।। #श्रीगणपतिस्मरणम् ।।


Image result for lord ganesha free download photos

                      हाती घेतलेले सत्कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणुन श्री गणेशाचे स्तवनपूजन करण्याचा प्रघात आहे. अनुवाद पारिजात ह्या पुस्तकाचा आरंभ करतांनाही श्री आद्यशंकराचार्य लिखित एका सुरेख अशा गणेश स्मरणाच्या सुबोध भावानुवादाने आपण सुरवात करु या. 

                         ह्या एकाच श्लोकात असलेल्या यमकअनुप्रास इत्यादि अलंकारांमुळे हे गणेशस्मरण प्रत्यक्षात स्मरणात राहण्यास सुद्धा सुंदर आणि सोपे झाले आहे.

(वृत्त - भुजंगप्रयातअक्षरे -12, गण - य य य य)

गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं

चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डम्

लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं

शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्।।

 

दान – दानोदकहत्तीच्या गंडस्थळातून पाझरणारा द्रवशौण्ड – कुशलदक्षतरबेज; लस् – चमकणेकान्डम् – खण्डअंशतुकडाशिवप्रेमपिण्ड् –प्रेमाने महटले जाते की माझा पोटचा गोळा आहे त्याप्रमाणे शिवाचा लाडका पोटचा गोळा. वक्रतुण्ड – दुष्ट प्रवृत्तिचेखल प्रवृत्तिचे लोक. त्यांना तुडवतोनष्ट करतो तो वक्रतुण्ड )

 

गणेशा गुणेशा तुला पूजितो मी । तुझे सुंदरा रूप चित्ती स्मरे मी

शिरी पाझरे त्याच दानोदकानी। सुवासीक ओलेति गंडस्थले ही।।1.1

 

किती भृंग झुंडी तिथे गुंजताती । रसास्वाद घेवोनि  ते लुब्ध होती

झुले सोंड तालात मोही मनासी । कटीबद्ध तू रक्षिण्या या जगासी।।1.2

 

सुळा एक शोभे तुझा हस्तिदंती । करी तूच निःपात आपत्तिचा ही

शिवाचा असे लाडका पुत्र तूची। करी दुष्ट संहार विघ्नेश मूर्ती।।1.3

----------------------------------------
 

#Ganeshstotram

#MarathiBhavanuvad

#लेखणीअरुंधतीची-

5 comments:

  1. Angel Arundhati you have done noble work for all marathi people across the world !
    Once again heartiest congratulations for your spiritual work ! ......Rajesh Ratnaparkhi , Nashik .

    ReplyDelete
  2. Thank you Rajesh. Please keep on visiting this blog. Every day I will keep on adding one or two new beautiful stotras. You may like it. Please pass on this blog address to more people. I hope people will enjoy it.
    Thanks.
    Arundhati.

    ReplyDelete
  3. To nice mam majhya aai la khub awadla

    ReplyDelete
  4. To nice mam majhya aai la khub awadla

    ReplyDelete
  5. Ganpatismarnam kuup Chan ahe. Mann prasana hote. Thank you madam.

    ReplyDelete