घोरकष्टोद्धरणस्तोत्रम्
(वृत्त –
शालिनी. अक्षरे 11; यति 4,7; गण- म त त ग ग)
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव |
श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव |
भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || १ ||
श्रीपाद
श्रीवल्लभा दत्तराया
आम्हासी तू
रक्षिणे नित्य दत्ता
भक्तांचे तू
हारिसी दुःख क्लेश
ऐसी कीर्ती
भूषवी रे तुलाच || १.१ ||
देवा पाही
भाव हा शुद्ध माझा
आलो आलो
आश्रया देवराया
ठेवी माथा
पादपद्मी तुझ्या मी
कष्टातूनी
घोर ह्या तूच तारी || १.२ ||
त्वं नो माता त्वं पिताऽऽप्तोऽधिपस्त्वं |
त्रातायोगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् |
त्वं सर्वस्वं नोऽप्रभो विश्वमूर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || २ ||
आहे माझी माय
तू तात दत्ता
आहे तूची
आप्त विश्वस्त माझा
सारे सारे
तूचि सर्वस्व आता
कल्याणाची
वाहसी नित्य चिंता || २.१ ||
तूची स्वामी
विश्व हे सर्व तूची
संसाराचा सिंधु हा खोल भारी
कष्टातूनी घोर ह्या तूच तारी || २.२ ||
पापं तापं व्याधिमाधिंच दैन्यं |
भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यम् |
त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ३ ||
( जूर्तिः – ताप, बुखार. हे ईश अस्तजूर्ते – हे आधि,व्याधि,
ताप, शारिरीक व्याधी दूर करणार्या देवा आशु – वेगाने, त्वरित, )
आधी व्याधी पाप तापादि दुःखे
भीती शंका कष्ट दारिद्र्य सारे
सार्यातूनी मुक्तता दे त्वरेने
क्लेशातूनी उद्धरी दत्तमूर्ते || ३.१ ||
आलो दत्ता आश्रयाला तुझ्या मी
माथा ठेवीतो तुझ्या पादपद्मी
संसाराचा सिंधु हा खोल भारी
कष्टांसी ह्या घोर तूची निवारी || ३.२ ||
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता |
त्वत्तो देवं त्वं शरण्योऽकहर्ता |
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ४ ||
नाही त्राता रे तुझ्यावीण कोणी
नाही दाता रे तुझ्या तोडिचाची
नाही भर्ता पोषि जो प्रेमभावे
येता पायी रक्षि जो भक्त प्रेमे || ४.१ ||
दत्ता तूची एकमेवाद्वितीया
भक्तांची तू ना करीसी उपेक्षा
लाभो दत्ता सत्कृपा; वंदितो मी
कष्टातूनी घोर ह्या तूच तारी || ४.२ ||
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं ।
सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते ।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ५॥
प्रीती राहो रे अनन्या स्वधर्मी
राहो चित्ती सन्मती देवभक्ती
भुक्ती, मुक्ती सज्जनांचीच मैत्री
राहो प्रीती दत्त-पादाम्बुजाची ॥ ५.१॥
झालो मी रे नम्र, आनंदमूर्ती!
देई
दत्ता हात ह्या पामरासी
संसाराच्या
काढ खाईतुनीही
कष्टातूनी घोर ह्या तूच तारी ॥ ५.२॥
श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् ।
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥
स्तोत्र
कल्याणकारी हे । पाच श्लोकात मांडले
म्हणे जो
नित्य भक्तीने । दत्तासी तोचि आवडे ।।
श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीविरचितं श्रीदत्तात्रेयप्रार्थनास्तोत्रं
संपूर्णम् ।
असे श्री
वासुदेवानंदसरस्वतीस्वामी यांनी रचलेले श्रीदत्तात्रेयप्रार्थनास्तोत्र
पूर्ण झाले.
।। श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ।।
--------------------------------------
@अरुंधतीप्रवीणदीक्षित-
भाद्रपद शुद्ध द्वितीया , 5
सप्टेंबर 2024