एकदा कोणीतरी पुलंना कवितेची व्याख्या
विचारली. आणि पुल म्हणाले `ज्यात कविता आहे ती कविता.' म्हणजे कवितेला वृत्तबंध असला
पाहिजे, त्यात अनुप्रास यमक असलेच पाहिजे ह्या सर्व जोखडातून कविता मुक्त आहे. ती हृदयाला
भिडली पाहिजे एवढी एकच गोष्ट असली पाहिजे. हे स्तोत्र वाचतांना आणि अनुवादित करतांना
मला ते मनोमन पटले. ह्या स्तोत्राची सुरवात
तोटक वृत्ताने (वृत्त - तोटक, अक्षरे-12,
गण- स स स स) केली आहे. दोन श्लोक झाल्यावर
मात्र प्रत्येक चरणात 16 मात्रा या प्रमाणे स्तोत्र पूर्ण केले आहे. मधेच 5वे कडवे
तोटकमधे आहे. तोटकमधे यति (स्तोत्र म्हणतांनाचा थांबा) पाद म्हणजे शेवटच्या अक्षरावर
असते. ह्या तोटक वृत्तात यति 3, 6, 9,12 अशी आहे. मधेच एखादि ओळ तोटक वृत्तात आहे.
असे असुनही सर्वच स्तोत्र अतिशय मधुर आणि प्रासादिक आहे. सर्वांचेच आवडते आहे. ह्या
बहारदार स्तोत्राचा केलेला हा भावानुवाद.
अधरं मधुरं वदनं मधुरं
नयनं मधुरं हसितं मधुरम्।
हृदयं मधुरं गमनं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥१॥
नयनं मधुरं हसितं मधुरम्।
हृदयं मधुरं गमनं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥१॥
( गमन - जाणे, गति,
चाल, अभियान/ शत्रूवर हल्ला करणे, सहवास )
अधर मधुर तव । वदन मधुर तव । नयन मधुर तव । हास्य मधुरतर
हृदय तुझे रे । मधुर सुकोमल । लळा लावुनी । जाणे सुंदर
संगत सोबत । तुझी सख्या रे । अमृतमय अति मधुर निरंतर
शत्रूवरची । चाल मनोहर । मधुराधिपते सकल मधुर तव ॥1
संगत सोबत । तुझी सख्या रे । अमृतमय अति मधुर निरंतर
शत्रूवरची । चाल मनोहर । मधुराधिपते सकल मधुर तव ॥1

वचनं मधुरं चरितं मधुरं
वसनं मधुरं वलितं मधुरम्।
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥२॥
वसनं मधुरं वलितं मधुरम्।
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥२॥
खट्याळ नेत्री भाव मधुर
तव । वळुनी बघता मन मोहे मम
डौलदार ही चाल मधुर
तव । यमुनातीरी भ्रमण मधुर तव
मधुराधिपते सकल तुझे
रे । मधुर मधुरतर मधुर मनोरम ॥2
वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः
पाणिर्मधुरः पादौ मधुरौ।
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥३॥
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥३॥
तव अधरीच्या स्पर्शानेही । वेणू बोले
मधुर मधुर ही
पराग,रजकण माखुन अंगी । मूर्ती दिसे तव मधुर मधुरशी
मधुर तुझे कर , मधुर पावले । मधुर मधुर
अति कोमल सुंदर
नृत्य तुझे हे सख्या मधुर रे । सख्य तुझे
रे बरसे अमृत
मधुर तुझे रे अवघे अवघे । मधुराधिपती
जीवन उज्ज्वल ॥3
गीतं मधुरं पीतं मधुरं
भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् ।
रूपं मधुरं तिलकं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥४॥
भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् ।
रूपं मधुरं तिलकं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥४॥
गानलुब्ध रे गीत मधुर तव । गोकुळातले दहि दुध प्राशन
गोप शिदोरी वाटुन खाणे । कमललोचना मधुर असे तव ।
निद्राधीनचि रूप तुझे हे ।
लोभसवाणे मधुर गमे मज
तिलक भाळिचा मधुर दिसे तव । माधुर्याचे तूच मधुरपण
मधुर तुझे रे अवघे अवघे । मधुराधिपती
जीवन उज्ज्वल ॥4
करणं मधुरं तरणं मधुरं
हरणं मधुरं रमणं मधुरम्।
वमितं मधुरं शमितं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥५॥
हरणं मधुरं रमणं मधुरम्।
वमितं मधुरं शमितं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥५॥
करशिल ते ते । मधुर असे तव । यमुना पोहुन जाणे सुंदर
दहि दुध चोरी मधुर असे तव । रमुनी जाणे तुझे मधुरतम
बोल मुखातुन जे जे येती । अमृतमय ते मधुर मधुरतम
चिंतनात वा गढुनी जाणे । शांत
रहाणे तेहि मधुर तव
माधुर्याचा तूची गाभा । मधुराधिपती सकल मधुर तव ॥5
गुंजा मधुरा माला मधुरा
यमुना मधुरा वीची मधुरा।
सलिलं मधुरं कमलं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥६॥
यमुना मधुरा वीची मधुरा।
सलिलं मधुरं कमलं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥६॥
रानफुलांची माळ सुंगंधी । रुळते
मधुरा तुझिया कंठी
त्यावर भुंग्यांची ही दाटी । मधुर गुंजनी गेली गढुनी
तुझ्या संगती येई जे जे । मधुर मधुरतम होई ते ते
मधुर असे अति कालिंदी ही । कृष्ण-तरंगे मधुर जाहली
सलिल मधुर हे कमल मधुर हे ।
मधुराधिपती सकल मधुर तव ॥6
गोपी मधुरा लीला मधुरा
युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् ।
दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥७॥
युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् ।
दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥७॥
हरिमय गोपी मधुर तुझ्या या । मधुर तुझा हा रास रंगला
गोपींसंगे रमुनी जाणे । मधुर दिसे तू त्यांच्या संगे
सहज सोडुनी जाणे त्यांना । मधुर असे रे तेही सखया
तुझे पहाणे गोड मधुर हे। शिष्टाई तव अनुपम सुंदर
मधुर तुझे रे अवघे अवघे । मधुराधिपती जीवन उज्ज्वल ॥7
गोपा मधुरा गावो मधुरा
यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा।
दलितं मधुरं फलितं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥८॥
यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा।
दलितं मधुरं फलितं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥८॥
गोप बालके मधुर तुझी ही । मधुरचि तांबू कपिला गायी
हाती काठी तव ही मधुरा । सृष्टी रचिली तू ती मधुरा॥
निर्दाळुन तू टाकी स्वकुला । कौरवसहिता कौरवसेना
आग लावुनी जाळी खांडव । तेहि
असे तव मधुरचि दर्शन ॥
विना याचना सुदाम्यास जे । दिलेस सुख ते अमर मधुरतर
पार्थालाही सखा मानुनी । केला तू उपदेश मधुरतर ॥
वस्त्र पुरविण्या पांचालीसी । धावुन येणे तुझे मधुरतम
कृपा असो वा क्रोध तुझा रे । मधुर माधवा अतिशय सुंदर
मधुर तुझे रे अवघे अवघे । मधुराधिपती जीवन उज्ज्वल ।।8



----------------------------------------------------------------------
(वैकुंठचतुर्दशी, दुर्मुखनाम संवत्सर,
शके 1938, 13 नोव्हेंबर 2016)
No comments:
Post a Comment