मी कोण आहे ह्या वारंवार पडणार्या प्रश्नाचे
उत्तर मी ते सर्वव्यापी अव्यय ब्रह्म आहे. असे सांगणारे तसेच आपल्या आत्मस्वरूपाचे
यथार्थ ज्ञान करून देणारे हे स्तोत्र आहे.
सकृच्छ्रवणमात्रेण ब्रह्मज्ञानं
यतो भवेत् ।
ब्रह्मज्ञानावलीमाला सर्वेषां मोक्षसिद्धये ।। 1
(सकृत् - एकदा)
ब्रह्मज्ञानावलीमाला । मनोभावेचि एकदा
एकाग्रचित्त जो ऐके । आणे आचरणी सदा ।। 1.1
बोले चाले करे तैसा । आत्मसात करे तया
ब्रह्मज्ञानावलीमाला । मोक्षदायी असे तया ।।1.2
असङ्गोहमसङ्गोहमसङ्गोहं पुनःपुनः।
सच्चिदानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः॥2
असे निःसंग निःसंग । असे निःसंग मी सदा
त्रिवार सांगतो मी हे । असे निःसंग मी सदा ।। 2.1
कुणाशीही नसे माझा । काही संबंध तत्त्वता
पद्मिनीपान पाण्यात । तैसा निर्लेप मी सदा ।। 2.2
नाश मृत्यू मला नाही । रोग व्याधी नसे मला
विश्व सारे भरूनी मी । सर्वत्र राहतो सदा।। 2.3
आनंद विश्वव्यापी मी । कधी ना संपतो असा
सच्चिदानंदरूपी मी । अविनाशीच
तत्त्वता ।। 2.4
नित्यशुद्धविमुक्तोऽहं निराकारोऽहमव्ययम्।
भूमानन्दस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययम्
।।3
( भूमन् - मोठं परिमाण, प्राचुर्य, यथेष्टता, मोठी संख्या
. भूमानन्द - प्रचंड आनंद, भूमानन्दस्वरूप - परमानंदस्वरूप )
असे निर्मळ मी शुद्ध । नित्य मुक्त असे सदा
अंतराळी जसा वायू । तसा राहेच मी सदा ।। 3.1
जलाशयास भेदूनी । किरणे पोचती तळा
ओलावतीच कैसी ती । तैसा मीची असे सदा ।। 3.2
निराकारास ह्या कैचा । आकार संभवे कधी
अविनाशी असे मीची । नाश ना पावतो कधी ।। 3.3
आनंद विश्वव्यापी मी । सौख्य आनंद कंद मी
ग्रासतो ना मला मृत्यू । अविनाशीच
तत्त्व मी ।। 3. 4
नित्योऽहं निरवद्योहं निराकारोऽहमच्युतः
परमानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः॥4
( निरवद्य – निष्कलंक, निर्दोष, अकलंकनीय)
चिरस्थायी असे मीची । नित्य शाश्वत निश्चित
निष्कलंक निराकारी । सर्वव्यापीच अच्युत ।। 4.1
परमानंद रूपाने । ओतःप्रोत भरे जगी
माझ्याच सारखा मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 4.2
शुद्ध चैतन्यरूपोऽहमात्मारामोऽहमेव
च
अखण्डानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।। 5
रंगलो अत्मरूपी हा । शुद्ध चैतन्यरुप
मी
आत्माराम असे मीची । राहे सर्वत्र व्यापुनी ।। 5.1
मी तो अखंड आनंद । अबाधित असे जगी
व्यय ना होतसे माझा । अविनाशीच तत्त्व मी ।। 5.2
प्रत्यक्चैतन्यरूपोऽहं शान्तोऽहं
प्रकृतेः परः।
शाश्वतानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः
।। 6
( प्रत्यक् - सर्वांन्तर्यामी, सर्वांमध्ये निवास करणारा )
सर्वांच्या हृदयी राहे । तेचि चैतन्य मी असे
प्रसन्न शांत निःस्तब्ध । स्थिर मी सर्वदा असे ।। 6.1
नित्यानंदस्वरूपी मी । मायातीत असेच मी
माझ्याचसारखा मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 6.2
तत्त्वातीतः परात्माहं मध्यातीतःपरः
शिवः।
मायातीतः परं ज्योतिरहमेवाहमव्ययः
।। 7
अस्तित्त्वाचेच विश्वाच्या । असे कारण तत्त्व
जे
पलीकडे असे त्याच्या । तत्त्वातीतच मी असे ।। 7.1
उपाधी ना मला काही । नित्य चैतन्य मी असे
नसे आदि मध्यान्त । सर्वश्रेष्ठचि मी असे ।। 7.2
कल्याणरूप मी राहे । मायेच्याही पलीकडे
प्रकाशवी प्रकाशाला । प्रकाश श्रेष्ठ मी असे ।। 7.3
विराजमान सर्वत्र । व्यापितो सकलांस मी
झीज ना होतसे माझी । अविनाशीच तत्त्व मी ।। 7.4
नानारूपव्यतीतोऽहं चिदाकारोऽहमच्युतः
।
सुखरूपस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।।
8
व्यापुनी सर्व रूपांसी । नाना रूपी असून मी
सर्व रूपांचिया आहे । पलीकडे सदैव मी ।।
8.1
झाकती सागरा लाटा । लाटा सिंधू नसे परी
तरंगातूनही सार्या। असे सागर एकची ।। 8.2
शुद्ध चैतन्य रूपी मी । स्वस्वरूपी विराजित
स्वरूपापासुनी भ्रष्ट । होतो ना मीच अच्युत
।। 8.3
सुख आनंद रूपी मी । सदानंद स्वरूप मी
व्यापुनी सर्व राहे मी । अविनाशीच तत्त्व मी ।। 8.4
मायातत्कार्यदेहादि मम नास्त्येव
सर्वदा ।
स्वप्रकाशैकरूपोऽहमहमेवाहमव्ययः
।। 9
माया आणि तिची कार्ये । देह वा सर्व इंद्रिये
पुत्र मित्र कलत्रादि । माझे कोणी कधी नसे ।। 9.1
असे स्वयंप्रकाशी मी । सर्वकाळ सदैव मी
एकरूप असे नित्य । अविनाशीच तत्त्व मी ।। 9.2
गुणत्रयव्यतीतोऽहं ब्रह्मादीनांच
साक्ष्यहम् ।
अनन्तानन्दरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।।
10
सत्त्व, रज, तमाच्याही । पलीकडे असेच मी
ब्रह्मा, विष्णु, महेशाचा । साक्षी एक असेच मी ।। 10.1
घडे उत्पत्ती त्यांचीही । माझ्यापासून ती खरी
माझ्याच प्रेरणेने ते । आपुले कार्य आचरी ।। 10.2
पलीकडेच त्यांच्या मी । अनंत मी अनादि मी
अपार मोद तो मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 10.3
अन्तर्यामिस्वरूपोऽहं कूटस्थः सर्वगोऽस्म्यहम्
।
परमात्मस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।।
11
देही सर्वांचिया राहे । जीवरूपात
मी सदा
निर्विकार असे मीची । कूटस्थ म्हणती मला ।। 11.1
विद्यमानचि सर्वत्र । सर्वत्र विलसे सदा
परमात्मा स्वरूपी मी । अविनाशीच तत्त्वता ।। 11.2
निष्कलोऽहं निष्क्रियोऽहं सर्वात्माऽऽद्यः
सनातनः ।
अपरोक्षस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।।
12
आकारहीन सर्वस्वी । हात पाय मला नसे
मला अवयवांचा ना । पत्ता काहीच तो असे ।। 12.1
कला वा भाग वा अंश । माझे ना होत ते कधी
क्रिया ना करतो काही । असे निष्क्रीय नित्य मी ।। 12.2
आत्मा मी भूतमात्रांचा । सर्वांहूनी
पुरातन
नटलो विश्वरूपाने । अविकारी सनातन ।। 12.3
मला ना आदि वा अंत । अपरोक्ष स्वरूप मी
सर्वकाही असे मीची। अविनाशीच तत्त्व मी ।। 12.4
द्वन्द्वादिसाक्षिरूपोऽहमचलोऽहं
सनातनः ।
सर्वसाक्षिस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः
।। 13
शीतोष्ण लाभ हानी वा । जय वा तो पराजय
सुखदःखादि द्वन्द्वे ती । मान वा अपमान तो ।। 13.1
साक्षी मी सर्व द्वंद्वांचा । द्रष्टा अचल केवळ
निर्विकार असे मीची । अव्याहत सनातन ।।13.2
सर्वसाक्षीच सर्वत्र । कालातीत असेच मी
नसे क्षय अबाधीत । अविनाशीच तत्त्व मी ।। 13.3
प्रज्ञानघन एवाहं विज्ञानघन एव च
अकर्ताहमभोक्ताहमहमेवाहमव्ययः ।।
14
ज्ञानरूप असे मीची । ज्ञानाकार असेचि मी
भोक्ता कर्ता नसूनीही । सर्वकर्ता असेच मी ।।14.1
सर्वजीवस्वरूपी मी । सर्व भोक्ता असेचि मी
कर्तृत्त्व विरहीता मी । नसे भोक्तृत्व अल्पही ।।14.2
सर्वकाही असे मीची । असे अव्यय नित्य मी
शुद्ध सत्य असे मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 14.3
निराधारस्वरूपोऽहं सर्वाधारोऽहमेव
च ।
आप्तकामस्वरूपोऽहमहमेवाहमव्ययः ।।
15
आधार न लगे काही । निराधार असेच मी
परी आधार सर्वांचा । एकमेव असेचि मी ।। 15.1
माझ्यापासून उत्पत्ती । जगताचीच होतसे
लय माझ्यामधे होई । विश्वपालन
मी करे ।। 15.2
कामना पूर्ण होओनी । पूर्णकामा असेचि मी
कामना पुरवीतो मी । ज्या ज्या भक्तहृदी परी ।। 15.3
मीच भोक्ता, फलाशा मी । फळही ते असेच मी
सर्व काही असे मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 15.4
तापत्रयविनिर्मुक्तो देहत्रयविलक्षणः
।
अवस्थात्रयसाक्ष्यस्मि ह्यहमेवाहमव्ययः
।। 16
दुःख कष्ट नसे व्याधी । शारीरिक मला कदा
दुःखे निसर्ग कोपाची । छळिती ना मला कदा ।।
16.1
दुर्दैवाचेच वा फेरे । घेरती ना मला कधी
तापत्रय छळी देहा । माझा संबंध ना तयी ।।
16.2
देहत्रयचि जे जाणी । स्थूल, सूक्ष्म नि कारण
तयाहूनी असे मीची । निराळाच विलक्षण ।।
16.3
सुषुप्ती जागृती स्वप्न । बाल्य तारुण्य वा
जरा
अवस्था ह्या नसे मीची । असे त्याहून वेगळा
।। 16.4
सर्वावस्थांस मी साक्षी । दीप तेवे जसा गृही
निरंतर असे मीची । अविनाशीच तत्त्व मी ।। 16.5
दृग्दृश्यौ द्वौ पदार्थौ स्तः परस्परविलक्षणौ
दृग्ब्रह्म दृश्यं मायेति सर्ववेदान्तडिण्डिमः
।। 17
दृग् दृश्य दोनची राहे । विश्वामध्ये पदार्थची
विलक्षण परी राहे । दोन्हीत भिन्नता पुरी ।। 17.1
दृग् हे ब्रह्म असे सत्य । दृश्य माया प्रपंच हा
दवंडी देतसे ऐसी । नित्य वेदान्त श्रेष्ठ हा ।। 17.2
अहं साक्षीति यो विद्याद्विविच्यैवं
पुनः पुनः ।
स एव मुक्तः सन् विद्वानितिवेदान्तडिण्डिमः
।। 18
जसा राहे दिवा साक्षी । घडणार्या क्रियांसची
घडणार्या क्रियांमध्ये । भाग घेई न तो परी
।।18.1
तैसा असेच मी साक्षी । क्रिया होतीच हातुनी
घेतले
जाणुनी वेदा । शंका ना उरली मनी ।। 18.2
जाण ज्याला अशी येई । तोच विद्वान ह्या जगी
तोच मुक्त असे ज्ञानी । दवंडी वेद दे अशी ।।18.3
घटकुण्ड्यादिकं सर्वं मृत्तिकामात्रमेव
च ।
तद्वद् ब्रह्म जगत्सर्वमिति वेदान्तडिण्डिमः
।। 19
गाडगी मडकी कुंडया । नाम, आकार वेगळे
सर्वात एक ती माती । मातीवीण दुजे नसे ।।19.1
नाना रूपात तैसेची । विश्व ये प्रत्यया जसे
परी ब्रह्ममयी सारे । दवंडी वेद देतसे ।। 19
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव
नापरः ।
अनेन वेद्यं सच्छास्त्रमिति वेदान्तडिण्डिमः
।। 20
ब्रह्म हेचि असे सत्य । भासमान जगत् असे
नसे विकल्प ब्रह्म्यात । स्थित्यंतर जगी दिसे ।। 20.1
जीव ब्रह्माहुनी नाही । काहिही वेगळा मुळी
जीव तोची असे ब्रह्म । श्रेष्ठ सिद्धांत दाखवी ।। 20.2
वेदान्त शास्र हे राहे । अत्युत्तम सदा जगी
दवंडी पिटतो ऐसी । जगी वेदांत ही अशी ।। 20.3
अन्तर्ज्योतिर्बहिर्ज्योति: प्रत्यग्ज्योतिः
परात्परः।
ज्योतिर्ज्योतिः स्वयंज्योतिरात्मज्योतिः
शिवोस्म्यहम् ।। 21
( प्रत्यक् – विरुद्ध दिशांना , आतल्याबाजूला; परात्पर – सर्वश्रेष्ठ परमात्मा)
हृदयातचि तेवे तो । ज्ञानाचाच प्रकाश मी
आकळे विश्व ज्यायोगे । तोही बाह्यप्रकाश मी ।। 21.1
अंतर्बाह्यचि सर्वत्र । ज्ञानरूप प्रकाश मी
सर्वत्र दाटुनी राहे । दीप्ती तीच असेच मी ।। 21.2
तेजोनिधी असे मीची । प्रकाशासी प्रकाशवी
चैतन्य मंगलाकारी । ज्ञानाकार प्रकाश मी ।। 21.3
सर्वश्रेष्ठ असे मीची । परमात्मा असेच मी
कल्याण मोद रूपी मी । शिवरूप असेच मी ।। 21.4
ब्रह्मज्ञानवलीमाला । आत्मज्ञानचि देतसे
ज्ञान अध्यात्मविद्येचे । दावे उकलुनी कसे
जीव ब्रह्म असे याची । ग्वाही देतेच निश्चिती
भावार्थ सांगते त्याचा । मराठीत अरुन्धती
----------------------------------------------------------------------------------
आषाढ शुद्ध एकादशी (आषाढी
एकादशी) 1 जुलै 2020
छान
ReplyDelete