥
नाचून
पंख हलवून करून क्रीडा
रे
सांगती तुजप्रती उठि व्यंकटेशा
‘‘झाली
पहाट उठि रे उठि व्यंकटेश
शेषाद्रिशेखरविभो
तुज सुप्रभात ’’ ॥ ८.२ ॥
तंत्री
प्रहर्षमधुरस्वनया विपञ्च्या गायत्यनंतचरितं तव नारदोऽपि ।
भाषा समग्रमसकृत्कर चाररम्यं शेषाद्रिशेखर विभो तव
सुप्रभातम् ॥ ९ ॥
नारदः
अपि - नारद सुद्धा ; तंत्री प्रहर्ष मधुरस्वनया – तारांच्या वैशिष्ठ्यपूर्ण
रचनेमुळे मधुर आवाज करणारी; विपंच्या – वीणेने ; भाषा समग्र- भाषेने समृद्ध ; असकृत् करचार रम्य – वारंवार तारांवर चालणार्या
हातातून निघणार्या मधुर झंकारामुळे ; तव – तुझे; अनंत चरितं - कधीही न संपणारे हे चरित्र ; शेषाद्रिशेखर विभो हे शेष शैलाधीश
; तव – तुला; सुप्रभातम् – कल्याणकारी प्रभात असो (९)
गातीच साभिनय नारद दिव्य गाथा
श्री व्यंकटेश तव अद्भुत रे चरित्रा
ते छेडिती हळुवार सुरेल वीणा
झंकारतीच मधुरस्वर त्यातुनी गा ॥ ९.१ ॥
वीणाच सुस्वर स्वरे सुचवी तुला रे
हे व्यंकटेश उठि रे तुज सुप्रभात ।
अत्यंत कोमलपणे उठवी मुनी हे
शेषाद्रिशेखरविभो तुज सुप्रभात ॥ ९.२॥
भृंगावली
च मकरंदरसानुविद्ध झंकार गीत निनदैः सह सेवनाय ।
निर्यात्युपान्त सरसीकमलोदरेभ्यः शेषाद्रिशेखरविभो
तव सुप्रभातम् ।। १० ॥
भृंगावली
च – भुंग्यांचे समूह ही; मकरंद रसानुविद्ध झंकार गीत निनदैः सह -
पुष्परस पिऊन तृप्त होऊन गुंजारव करीत; सेवनाय -तुझी सेवा करण्यासाठी; उपांत
सरसी कमलो दरेभ्यः जवळच्या तळ्यामधील कमलांमधून बाहेर येऊन शेषाद्रि शेखर विभो
- हे शेषशैलाधीश; तव सुप्रभातम् – तुला
शुभ प्रभात! (जवळच्या तळ्यामधील कमळांमधून मध पिऊन धुंद झालेले भुंगे गुंजारव करीत
कमळांमधून बाहेर पडत झुंडीने तुझ्या सेवेसाठी येत आहेत. हे शेषाचलाधीश, तुला सुप्रभात)
(१०)
आहे तळे निकट जे कमळा-कळ्यांचे
गुंजारवा करि तिथे मधुभक्षि भुंगे
आकंठ पुष्परस प्राशुन ते निघाले
सेवेस रे तव प्रभो, अति तृप्त भावे
सांगे तुला सकल भृंग-समूह गोड ।
शेषाद्रिशेखरविभो तुज सुप्रभात ’’ ॥ १०.२॥
योषागणेन
वरदध्नि विमथ्यमाने घोषालयेषु दधिमंथनतीव्रघोषाः ।
रोषात्कलिं
विदधते ककुभश्च कुंभाः शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥ ११ ॥
घोषालयेषु
– गवळ्यांच्या घरांमध्ये ; योषागणेन- स्त्रियांनी ; वरदध्नि – उत्तम दही; विमथ्यमाने
घुसळले जात आहे. दधिमंथनतीव्रघोषाः – दही घुसळण्याच्या जोरात येणार्या
आवाजाने भरलेल्या ककुभः - दिशा; कुंभाश्च – आणि घडे एकमेकात ; रोषात् - रागाने; कलिम् -
भांडण; विदधते –
करत आहेत. शेषाद्रि शेखर विभो - हे शेषाचलपति प्रभो;
तव सुप्रभातम् – तुम्हाला सुप्रभात. ( गवळ्यांच्या घरी सर्व स्त्रिया मलईयुक्त दही
घड्यांमधे घुसळत असताना त्यातून निघालेल्या आवाजाने दिशा भरून गेल्या आहेत. आणि असं
वाटत आहे की, घटांमधे आणि दिशांमधे परस्पर भांडण सुरू आहे. हे वेंकटेश्वरा तुम्हाला
सुप्रभात) (११)
ह्या
गौळणी घुसळती मलई दह्यासी
डेर्यात
त्या घुमतसेच रवी अशी की
आवाज
ती करितसे मटक्यावरी त्या
तालात
गाइ घट तोच रवी सवे त्या ॥११.१॥
आवाज
तो घुमतसे दिशादिशात
वाटे दिशा घटचि हे कलहात मग्न ।
वाटे
तुला वदतसे उठि व्यंकटेश
शेषाद्रिशेखरविभो
तुज सुप्रभात ॥ ११.२ ॥
पद्मेशमित्रशतपत्रगतालिवर्गाः
हर्तुं श्रियंकुवलयस्यनिजांगलक्ष्या ।
भेरीनिनादमिव बिभ्रति तीव्रनादं शेषाद्रिशेखरविभो
तव सुप्रभातम् ॥ १२ ॥
पद्मेशमित्र
शतपत्रगत अलिवर्गाः – सूर्याचा मित्र असलेल्या शतदल कमळातील
भुंग्यांचा समूह; निजांगलक्ष्म्या – आपल्या अंगकांतीच्या प्रभावाने; कुवलयस्य-
निळ्या कमळांची; श्रियं - कांतिला हर्तुं - हरविण्यासाठी; भेरीनिनादमिव
– भेरी वाजविल्याप्रमाणे तीव्र ध्वनी ; बिभ्रति – करत आहे; शेषाद्रि शेखर विभो - हे शेषशैलाधीश; तव
सुप्रभातम् – तुला सुप्रभात.
(पद्मिनीवल्लभ जो सूर्या त्याचा मित्र जे शतदल कमळ
त्यातून बाहेर पडणारा भुंग्यांचा समूह आपल्या
चमकदार शरीर कांतीने निळ्या कमळांनाही पराभूत केले अस सांगणारा भेरी वाजविल्याप्रमाणे
गुंजारव करीत आहे. हे वेंकटेशा तुला सुप्रभात.)
(१२)
सूर्यप्रिया
शतदली कमलातुनीया
गुंजारवा करित भृंगदलेचि येता ।
त्या
भृंगकांति पुढती पडते फिकी का
उत्फुल्ल
नील कमलांचिच रंगशोभा ॥१२.१॥
भेरीसमा
करिति गुंजन ते जणू का
दावीत नीलकमलांहुन श्रेष्ठ त्यांना ।
ते
सांगती जणु रमारमणा उठा हो
शेषाद्रिशेखरविभो तुज सुप्रभात ॥ १२.२ ॥
श्रीमन्नभीष्टवरदाखिल
लोकबंधो श्रीश्रीनिवास जगदेक दयैकसिंधो ।
श्रीदेवतागृह भुजांतर दिव्यमूर्ते श्रीवेंकटाचलपते
तव सुप्रभातम् ॥ १३ ॥
श्रीमन्
– लक्ष्मीयुक्त, अभीष्टवरद – जो मागेलतो वर देणारा ; अखिल
लोक बंधो – सार्या जगाचा बंधू, श्री श्रीनिवास - श्री लक्ष्मी जेथे निवास
करते असे ; जगदेक दयैक सिंधो – सार्या जगातील दयेचा एकमेव समुद्र ; श्री देवतागृह
भुजांतर दिव्य मूर्तेः - दोन्ही भुजांनी
सीमित अशा म्हणजेच ज्या छातीवर लक्ष्मीचे निवासस्थान आहे मंदिर आहे अशा अलौकिक सुंदर
शरीर असलेल्या हे; श्रीवेंकटाचलपते हे वेंकटाधीश्वरा; तव- तुला ; सुप्रभातम् – शुभप्रभात. ( हे
श्रीनिवासहे वेंकटाचलाधीश, तू मागशील तो वर देतोस. सार्या जगाचा तू बंधू आहेस. पूज्य
श्री लक्ष्मीचे निवास स्थान आहेस. ह्या विश्वात तू एकमेव दयेचा सागर आहेस. वक्षस्थलावर
लक्ष्मी निवास करण्याने अत्यंत अलौकिक शरीर असलेल्या हे व्यंकटेशा, तुला सुप्रभात.)
(१३)
ज्यासीच
जो वर हवा वर त्यास देसी
तू लोकनाथ जगि एक दयार्द्र तूची ।
राहे
रमा हृदयमंदिरि ह्या तुझ्या रे
त्याने
अलौकिक तुझी तनु सुंदरा रे ॥ १३.१ ॥
सम्पन्न
सर्व विभवे भगवान तूची ।
श्रीवेंकटाचलपते उठि सुप्रभाती ॥ १३.२ ॥
श्री
स्वामिपुष्करिणिकाप्लवनिर्मलांगाः । श्रेयोऽर्थिनो हर विरिंचि सनंदनाद्याः ।
द्वारे
वसंति वरवेत्र हतोत्तमांगाः । श्रीवेंकटाचलपते तव सुप्रभातम् ॥ १४ ॥
श्रीस्वामिपुष्करिणिका प्लवनिर्मलांगाः –
श्रीस्वामिपुष्करिणीत स्नान करून निर्मळ शरीर झालेले, श्रेयोर्थिनः - कृपाप्रार्थी
; हर विरिंचि सनंदनाद्याः - शिव, ब्रह्मा, सनंद आदि; वरवेत्रहतोत्तमांगाः
– द्वारपालांच्या छडीचा मस्तकावर होणारा प्रहार सहन करत; द्वारे - दारी; वसन्ति
-उभे आहेत; श्रीवेंकटाचलपते -हे श्रीवेंकटाधीश्वर, तव तुम्हाला; सुप्रभातम्
- सुप्रभात । (ब्रह्मा, शिव, सनंदमहर्षि आदि सर्व तुझी कृपा व्हावी ह्या इच्छेने, ‘स्वामि-
पुष्करिणी’ ह्या पवित्र जलाशयात स्नान करून निर्मळ तनुने तुझ्या दर्शनाची आस धरून, द्वारपालांचे
मस्तकावर होणारे छडीचे प्रहार सोसत इथे तुझ्या द्वारी केव्हाचे उभे आहेत. हे वेंकटेशा
ही सुंदर प्रभात झाली आहे आपण उठावे.) (१४)
ब्रह्मा,
महेश, मुनिश्रेष्ठ सनंद आदि
‘श्रीस्वामि’
नाम जल पुष्करिणीत न्हाती
होऊन
निर्मल तनू कधिचे उभे रे
आशीश
मंगल मिळो म्हणुनी तुझा रे ॥ १४.१ ॥
द्वारावरील
नियमप्रिय द्वारपाले
केले
शिरी जरि प्रहारचि दंडुक्याने
रांगेत
राहति उभे बघ नम्रभावे
झाली
सुमंगल प्रभात उठी उठी रे ॥ १४.२ ॥
श्रीशेषशैल
गरुडाचल वेंकटाद्रि नारायणादि वृषभाद्र वृषादिमुख्यान् ।
आख्यान् त्वदीयवसतेरनिशं वदंति श्रीवेकटाचलपते तव
सुप्रभातम् ॥ १५ ॥
त्वदीयवसतेः
तुआया वसतिस्थानाची; श्री शेषशैल, गरुडाचल, वेंकटाद्रि, नारायणाद्रि, वृषभाद्रि,
वृषाद्रि मुख्यान् - श्रीशैल, शेषशैल, गरुडाचल, वेंकटाचल, नारायणाद्रि, वृषभादि,
वृषाद्रि अशी काही मुख्य मुख्य; आख्यान् - नावे; अनिशं - नेहमी; वदंति
– घेतली जातात, प्रचलित आहेत; श्री वेंकटाचलपते - हे श्रीवेंकटेश्वर; तव
सुप्रभातम् तुला शुभ प्रभात.
(हे वेकटेश्वर, तुझे निवासस्थान असलेल्या तिरुमल
पर्वताला, श्रीशैल, शेषशैल, गरुडाचल, वेंकटाचल, नारायणाद्रि, वृषभाद्रि, वृषाद्रि,
अशी अनेक नावे प्रचलित आहेत. हे सप्तगिरीश,
तुला सुप्रभात.)(१५)
नावे
अनेक असती तुझिया निवासा
कोणी
म्हणे तिरुमला कुणि शेषशैला ।
नारायणाद्रि,
गरुडाचल बोलती त्या
श्रीशैल
बोलति कुणी वृषभाद्रि त्या वा ॥ १५.१ ॥
वा
वेकटाचल म्हणे कुणि त्या वृषाद्रि
स्वामीच
सप्तगिरीचा म्हणती तुलाही ।
लोकी
तुझे वसतिस्थान प्रसिद्ध फार
होवो
पहाट तव मंगल व्यंकटेश ॥ १५.२ ॥
सेवापराः
शिवसुरेशकृशानुधर्म रक्षोऽबुनाथ पवमान धनाधिनाथाः ।
बद्धांजलिप्रविलसन्निजशीर्षदेशाः श्री वेंकटाचलपते तव
सुप्रभातम् ॥ १६ ॥
शिव सुरेश कृशानु धर्म रक्षोऽबुनाथ पवमान धनाधिनाथाः
- ईशान, इंद्र, अग्नि, यम, निर्ऋति, वरुण, वायु और कुबेर नावाचे आठही दिशाप्रमुख/
दिक्पाल; बद्धांजलिप्रविलसन् निजशीर्ष देशाः – हात जोडून ते कपाळावर टेकवत,
सेवापराः - तझ्या सेवेस तत्पर उभे आहेत;
श्रीवेंकटाचलपते - हे श्रीवेंकटेश्वर; तव सुप्रभातम् – तुला मंगल प्रभात!
(ईशान,
इंद्र, अग्नि, यम, निर्ऋति, वरुण, वायु, आणि कुबेर नामक आठ दिक्पाल म्हणजे दिशांचे
प्रमुख, आपल्या हातांची अंजुली जोडून ती कपाळाला टेकवत, तुला नमस्कार करीत, तुझ्या
सेवेला तत्पर आहेत. हे श्री वेंकटेशा तुला सुप्रभात!) (१६)
हे
आठही प्रमुख आठहि ह्या दिशांचे
दिक्कपाल
ज्यांस म्हणती वरुणादि सारे
सेवेस
तत्पर तुझ्या शिव, अग्नि, इंद्र
वायू, कुबेर, यम, नैर्ऋति हे समस्त ॥ १६.१ ॥
जोडून
अंजुलिस टेकविती कपाळी
वाटे
सरोज कलिका जणु शोभताती ।
हे
वेंकटाचलपते सरलीच रात्र
झाली
पहाट हसरी; तुज सुप्रभात ॥ १६.२ ॥
घाटीषु
ते विहगराज मृगाधिराज नागाधिराज गजराज हयाधिराजाः
स्वस्वाधिकारमहिमादिकमर्थयन्ते श्रीवेंकटाचलपते तव
सुप्रभातम् ॥ १७ ॥
ते
– तुझ्या ; घाटीषु – डोंगराळ वनराई, रस्त्यांमधे , विहगराज, मृगधिराज, नागाधिराज,
गजराज, हयाधिराजाः - गरुड, सिंह, शेषनाग, ऐरावत, उच्चैःश्रवा ; स्व स्व अधिकार
महिमादिकं – आपले आपले अधिकार आणि महत्त्व इत्यादि; अर्थयन्ते- इच्छितात; श्रीवेंकटाचलपते हे श्रीवेंकटाधीश ; तव सुप्रभातम् - तुला सुप्रभात!
हे
वेंकटाधीश, तुझ्या ह्या तिरुमला डोंगराच्या घाटमाथ्यावरील वनराईत; गरुड, सिंह, शेषनाग,
ऐरावत आणि उच्चैश्रवा हे सर्व प्राणीप्रमुख आपापले महत्वपूर्ण अधिकार मिळावेत म्हणून
प्रार्थना करीत आहेत. हे स्वामी आपल्याला शुभप्रभात! (१७)
ह्या
पर्वतीय तव नित्य निवासस्थानी
घाटात
ह्याचि वनराजित मागताती ।
उच्चैःश्रवा,
गरुड, सिंह नि शेषनाग
ऐरावतादि
सगळे वसतीस स्थान ॥ १७.१ ॥
त्यांचाहि
गौरव महत्त्व असो स्थळी ह्या
ते
मागताति अधिकारचि योग्य त्यांना ।
त्यांचीच
मान्य करण्यास विनंति तुम्ही
निद्रा
त्यजून उठि मंगल सुप्रभाती ॥ १७.२॥
सूर्येन्दुभौमबुधवाक्पति
काव्यसौरि स्वर्भानुकेतु दिविषत्परिषत्प्रधानाः ।
त्वदासदास चरमावधिदासदासाः श्रीवेंकटाचल ते तव सुप्रभातम्
॥ १८ ॥
सूर्येन्दुभौम बुधवाक्पति काव्यसौरि स्वर्भानुकेतु दिविषत्परिषत् प्रधानाः - रवि, चंद्र, कुज, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु और केतु नामक देवसभेचे प्रधान ग्रह; त्वदासदास चरमावधिदास दासाः - तुझ्या दासांच्या श्रेणीतील
जे तळागाळाचे दास आहेत त्यांचे दास्यत्व करतात ; श्रीवेंकटाचलपते – हे
वेंकटाधीश्वर
तव सुप्रभातम् तुला
शुभप्रभात असो!
(सूर्य,
चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि आणि राहू , केतु नावाचे देवसभासदस्य ग्रह तुमच्या
हलक्या श्रेणीतील फुटकळ अशा दासांचेही दास आहेत. हे वेंकटाचलपते प्रभात होत आहे. आपण उठावे आपल्याला
शुभप्रभात!)
भानू,
शशी, कुज, बुधादि, बृहस्पती ही
शुक्रासवे
शनि असेचि नवग्रहादि
हे
राहु, केतु द्वय देव-सभा-सदस्य
ज्यांचा
असे जनमनात प्रचंड धाक ॥ १८.१ ॥
(कुज-
मंगळ)
दास्यत्व
पत्करति ते तव सेवकांचे
श्रेणीत
जे असति पार तळात त्यांचे
त्यांच्यावरी
करि कृपा नित रे दयाळा
झाली
सुमंगल प्रभातचि वेंकटेशा ॥ १८.२ ॥
त्वत्पादधूलिभरितस्फुरितोत्तमांगाः
स्वर्गापवर्गनिरपेक्ष निजांतरंगाः ।
कल्पागमऽऽकलनयाऽऽकुलतां
भजन्ते श्रीवेंकटाचलपते तव सुप्रभातम् ॥ १९ ॥
त्वत्पादधूलिभरित स्फुरितोत्तमांगाः
– तुझी चरणधूळ मस्तकाला लागून पवित्र झालेले लोक; स्वर्गापवर्ग निरपेक्षनिजांतरंगाः
– स्वर्ग, मोक्ष हया सर्व इच्छांपासून अलिप्त होऊन; कल्पागम आकलनया आकुलतां भजन्ते
– येणारं दुसरं कल्प कसं असेल ह्या भावनेने व्याकूळ होतात; श्रीवेंकटाचलपते
हे श्रीवेंकटेश्वर, तव सुप्रभातम् – तुला ही पहाट सुंदर जावो!
(हे वेंकटेश्वर, तुझी चरणधूली मस्तकावर लावायचे थोर भाग्य लाभलेले लोक
दुसरं युग सुरू होईल हया कल्पनेने व्याकूळ होतात (ह्या तिरुमला देवस्थानाचा महिमा कमी
तर होणार नाही हया कल्पनेनेच ) असा थोर महिमा असलेल्या हे वेंकटेशा तुला सुप्रभात! )(१९)
जे
मस्तकी चरणधूलि तुझीच लावी
मोक्षास त्यापुढति ते अति तुच्छ मानी ।
चिंताच
व्याकुळ करी हृदि त्यांस नित्या
कैसे
पुढील नवकल्प असेल देवा ॥१९.१॥
येथील
स्थानमहिमा न लयास जावा
वाटे मनोमन तयां नित वेंकटेशा ।
हे वेंकटाचलपते उठि तूचि आता
होवो सुमंगल पहाट तुझीच देवा
॥ १९.२ ॥
त्वद्गोपुराग्रशिखराणि
निरीक्ष्यमाणाः स्वर्गापवर्गपदवीं परमां श्रयंतः ।
मर्त्याः मनुष्यभुवने मतिमाश्रयन्ते श्रीवेंकटाचलपते
तव सुप्रभातम् ॥ २० ॥
मर्त्याः - मानव लोक; परमां
- उत्कृष्ट; स्वर्गापवर्ग पदवीं - स्वर्ग लोक किंवा मोक्षचा मार्ग; श्रयन्तः - ; प्राप्त करत असताना; त्वद्गोपुराग्रशिखराणि - तुझ्या मंदिराच्या गोपुरशिखरांना
निरीक्ष्यमाणाः पाहणारे; मनुष्य भुवने - मानव लोकात राहण्याची; मति
- इच्छा ; आश्रयन्ते - धरतात; श्री वेंकटाचलपते - हे श्रीवेंकटाद्रीश;
तव सुप्रभातम् = तुला मंगल प्रभात!
(स्वर्गलोक
किंवा मोक्ष मार्गी जाणारे लोक ही मार्गात तुझ्या मंदिरांच्या गोपुरांना आणि कळसांना
पाहून पुन्हा मानव लोकात रहण्याची इच्छा करतात.
हे श्रीवेंकटेश, तुला सुप्रभात!) (२०)
पुण्ये
अपार करुनी जन जे कुणीही
तो मोक्षमार्ग धरुनी निघतीच स्वर्गी ।
ते
गोपुरे बघुनिया तव राऊळाची
वाटेतची थबकती; मनि कामना ही ॥ २०.१ ॥
‘हे
राहणे सुख सदोदित मर्त्यलोकी
वस्ती असो नित इथे तव पावलाशी’
।
ते
चिंतिताति तव मंगल नित्य देवा
होवो सुमंगल प्रभात तुझीच आता ॥२०.२॥
श्री
भूमिनायक दयादिगुणामृताब्धे देवाधिदेव जगदेक शरण्यमूर्ते ।
श्रीमन्ननंत
गरुडादिभिरर्चितांघ्रे श्रीवेंकटाचलपते तव सुप्रभातम् ॥ २१ ॥
श्री
भूमिनायक - श्रीदेवी आणि भूमि देवी चे पति ; दयादिगुणामृताब्धे
दया, आदि गुणांच्या अमृताच्या सागरा; देवाधिदेव - देवतांमधे मुख्य देव; जगदेक
शरण्य मूर्ते- सार्या जगताला शरण जाण्यासाठी योग्य भगवान; श्रीमन् अनंत गरुडादिभिः
= अनंत नाग, गरूड इत्यादिंनी ; अर्चित अंघ्रे - चरणपूजा केलेले; श्रीवेंकटाचलपते
श्रीवेंकटाचलाधीश; तव सुप्रभातम् – तुला सुप्रभात!
(श्रीदेवी
आणि भूदेवी चा पती, हे वेंकटेश्वरा, तू दयेचा आणि सर्व गुणांचा जणु अमृताचा समुद्र आहेस. हे देवाधिदेव, सार्या जगाला शरण जाण्यासाठी तू
एकमेव सुयोग्य देव आहेस. हे श्रीमन्, ज्या
अनंत नावाच्या नागाने पृथ्वीचा सर्व भार आपल्या फण्यावर उचलला तो सर्व नागांचा राजा
आणि पक्ष्यांचा राजा गरूड असे अनेक थोर, प्रतिष्ठित आपल्या चरणकमळांची सेवा करत असतात.
अशा अत्यंत श्रेष्ठ वेंकटेशा आपल्याला सुप्रभात!) (२१)
भूदेवि-नायक,
रमा-पति वेंकटेशा
देवा
दयार्द्र हृदया गुणसागरा गा ।
देवात
सर्वचि असे नित श्रेष्ठ तू बा
जावे
जया शरण रे जगि तूच ऐसा ॥ २१.१ ॥
हे
श्रीपते चरणपूजन रे तुझेची
हा पक्षिराजचि गरूड करे सदाही ।
हा
सर्पराजहि अनंतचि वेंकटेशा
पूजी
तुझ्या विमल ह्या चरणांस नित्या ॥ २१.२ ॥
ऐशा
तुझ्या अमल पावन पादपद्मी
होती
विनीत सगळे तुज मान देती ।
प्राचीवरी
पसरला बघ लालिमाच
हे वेंकटाचलपते तुज सुप्रभात ॥ २१.३ ॥
श्रीपद्मनाभ
पुरुषोत्तम वासुदेव वैकुंठ माधव जनार्दन चक्रपाणे
श्रीवत्सचिह्न शरणागत पारिजात श्रीवेंकटाचलपते तव
सुप्रभातम् ॥ २२ ॥
श्रीपद्मनाभ,
पुरुषोत्तम, वासुदेव, वैकुंठ, माधव, जनार्दन, चक्रपाणे
- हे पद्मनाभ, पुरुषोत्तम, वासुदेव, वैकुंठ, माधव, जनार्दन, चक्रपाणि; श्रीवत्सचिह्न श्रीवत्स नामक चिह्नानी शोभित, भृगू ऋषींनी विष्णूच्या
छातीवर मारलेल्या लाथेचे प्रतिक असलेले चिह्न. हे चिह्न विष्णू आपल्या छातीवर आपल्या
पुत्राची म्हणजेच भृगूची आठवण म्हणून कौतुकाने मिरवतो; शरणागत पारिजात- शरण
आलेल्यांना कल्पवृक्षासमान; श्रीवेंकटाचलपते - हे श्री वेंकटाचलाधीश;
(हे
पद्मनाभा, पुरुषोत्तमा, वासुदेवा, वैकुंठा, माधवा, जनार्दना, चक्रपाणि, श्रीवत्सलांछित
प्रभो, शरणागतांसाठी कल्पतरू प्रमाणे असलेल्या वेंकटाधीशा, तुला सुप्रभात.
हे
पद्मनाभ पुरुषोत्तम वासुदेवा
वैकुंठ
माधव जनार्दन चक्रपाणी ।
व्हावी
मुलाकडुन प्राप्तचि भेटवस्तू
छातीवरी
धरि तशी भृगु-लाथ ही तू ॥ २२.१ ॥
पायी
तुझ्या शरण येतिच भक्त जेची
तू
कल्पवृक्ष तयिचा बनुनी सदाही
रे
कामना पुरविसी तव सेवकांच्या
अत्यंत
प्रेमळपणे नित व्यंकटेशा ॥ २२.२ ॥
हे
झुंजुमुंजु उदयाचलि होय पाही
होवो प्रभात तव मंगलदायिनी ही ॥ २२.३ ॥
कंदर्पदर्पहरसुंदरदिव्यमूर्ते
कांताकुचांबुरुहकुड्मललोलदृष्टे ।
कल्याणनिर्मलगुणाकर दिव्यकीर्ते श्रीवेंकटाचलपते
तव सुप्रभातम् ।। २३ ॥
कंदर्प दर्प हर सुंदर दिव्य मूर्ते- मदनाचा गर्व दूर करणार्या अलौकिक सुंदर रूप असलेल्या
व्यंकटेशा, कांता कुच अंबुरुह कुड्मल लोल दृष्टे – लक्ष्मीच्या पद्मकळ्यांप्रमाणे
असलेल्या स्तनांवर चंचल दृष्टी असलेला; कल्याणनिर्मलगुणाकर दिव्यकीर्ते – हितकारी,
निर्मल अशा गुणांची खाण आणि ज्याची अलौकिक कीर्ती सर्वत्र पसरली आहे अशा; श्रीवेंकटाचलपते
- हे श्रीवेंकटेश्वरा; तव सुप्रभातम् – तुला सुप्रभात!
(मदनाचा
गर्व हरण करणार्या अत्यंत देखण्या, प्रेयसीच्या
पद्म कळ्यांसारख्या स्तनांवर चंचल नजर असणार्या, असीम गुणसागर दिव्य कीर्ती असलेल्या,
हे श्रीवेंकटेश्वरा, तुला शुभप्रभात!) (२३)
मूर्ती
अलौकिक तुझी बघुनी अनंग
जाईच
पार शरमूनचि म्लान होय
लक्ष्मी
उरोज जणु पद्मकळ्यांसमा हे
दृष्टी तयास निरखे तव चंचला रे ।। २३.१ ॥
कल्याणमूर्ति
करि विश्वहितास नित्य
सारेचि
एकवटले गुण रे तुझ्यात
सिंधूच
सद्गुणरुपी असशी अथांग
हे वेंकटाचलपते तुज सुप्रभात ।। २३.२ ॥
मीनाकृते
कमठ कोल नृसिंहवर्णिन् स्वामिन् परश्वथ तपोधन रामचंद्र ।
शेषांशराम
यदुनंदन कल्किरूप श्रीवेंकटाचलपते तव सुप्रभातम् ॥ २४ ॥
मीनाकृते
- मत्स्यरूपधारी; कमठ - कूर्ममूर्ति; कोल – वराहरूपी; नृसिंह
नरसिंहमूर्ति; वर्णिन् - बटुरूप वामन व त्रिविक्रम रूपधारी; स्वामिन्-
हे प्रभो; परश्वथ - तपोधन परशु धारी तपस्वी परशुराम; रामचंद्र - श्री
राम; शेषांशराम – बलराम, यदुनंदन - श्रीकृष्ण; कल्किरूप - कल्कि
अवतारधारी; श्रीवेंकटाचलपते - श्रीवेंकटाधीश, तव सुप्रभातम् तुला शुभप्रभात.
(हे
स्वामी, तू मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, बलराम, श्रीकृष्ण
तसेच कल्कि नावाचे अवतार घेतलेस । हे वेंकटेश्वर, तुला सुप्रभात!)
घेशी
रुपे कितिक ही अवतारकार्या
तू
मस्य, कासव, वराह, नृसिंह झाला ।
ऐसा
पराक्रम तुझाच त्रिविक्रमा रे
तू
जिंकिलेस बटुवामन विश्व सारे ॥ २४.१ ॥
तूची
असे परशुरामचि राम कृष्ण
हा
शेषरूप बलराम तुझाचि अंश
कल्की
स्वरूप अवतार तुझाचि वंद्य
हे
वेंकटाचलपते, तज सुप्रभात ॥ २४.२ ॥
एला
लवंग घनसार सुगंधितीर्थ दिव्यं वियत्सरसि हेमघटेषुपूर्णम् ।
धृत्वाद्य वैदिकशिखामणयः प्रहृष्टाः तिष्ठन्ति वेंकटपते तव सुप्रभातम् ॥ २५ ॥
वैदिक
शिखा मणयः – वेदचूडामणी/वेदपारंगत ब्राह्मण; एला लवंग घनसार
सुगंधि – वेलदोडे , लवंग, कापूर आदि से सुगंधित ; दिव्यं - अलौकिक, तीर्थं
= पवित्र जल ; वियत्सरसि - आकाशगंगेतून, हेम घटेषु – सुवर्ण कलशात;
पूर्ण - पूर्ण भरून, धृत्वा – हातात धरून ; प्रहृष्टाः- अत्यंत
आनंदाने; अथ -आत्ता; तिष्ठन्ति- उभे आहेत; वेंकटपते - हे श्रीवेंकटेश्वर;
तव सुप्रभातम् – तुला सुप्रभात!
(आकाशगंगेचे
अलौकिक निर्मल जल सुवर्ण कलशात भरून आणून; त्यात लवंग, वेलदोडे कापूर अशी सुगंधित द्रव्ये
घालून; ते सुगंधि पवित्र जलकुंभ हातात धरून, हे वेदविद्या पारंगत ब्राह्मण, अत्यंत
हर्षभरित अंतःकरणाने तुझ्या सेवेला येथे उपस्थित झाले आहेत. हे वेंकटेश्वरा तुला सुप्रभात!) (२५)
रांगेत
राहति उभे द्विज वेदतज्ज्ञ
पूजेस
उत्सुक मनी सुप्रसन्नचित्त ।
पूजेस
स्वर्ण कलशातुन आणिती ते
आकाश
निर्झरिणिचे जल दिव्य मोठे ॥ २५.१ ॥
पाण्यात
घालति सुगंधि विशेष द्रव्या
कर्पूर,
वेलचि लवंग अति योग्य मात्रा
सेवेस
सज्ज असती उठि वेंकटेशा
होवो
पहाट अति रम्य तुझीच देवा ॥ २५.२ ॥
भास्वानुदेति
विकचानि सरोरुहाणि संपूरयन्ति निनदैः ककुभो विहंगाः ।
श्रीवैष्णवाः
सततमर्थितमंगलास्ते धामाश्रयन्ति तव वेंकट सुप्रभातम् ॥ २६ ॥
भास्वान् उदेति – सूर्य उगवत आहे ; सरोरुहाणि
- कमळे ; विकचानि – उमल आहेत; विहंगाः – निरनिराळे पक्षी; निनदै:
- आपल्या किलबिलाटाने; ककुभः- दिशा दिशाांना संपूरयंति- भरून टाकत
आहेत; श्रीवैष्णवाः - आदरणीय वैष्णवजन;
सततं - सदा; अर्थितमंगलाः- मंगल
कामना करत; ते - तुझ्या; धाम - दिव्य मंदिराचा ; आश्रयन्ति -
आश्रय घेतात; वेंकट - हे श्रीवेंकटेश्वर; तव सुप्रभातम् – तुला सुप्रभात!
(हे
श्रीवेंकटेश्वरा! सूर्य उगवत आहे, तळ्यांमधील कमळे उमलत आहेत, विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने
दिशा भरून गेल्या आहेत, हे वैष्णव जन शुभ कामना करत, तुझ्यासाठी मंगल स्तोत्रे म्हणत
तुझ्या समीप उभे आहेत. हे वेंकटेशा तुला सुप्रभात!) (२६)
ही
पाखरे किलबिलून करीति व्यक्त
आनंद
तो हृदयिचा बघुनीच मित्र ।
आला
बघून उदयाचलि हिरण्यगर्भ
मोदे
हळू उमलती कमळे तळ्यात ॥ २६.१ ॥
हे
सर्व वैष्णव उभे तुझिया समीप
गाती
स्तुती तव सुमंगल स्तोत्रपाठ ।
गंभीर
नाद घुमतसे तव राउळात
हे
वेंकटाचलपते तुज सुप्रभात ॥ २६.२ ॥
ब्रह्मादयःसुरवराः
समहर्षयस्ते संतः सनंदनमुखात्त्वथ योगिवर्याः ।
धामांतिके
तव हि मंगलवस्तुहस्ताः श्रीवेंकटाचलपते तव सुप्रभातम् ॥ २७ ॥
ते
- प्रसिद्ध ; ब्रह्मादयः - ब्रह्मा आदि; सुरवराः - देवता
गण; समहर्षयः- महर्षिंच्या ; अथ - और संतः - सत्पुरुष, सनंदन
मुखाः - सनंदन आदि; योगिवर्याः - योगी जन; तव - तुझ्या धामांतिके
– मंदिराच्या जवळ ; मंगल वस्तुहस्ताः पूजेसाठी लागणार्या मंगल वस्तू हातात
धरून उभे आहेत; श्रीवेंकटाचलपते - हे श्रीवेंकटाधीश, तव सुप्रभातम् –
तुला सुप्रभात!
हे
श्रीवेंकटेश्वर, ब्रह्मा आदि देवगण, महर्षि सनंदन सारखे योगी जन हातात तुझ्या पूजेसाठी मंगल द्रव्य ओंजळीत
धरून तुझ्या दर्शनासाठी उभे आहेत. हे व्यंकटेशा आता उठ, तुला शुभप्रभात!
ब्रह्मदि
देव, मुनिश्रेष्ठ सनंद सारे
ह्या
राउळा जवळ पाहि उभे कधीचे ।
खोळंबले
सकल हे तव पूजनाला
रे
अंजुलीत धरुनी शुभवस्तु सार्या ॥ २७.१ ॥
पूजादि
द्रव्य उपयुक्तचि पूजनाला
आलेच
घेउन तुला जय व्यंकटेशा ।
आशीष
देउन तया करि तू कृतार्था
होवो
प्रभात तुज मंगलदायिनी बा ॥ २७. २ ॥
लक्ष्मीनिवासनिरवद्यगुणैकसिंधो
संसारसागरसमुत्तरणैकसेतो
वेदांतवेद्य
निजवैभव भक्तभोग्य श्रीवेंकटा चलपते तव सुप्रभातम् ॥ २८ ॥
लक्ष्मीनिवास
– जेथे लक्ष्मीदेवीचा नित्य निवास आहे अशा वेंकटेशा; निरवद्य
गुणैक सिंधो- जो निर्मल गुणांचा एकमेव सागर आहे अशा स्वामी; संसार सागर समुत्तरणैक
सेतो - संसाररूपी समुद्र पार करण्यासाठी असलेल्या एकमेव सेतू समान हे भगवान;
वेदांतवेद्य निजवैभव – उपनिषदांमधे ज्याच्या महान ऐश्वर्याचे वर्णन केले आहे अशा
देवाधिदेवा; भक्त भोग्य - भक्त जनांनी अनुभवण्यास योग्य अशा ; श्रीवेंकटाचलपते -
हे श्रीवेंकटेश्वरा तव सुप्रभातम् – तुला मंगल प्रभात!
(हे श्रीवेंकटेश्वरा, हे लक्ष्मीपती,
कल्याणगुणसागरा, भवसागर पार करुन नेणारा तू एकमेव सेतु आहेस, उपनिषदात ज्याच्या महान
ऐश्वर्याचे वर्णन केले आहे अशा भगवंता, तुझ्या ऐश्वर्याचे वर्णन वेद करतात ते जे ऐश्वर्य
म्हणजेच तू आहेस, ते तुझे एश्वर्यरूप भक्तांनी अनुभव घेणयासारखे आहे. अशा भक्तभोग्य भगवान्, तुला सुप्रभात! )(२८)
रे
मंदिरासमचि रम्य तनू तुझी ही
वाटे
रमेस उचिता नित राहण्यासी ।
नेई
सुखे पलिकडेच भवाब्धिच्या जो
भक्तांस
तारुनचि ने सुरसेतु तू तो ॥ २८.१ ॥
ऐश्वर्य
रूप तव वर्णिति वेद चारी
भक्ता
मिळोच अनुभूतिच त्या रुपाची
आहेस
तू गुणनिधी नित वंद्य लोकी
होवो
प्रभात तुज मंगलदायिनी ही ॥ २८.२ ॥
इत्थं वृषाचलपतेरिह सुप्रभातं ये मानवाः प्रतिदिनं
पठितुं प्रवृत्ताः ।
तेषां प्रभातसमये स्मृतिरंगभाजां प्रज्ञां परार्थसुलभां
परमां प्रसुते ॥ २९ ॥
इत्थं
- उस प्रकार; वृषाचलपतेः – श्रीवेंकटेश्वराचे इह - हे प्रातःस्मरणीय; सुप्रभातम् - सुप्रभात स्तोत्र ये मानवाः – जे लोक ;
प्रतिदिनं - दररोज; प्रभात समये - प्रभातकाळी ; पठितुं प्रवृत्ताः -पाठ म्हणण्यासाठी उद्यत होतात ; तेषां
- त्या; अंगभाजां - भक्तजनांना; स्मृतिः
- हे
वेंकटेश स्मरण; परार्थसुलभां
-परमार्थदायिनी; प्रज्ञां - सर्व श्रेष्ठ
प्रज्ञा ; प्रसूते – देते. निर्माण करते .
(जे लोक दररोज हे वेंकटेश सुप्रभात स्तोत्र म्हणतील,
त्यांचे हे स्मरण मोक्षसुलभ उत्तम प्रज्ञा विकसित करेल. )(२९)
जो
व्यंकटेश-स्तुति ही दररोज गाई
नेमे
प्रभातसमयी हरिभक्त कोणी ।
पावे
विकास तयिची परिपूर्ण प्रज्ञा
जी
मोक्षमार्गप्रति नेत असेचि त्याला ॥ २९ ॥
---------------------------------------------------
विश्वावसु नाम संवत्सर, फाल्गुन
शु. ११ अमलकी एकादशी , 27 फेब्रु. 2026
No comments:
Post a Comment