॥ श्री गणेशाय
नमः ॥

ऋषिरुवाच
॥1
ऋषि म्हणाले ।॥1 -
देव्या हते
तत्र महासुरेन्द्रे । सेन्द्राः सुरा वह्निपुरोगमास्ताम् ।
कात्यायनीं
तुष्टुवुरिष्टलाभाद्विकाशिवक्त्राब्जविकासिताशाः ॥2
देवि प्रपन्नार्तिहरे
प्रसीद । प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य।
प्रसीद विश्वेश्वरि
पाहि विश्वं । त्वमीश्वरी देवि चराचरस्य।।3
सार्या जगाची
जननी भवानी। सदैव पीडा हरसी जनाची
प्रसन्न आम्हावर
हो भवानी । संरक्षिणे ह्या जगतास तूची
देवी अधिष्ठान
जगास तूची । करी कृपा गे नच दूर लोटी।।2/3
आधारभूता जगतस्त्वमेका
। महीस्वरूपेण यतः स्थितासि
अपांस्वरूपस्थितया त्वयैतदाप्यायते
कृत्स्नमलङ्घ्यवीर्ये।।4
आधार सार्या
जगतास देशी । वसुंधरा रूप धरून तूची
जलस्वरूपात
सदा वसोनी। तू तृप्त केलेस चराचरासी
नाही यशासी
तव पार देवी । पराक्रमा ना तुलना तुझ्याची।।4
त्वं वैष्णवी
शक्तिरनन्तवीर्या । विश्वस्य बीजं परमासि माया
सम्मोहितं देवि
समस्तमेतत् । त्वं वै प्रसन्ना भुवि मुक्तिहेतुः।।5
तू विष्णुपत्नी
वसुधाच लक्ष्मी । अनंत शक्ती, बल तू असेची
सामर्थ्यसंपन्न
असेच तूची । अतुल्य ही ताकद गे तुझी ही ।।5.1
जन्मास येण्या
जग हेचि सारे । तूची असे कारण एक माते
माया असे
प्रकृति तूच देवी । माया तुझी मोहविते जगासी।।5.2
अज्ञानरूपी
पडदा धरोनी। सत्यास झाकी भुलवी जगासी
प्रसन्न होता
परि मोक्षप्राप्ती । घडे कृपेने जननी तुझ्याची।।5.3
विद्याः समस्तास्तव
देवि भेदाः । स्त्रियः समस्ताः सकला जगत्सु।
त्वयैकया पूरितमम्बयैतत्
। का ते स्तुतिः स्तव्यपरापरोक्तिः।।6
जगात विद्या
असतीच ज्या ज्या । रूपे तुझी ती असती समस्ता
समस्त स्त्रीवर्ग
जगातला ह्या । तुझीच रूपे असती विभिन्ना।।6.1
वाणी ‘परा’
तू असशीच देवी । चराचरा व्यापुन तूचि राही
तुझ्या गुणांची
करण्या स्तुती मी। समर्थ नाही लवमात्र देवी।।6.2
सर्वभूता यदा
देवि । भुक्तिमुक्तिप्रदायिनी
त्वां स्तुता
स्तुतये का वा । भवन्तु परमोक्तयः।।7
विश्वामध्ये
असे जे जे । रूप तेची तुझे असे
ऐश्वर्य भोग
सौख्याचे । तूचि दान जगा दिले ।।7.1
स्वर्ग लोक
दिला तूची । देतसे मोक्ष,मुक्तिही
महती ही तुझी
ऐसी । बोलू काय अजून मी।।7.2
सर्वस्य बुद्धिरूपेण॥
जनस्य हृदि संस्थिते
स्वर्गापवर्गदे देवि
। नारायणि नमोऽस्तु ते।।8
( संस्थित – विद्यमान, सतत बरोबर असणारा, अचल
)
माते विवेक
रूपाने । सर्वांच्या हृदयामधे
विद्यमान
असे तूची । मोक्ष स्वर्ग चि देतसे
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।8
कलाकाष्ठादिरूपेण । परिणामप्रदायिनी।
विश्वस्योपरतौ शक्ते नारायणि
नमोऽस्तुते।।9
( काष्ठा -अंतिम सीमा,
चिह्न, काळाचे माप -1/30 कला । अपरति
-हस्तक्षेप, विभक्त करणे, नाश
करणे। )
परिमाणे च
काळाची । वेगवेगळी तू असे
काळानुरूप
तू देवी। दाखवीसी प्रभाव गे ।।9.1
संहारकारी
तू शक्ती । नाशी विश्व क्षणात हे
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।9.2
सर्वमङ्गलमाङ्गल्ये । शिवे
सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके
गौरि । नारायणि नमोऽस्तु ते।।10
मूर्तिमंत
असे तूची । सौख्य कल्याण हे जगी
आनंद भाग्य
तू देसी । समृद्धी हित साधसी
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।10
सृष्टिस्थितिविनाशानां । शक्तिभूते
सनातनि
गुणाश्रये गुणमये
। नारायणि नमोऽस्तु ते।।11
सृष्टीच्या निर्मिती साठी । पालनासाठी
तसेचही
विनाशार्थचि
लागे जी । शक्ती तू ती सनातनी।।11.1
तुझ्याच आश्रयाने
हे। गुण सारेच राहती
गुणसम्पन्न
तू देवी । गुण हे तव रूपची ।।11.2
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।11.3
शरणागतदीनार्त । परित्राणपरायणे
सर्वस्यार्तिहरे देवि
। नारायणि नमोऽस्तु ते।।12
दुःखी कष्टी
जीवजंतू । त्यांना आधार एक तू
संरक्षण करी
त्यांचे । दुःख दैन्य हरून तू।।12.1
शोक दुःखचि
सा र्यांचे
। तूची नाशीच सर्व गे
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।12.2
हंसयुक्तविमानस्थे । ब्रह्माणीरूपधारिणि
कौशाम्भःक्षरिके देवि
नारायणि नमोऽस्तु ते।।13
कामिनी ब्रह्मदेवाची।
ब्रह्माणी म्हणती तुला
हंसांनी युक्त
ऐशा या । विमानी बसुनी सदा।।13.1
शिंपीत जासी
दर्भाने । पवित्र जल अंबिके
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।13.2
त्रिशूलचन्द्राहिधरे
। महावृषभवाहिनि
माहेश्वरीस्वरूपेण
। नारायणि नमोऽस्तु ते।।14
हाती त्रिशूळ
शोभे हा । चंद्रकोर तुझ्या शिरी
आभूषणे म्हणोनी
तू । नाग, सर्पचि ल्यायली।।14.1
वाहनासी महानंदी
। बैसली तू तयावरी
महेश्वराची
होवोनी । अर्धांगी प्रिय पार्वती।।14.2
माहेश्वरी
स्वरूपाने । राहसी जगदंबिके
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।14.3
मयूरकुक्कुटवृते । महाशक्तिधरेऽनघे
कौमारीरूपसंस्थाने नारायणि
नमोऽस्तु ते।।15
सभोवार तुझ्या
खेळे । मोर कुक्कुट साजिरे
निष्कलंक
असे तूची । महासामर्थ्य हे तुझे।।15.1
कौमारी रूप
घेऊनी । राहसी जगदंबिके
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।15.2
शङ्खचक्रगदाशार्ङ्गगृहीतपरमायुधे
प्रसीद वैष्णवीरूपे
। नारायणि नमोऽस्तु ते।।16
शंख,चक्र,गदा
शोभे। शार्ङ्ग धनु हाती गे
उत्तमोत्तम
आयुधे । सज्ज ठेवी सदैव गे।।16.1
विष्णुपत्नी
शक्तिरूपी। रमारूपात तू दिसे
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।16.2
गृहीतोग्रमहाचक्रे । दंष्ट्रोद्धृतवसुंधरे
वराहरूपिणि शिवे
। नारायणि नमोऽस्तु ते।।17
महाचक्र धरे
हाती । काळरूपी भयंकरी
वराह रूप
घेवोनी । वसुधेसीच तोलिसी - - ।।17.1
सुळ्यावर
तुझ्या एका । कल्याणी! जग तारिसी
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।17.2
नृसिंहरूपेणोग्रेण । हन्तुं
दैत्यान् कृतोद्यमे
त्रैलोक्यत्राणसहिते । नारायणि
नमोऽस्तु ते।।18
नरसिंह स्वरूपाने
। उग्र भीषण दर्शने
महा बलाढ्य
दैत्यांचे । केले तू पारिपत्य गे।।18.1
अव्याहत तुझा
चाले । परिश्रमचि हे शिवे
त्रैलोक्य
रक्षिण्या सारे । निर्दाळायाचि दैत्य हे।।18.2
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।18.3
किरीटिनि महावज्रे
। सहस्रनयनोज्ज्वले
वृत्रप्राणहरे चैन्द्रि
। नारायणि नमोऽस्तु ते।।19
स्वर्णमुकुट
तेजस्वी । शिरी शोभे तुला अती
सहस्रावधि
तेजस्वी । नेत्र हे तव शोभती॥19.1
मनोधैर्य
सुरेंद्राचे । शक्ती त्याचीच तू सखी
पराक्रम तयाचा
तू । महावज्र करी धरी ॥19.2
वृत्रासुर
राक्षसाचे । पंचप्राण तू हारिले
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।19.3
शिवदूतीस्वरूपेण
। हतदैत्यमहाबले
घोररूपे महारावे
। नारायणि नमोऽस्तु ते।।20
शिवाची दूत
होवोनी । शिष्टाई करुनी शिवे
उद्युक्त
दैत्य तू केले । लढण्यासी तुझ्यासवे।।20.1
रूप उग्रचि
तू घेता । गर्जना तव ऐकता
गर्भगळित
दैत्यांना । वधिले सहजी तुवा।।20.2
रणी सामर्थ्य
प्रकटे । माते अद्भुत हे तुझे
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।20.3
दंष्ट्राकरालवदने शिरोमालाविभूषणे
चामुण्डेमुण्डमथने नारायणि
नमोऽस्तु ते।।21
कराकरा रगडसी
। दाढा ह्या अति भीषणा
जीव आसुसला
घ्याया । अंबिके घास शत्रुचा ।।21.1
मुंडाच्या
घालसी माळा । माते तू सहजी गळा
वधिले चामुंड मुंडाला । दैत्यांना धाक गे तुझा ।।21.2
रूप भीषण
हे ऐसे । देखता धडकी भरे
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।21.3
लक्ष्मि लज्जे
महाविद्ये श्रद्धे पुष्टि स्वधे ध्रुवे
महारात्रि महामाये
नारायणि नमोऽस्तु ते।।22
लक्ष्मी
,लज्जा तुझी रूपे । महाविद्याच तू असे
श्रद्धा,
पुष्टि, स्वधा तू गे । महारात्रीच तू असे।। 22.1
स्वधा, धृवा,
अविद्या ही । नाना रूपे तुझीच गे
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।22.2
मेधे सरस्वति वरे भूति बाभ्रवि तामसि
नियते त्वं
प्रसीदेशे नारायणि नमोऽस्तु ते।।23
( बाभ्रवी – भुरकट रंगाची अशी पार्वती )
मेधा सरस्वती तूची । सर्वश्रेष्ठ ‘वरा’ तूची
ऐश्वर्यरूपी
‘भूती’ तू । गहूवर्णीच पार्वती।।23.1
‘तामसी’ तू
महाकाली । संयमी ‘ नियता ’ असी
सर्वांची
तू अधिष्ठात्री । ‘ ईशा ’ संबोधती तुसी।।23.2
उपकारार्थ
विश्वाच्या । निर्मिली ही तुझी रूपे
नमस्कार तुला
माते । नारायणि हरिप्रिये।।23.3
सर्वस्वरूपे सर्वेशे
सर्वशक्तिसमन्विते
भयेभ्यस्त्राहि नो
देवि दुर्गे देवि नमोऽस्तु ते।।24
सर्वरूपात
तू राहे । भरुनी विश्व सर्व हे
अधिष्ठात्रीच
विश्वाची । माते तू जगदंबिके।।24.1
सम्पन्न सर्व
शाक्तिंनी । सर्वेश्वरीच तू सदा
भयापासून
सा र्या
ह्या । दुर्गे वाचवी तू आम्हा ॥24.2
नमस्कार असो
दुर्गे । तुझ्या पावली सर्वदा।।24.3
एतत्ते वदनं
सौम्यं लोचनत्रयभूषितम्
पातु नः
सर्वभूतेभ्यः कात्यायनि नमोऽस्तु ते।।25
प्रसन्न सौम्य
हे आहे । माते मुखची हे तुझे
तीन नेत्र
तुझे देवी । भूषवीती मुखास गे।।25.1
मनात दाटुनी
राही । भीती जी छळते सदा
भयापासून
त्या सा र्या
। वाचवी गे आम्हास या।।25.2
नमस्कार असो
देवी । कात्यायनी पुनःपुन्हा।।25.3
ज्वालाकरालमत्युग्रमशेषासुरसूदनम्।
त्रिशूलं पातु
नो भीतेर्भद्रकालि नमोऽस्तुते।।26
( कराल – भीषण,भयानक । उग्र – दारुण, भीषण, हिंस्त्र, अत्यंत गरम )
ज्वाळांनी
वेढलेला हा । शूळ विक्राळ गे तुझा
धाडितो यमलोकाला
। दैत्यांनाचि समस्त या।।26.1
त्रिशूळानेची
ह्या देवी। आम्हासी रक्षिणे सदा
भयापासून
सा र्या
या । देई अभय सर्वदा।।26.2
नमस्कार असो
देवी । भद्रकाली पदी तुझ्या।।26
हिनस्ति दैत्यतेजांसि
स्वनेनापूर्य या जगत्।
सा घण्टा
पातु नो देवि पापेभ्यो नः सुतानिव।।27
( स्वन -
आवाज,
कोलाहल । हिनस्ति
/ हिंसति – हिंस् -
प्रहार
करणे, आघात करणे, ठार मारणे। )
सा
र्या
जगी घुमे माते । दैत्यां आव्हान जे दिले
मावळे तेज
दैत्यांचे । जेंव्हा तू ललकारते।।27.1
परावृत्त
करी माता । कुकर्मापासूनी मुला
पापकर्मातुनी
तैसे । माते वाचवि तू आम्हा॥27.2
करून नाद
घंटेचा । पापांची देई सूचना ।।27.3
असुरासृग्वसापङ्कचर्चितस्ते करोज्ज्वलः
शुभाय खड्गो
भवतु चण्डिके त्वां नता वयम्।।28
( असृज
- रक्त )
दैत्यांच्या
रुधिरामध्ये । खड्ग जे निथळे तुझे
तेजस्वी खड्ग
ते माते । करो कल्याण आमुचे
प्रणाम चंडिके
माते । शिवे मांगल्यदायिके।।28
(वृत्त – इंद्रमाला/उपजाती
, अक्षरे - 11, गण- ज,त,ज,ग ग/त त ज ग ग )
रोगानशेषानपहंसि तुष्टा।
रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान् ।
त्वामाश्रितानां न
विपन्नराणां । त्वामाश्रिता ह्याश्रयतां
प्रयान्ति ।।29
प्रसन्न होता
जननीच तूची । व्याधी मनाची,तनुचीच नाशी
रागावता हे
जननी परी तू । नाशी अभीष्टा मनिच्याच गे तू।।29.1
घेता तुझ्या
आश्रय पावलांचा । जाती विपत्ती सकला लयाला
येतीच जे जे तव आश्रयासी । सा र्या जगा आश्रयस्थान होती।।29.2
एतत्कृतं यत्कदनं
त्वयाऽद्य । धर्मद्विषां देवि महासुराणाम्
रूपैरनेकैर्बहुधात्ममूर्तिं ।
कृत्वाऽम्बिके तत्प्रकरोति काऽन्या।। 30
केलेस जे
तू शिरकाण माते। अधर्ममार्गी खल दुर्जनांचे
रूपेच नाना
प्रकटी करोनी । ह्या आत्मरूपातुन गे तुझ्याची
तैसे कुणा
का कधि शक्य होई। सामर्थ्य ऐसेचि कुणा न पाशी।।30
विद्यासु शास्त्रेषु
विवेकदीपेष्वाद्येषु वाक्येषु च का त्वदन्या।
ममत्वगर्तेऽतिमहान्धकारे विभ्रामयत्येतदतीव
विश्वम्।।31
( गर्त -
गुहा,
खाई )
ज्ञानस्वरूपीच
प्रदीप जेची । सन्मार्ग जे थोरचि दाविताती
विद्यांमधे
त्या, निगमात चारी, । शास्त्रातही वर्णन गे तुझेची ।।31.1
शक्ती नसे
गे तुजवीण ऐसी । दावीच जी मार्ग विवेकरूपी
माते परी
शक्ति असेच तूची । जी निर्मिते विभ्रम थोर चित्ती।।31.2
ममत्व अंधार
घनदाट राही । खाईत ऐशा भुलवी जगासी
लावून तेथे चकवा जगासी । पिशापरी तू फिरवी तयांसी।।31.3
रक्षांसि यत्रोग्रविषाश्च
नागा । यत्रारयो दस्युबलानि
यत्र ।
दावानलो यत्र
तथाब्धिमध्ये । तत्र स्थिता त्वं परिपासि विश्वम्।।32
( उग्र – भीषण, क्रूर, जंगली । अरय: -
अरि – शत्रू ।
दस्यु - चोर, लुटारु, अत्याचारी,)
फुत्कारती
नाग जिथे विषारी । अत्यंत हे भीषण हिंस्त्र भारी
जेथे लुटारू,ठग,चोर
यांच्या । सशस्त्र टोळ्या फिरती छळाया।।32.1
दावानलचे
अति जीवघेणे । थैमान चाले जलधीमधे जे
तेथेच खंबीरपणे
उभी तू । ‘तारीन हे विश्व’ धरून हेतू।।32.2
विश्वेश्वरि त्वं
परिपासि विश्वं । विश्वात्मिका धारयसीह विश्वम्।
विश्वेशवन्द्या भवती
भवन्ति । विश्वाश्रया ये त्वयि भक्तिनम्राः।।33
तू स्वामिनी
थोर असे जगाची । त्याच्या करी पालन पोषणासी
तू सर्व विश्वात
भरून राही । विश्वात्मिका तूच चराचरीही।।33.1
विश्वेश्वराच्या
बहु आदरासी । तू पात्र आहेस सदा भवानी
घेतीच जे
आश्रय पादपद्मी । अनन्य भावे तुजला स्मरोनी।।
होतीच ते
नम्रमूर्ती महात्मे । आधार विश्राम सदा जगाचे
।।33.3
देवि प्रसीद
परिपालय नोऽरिभीतेर्नित्यं यथासुरवधादधुनैव
सद्यः।
पापानि सर्वजगतां
प्रशमं नयाशु । उत्पातपाकजनितांश्च महोपसर्गान्।।34
जैसेचि संहारुन
दैत्य घोर । तू आज आम्हा बहु रक्षिलेस
तैसे करी
रक्षण तू सदैव । शत्रू-भयापासुन आमुचेच।।34.1
पापे हरोनीच
विनाशकारी । माते करी स्थापित विश्वशांती
दुर्वर्तनांच्या
परिपाक रूपी । लाभेचि जे दुःख फलस्वरूपी-
नाना अनिष्टे
बहु रोगराई । कृपाप्रसादे कर दूर आई।।34.2
(अनुष्टुप्
छंद )
प्रणतानां प्रसीद
त्वं । देवि विश्वार्तिहारिणि।
त्रैलोक्यवासिनामीड्ये ।
लोकानां वरदा भव।।35
विनम्र होऊनी
आलो । माते आम्ही तुझ्या पदी
विश्वाच्या
दैन्य दुःखासी । देवी तूचि निवारसी ।।
त्रैलोक्यवासी
हे सारे । आदरे तुज पूजिती
आशीर्वाद
सदा देई। वर देई जनांसही।।35
देव्युवाच ॥36 –
देवी म्हणाली ॥36–
वरदाहं सुरगणा
वरं यं मनसेच्छथ
।
तं वृणुध्वं
प्रयच्छामि जगतामुपकारकम् ।।37
“सुरांनो
वर मागावा आहे जो तुमच्या मनी
कल्याणास्तव
विश्वाच्या । वर देते तुम्हास मी”।।37
देवा उचुः
॥38 -
देव म्हणाले ॥ 38 –
सर्वाबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि।
एवमेव त्वया
कार्यमस्मद्वैरिविनाशनम्।।39
“मार्गामध्येच
येती ज्या । बाधा सर्व प्रकारच्या
त्याची दूर
करी देवी । त्रैलोक्यस्वामिनी सदा।।
मागणे एक
आहे गे। एक कार्यचि गे तुला
वै
र्याचा
आमुच्या सा र्या। विनाश करि तू सदा”
।।39
देव्युवाच ॥40 –
देवी म्हणाली ॥ 40 –
वैवस्वतेंऽतरे प्राप्ते
अष्टाविंशति मे युगे।
शुंभोनिशुंभश्चैवान्यावुत्पत्स्येते महासुरौ।।41
“मन्वंतरात
वैवस्वत् । युगे अठ्ठविसात या
येतील दैत्य
जन्माला। नाव शुंभ निशुंभ त्या।।41
नंदगोपगृहे
जाता यशोदागर्भसम्भवा।
ततस्तौ नाशयिष्यामि विन्ध्याचलनिवासिनी।।42
नंदगोप गृही
तेंव्हा । यशोदा उदरी अशी
जन्मा येईन
कन्या मी । ‘विंध्याचलनिवासिनी’
शुंभ निशुंभ
दैत्यांसी । ठार मारेन मी भुवी।।42
पुनरप्यतिरौद्रेण
रूपेण पृथिवीतले।
अवतीर्य हनिष्यामि
वैप्रचित्तांश्च दानवान्।।43
भीतीदायक
रूपासी। घेऊनी अति रौद्र मी
अवतीर्णचि
होवोनी। पुनश्च अवनीवरी
वैप्रचित्त
चि दैत्यांना । दावीन यमलोक ही।।43
भक्षयंत्याश्च तानुग्रान्
वैप्रचित्तान्महासुरान् ।
रक्तादन्ता भविष्यन्ति
दाडिमीकुसुमोपमाः।।44
खाईन मीच
दैत्यांना । उग्र भीषण त्या अती
माखलेलेचि
रक्ताने । मुख माझेचि पाहुनी
डाळिंबाच्या
फुलाजैसे । रक्तवर्णी भयंकरी।।44.1
ततो मां
देवताः स्वर्गे मर्त्यलोके
च मानवाः।
स्तुवन्तो व्याहरिष्यन्ति
सततं रक्तदन्तिकाम्।।45
म्हणतीलचि
सारे हे । स्वर्गातीलचि देवही
तसेच मर्त्य
लोकी या । माणसे म्हणतील ही
‘रक्तदंता’
मला तेव्हा। करोनि बहु ती स्तुती।।45
भूयश्च शतवार्षिक्यामनावृष्ट्यामनम्भसि।
मुनिभिः संस्मृता
भूमौ सम्भविष्याम्ययोनिजा।।46
पडेल एकदा
ऐसा । महा दुष्काळ भूवरी
पाऊस थेंब
ना तेंव्हा। पडेल धरणीवरी ।।46.1
जलथेंब ही
कोणाला । मिळेल नच शोधुनी
चालेल ही
अनावृष्टी । शतवर्षे भयंकरी ।। 46.2
व्याकूळ होऊनी
तेंव्हा । आठवी मजला मुनी
अयोनिजा स्वरूपी
मी । येईन पृथिवीवरी ।। 46.3
ततः शतेन
नेत्राणां निरीक्षिष्याम्यहं मुनीन्।
कीर्तयिष्यन्ति मनुजाः
शताक्षीमिति मां ततः।।47
माझ्याच शतनेत्रांनी
। अवलोकीन मी मुनी
गुण गातील
तेंव्हा हे। मुनी माझेच सर्वही
संबोधतील
मजला। ‘शताक्षी’ म्हणुनि मुनी ।।47
ततोऽहमखिलं लोकमात्मदेहसमुद्भवैः।
भरिष्यामि सुराः
शाकैरावृष्टेः प्राणधारकैः।।48
शाकंभरीति विख्यातिं
तदा यास्याम्यहं भुवि।।49
त्रैलोक्य
जन्मले सारे। माझ्या देहातुनीच जे
भरण पोषणा
त्याच्या । उपलब्ध करीन मी
खाद्यपाने
कंद आदि । नव जीवनदायिनी
प्रसिद्धीस
तदा जाई । ‘शाकंभरी’ म्हणून मी।।48/49
तत्रैव च वधिष्यामि
दुर्गमाख्यं महासुरम्
दुर्गादेवीति विख्यातं
तन्मे नाम भविष्यति।।50
तेंव्हा मी
दुर्ग दैत्यासी । निर्दाळीन भयंकरी
‘दुर्गादेवी’च
नामाने। होईन सुप्रसिद्ध मी।।50
पुनश्चाहं यदा
भीमं रूपं कृत्वा हिमाचले।
रक्षांसि भक्षयिष्यामि
मुनीनां त्राणकारणात्।।51
पुन्हा विशाल
रूपाने । प्रदेशात हिमाचली
ऋषिंना त्रास
देणा र्या
। भक्षीन असुरांस ही।।51
तदा मां
मुनयः सर्वे स्तोष्यंत्यानम्रमूर्तयः।
भीमादेवीति विख्यातं
तन्मे नाम भविष्यति।।52
करतील स्तुती
तेंव्हा । नम्र होवोनी हे मुनी
नामाभिधान
‘भीमा’ हे । माझे होईल त्या क्षणी।।52
यदारुणाख्यस्त्रैलोक्ये महाबाधां करिष्यति।
तदाहं भ्रामरं
रूपं । कृत्वाऽसंख्येयषट्पदम्।।53
अरुणाख्यचि
त्रैलोक्या । छळेल समयीच ज्या
रूप घेऊन
भुंग्याचे । येईन समयीच त्या
षट्पदांनीच
माझ्या या । नाशीन असुरास त्या।।53
त्रैलोक्यस्य हितार्थाय
वधिष्यामि महासुरम्।
भ्रामरीति च
मां लोकास्तदा स्तोष्यन्ति
सर्वतः ।।54
त्रैलोक्याच्या
हितासाठी । महादैत्य वधीन मी
उत्साहानेच जोशाने । गुण गातील सर्वही
ख्याती होईल सर्वत्र । तेव्हा माझीच ह्या जगी
भ्रामरी म्हणुनी सारे । प्रशंसा करतील ती ।।54
इत्थं यदा
यदा बाधा दानवोत्था भविष्यति ।
तदा तदावतीर्याहं
करिष्याम्यरिसंक्षयम्।।55
जेंव्हा जेंव्हा
असा देती । त्रास दुष्टचि दैत्य हे
तेंव्हा तेंव्हाच
घेऊनी । अवतार नवे नवे
येऊनी भूवरी
तेंव्हा । संहारीनचि दैत्य हे।।55
अरुंधतीने केलासे। अनुवादचि सर्व हा
मायबोलीमधे माझ्या । होण्या सुगम तो जना
अरुंधतीने केलासे। अनुवादचि सर्व हा
मायबोलीमधे माझ्या । होण्या सुगम तो जना
इति श्रीमार्कंडेयपुराणे
सार्वर्णिके मन्वन्तरे देवीमाहात्म्ये नारायणिस्तुति: संपूर्णा।।
अशी श्री मार्कंडेय
पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील नारायणी-स्तुती पूर्ण झाली
अरुंधतीने ह्या स्तोत्राचे मराठी भाषांतर पूर्ण केले.
अरुंधतीने ह्या स्तोत्राचे मराठी भाषांतर पूर्ण केले.
--------------------------------------------------------
ॐ तत् सत्
धनत्रयोदशी /1नोव्हेंबर,2013
No comments:
Post a Comment