द्वादशज्योतिर्लिङ्गस्तोत्रम्
सौराष्ट्रदेशे
विशदेऽतिरम्ये
ज्योतिर्मयं
चन्द्रकलावतंसम् ।
भक्तिप्रदानाय
कृतावतारं
तं
सोमनाथं शरणं प्रपद्ये ।। १ ।।
(
पहिल्या ओळीत ‘‘विशदेऽतिरम्ये’’ किंवा ‘‘वसुधावकाशे’’ असा
पाठभेद आहे. ज्याला जो आवडेल तो घ्यावा. दोन्हीचे अर्थ भावानुवादात आले आहेत.)
(
विशद - स्वच्छ, पवि्त्र, निर्मल, उज्ज्वल, चमकदार, सुंदर, स्पष्ट, प्रकट, शान्त.
अवकाश –स्थान, क्षेत्र, जागा. चंद्रकलावतंसम्
– चंद्रकला अवतसम् अवतंसम् – अलंकार. चंद्रकलावतंसम्
म्हणजे चंद्रकला हीच ज्याचा अलंकार आहे असा तो शिव )
वसुंधरेच्या अति रम्य भागी
सौराष्ट्र येथे जलधी किनारी ।
वीची जिथे कांतिमती पवित्रा
शांतीसवे निर्मलता सतेजा ।। १.१ ।।
(वीची – लाटा)
ज्योती स्वरूपी प्रकटे तिथेच
तो सोमनाथ स्वरुपी महेश
भक्तांस देण्या दृढ भक्ति नित्य
सोमेश्वरी घे अवतार सत्य ।। १.२।।
शोभे अलंकार शिरी शिवाच्या
मनोज्ञ तो चंद्रकला
रुपी हा ।
त्या सोमनाथास प्रणाम माझा
तेजोनिधी आश्रयस्थान
साचा ।। १.३
।।
श्री
शैलशृङ्गे विबुधातिसङ्गे
शेषाद्रिशृङ्गेऽपि
सदा वसन्तम् ।
तमर्जुनं
मल्लिकपूर्वमेनं
नमामि
संसार-समुद्र-सेतुम् ।।२
ह्या श्लोकात पहिल्या
ओळीत विबुधातिसङ्गे किंवा विविधप्रसङ्गे व दुसर्या ओळीत शेषाद्रिशृङ्गेऽपि किंवा तुलाद्रितुङ्गेऽपि पाठभेद आहेत. दोन्ही
पाठभेदांचे भावानुवाद दिले आहेत.)
श्रीशैल
ह्या पर्वतराजि मध्ये
शेषाचलाच्या शिखरावरी गे ।
श्री
मल्लिका-अर्जुन ह्याचि नामे
प्रसिद्ध आहे स्थल शंभुचे हे ।।२.१।।
आकाशस्पर्शी
शिखरांसवे ह्या
होई कुणाची तुलना कधि का ।
वास्तव्य
येथेचि असे शिवाचे
दीनांवरी प्रेम दया तयासे ।।२.२ ।।
आहे
भवाचाच अथांग सिंधू
होई परी त्यावर हाच सेतू ।
साक्षात
गंगाधर पार नेई
भक्तांस त्याच्या सुखरूप ठेवी ।।२.३ ।।
येथेच
येती सुरवृंद सारे
येती रहाती वरचेवरी गे ।
साधू
महात्मे नित भेटती हे
पूजार्चना ही करण्यास येथे ।।२.४ ।।
भेटी
तयांच्या मिळती पहाया
प्रसंग ते अद्भुत दृश्य नेत्रा ।
भवाब्धि
सेतूस प्रणाम त्याची
त्या मल्लिका-अर्जुन ईश्वरासी ।। २.५ ।।
मुक्तिप्रदानाय
च सज्जनानाम् ।
अकालमृत्योः
परिरक्षणार्थं
वन्दे महाकालमहं
सुरेशम् ।। ३
( विहित – नियोजित, निर्धारित, निर्मित, सम्पन्न
)
अवन्तिका
ही नगरीच आता
उज्जयिनी हो म्हणुनी प्रसिद्धा
तेथे महांकाळ
म्हणून होई
शंभू शिवाचा अवतार पाही ।।३.१।।
द्यायाच मुक्ती
नित सज्जनांसी
अकालमृत्यू नित टाळण्यासी
देवांमधे
श्रेष्ठ असे सुरेश
तो शंभु घेई अवतार येथ ।।३.२ ।।
हुंकारमात्रे
खल सर्व नाशी
भक्तांस प्रेमे शिव जोचि तारी
काळासही वाटत
जोचि काळ
संज्ञा महांकाळचि प्राप्त त्यासी ।।३.३ ।।
सत्ता जयाचीच
निरंकुशा ही
चालेच भूतांवर नित्य ज्याची
शंभू-महांकाळ
सुरेश्वरासी
देवाधिदेवा, तुज वंदितो मी ।।३.४ ।।
कावेरिकानर्मदयोः
पवित्रे
समागमे सज्जनतारणाय
।
सदैव मान्धातृपुरे
वसन्तं
ओंकारमीशं
शिवमेकमीडे ।। ४
(ही कावेरिका नदी उत्तरेतील आहे. मान्धातृपुर मान्धाता नगरी. ह्या शिवलिंगाला ओंकारेश्वर, ओंकारनाथ, अमलेश्वर,
अमरेश्वर, विमलेश्वर अशी ही नावे आहेत.)
कावेरिकेच्या
सह त्या पवित्रा
आहे जिथे
संगम नर्मदेचा
सदैव मान्धातृपुरीमधे
त्या
असे शिवाचाच
निवास नित्या ।।४.१।।
करावया रक्षण
सज्जनांचे
ओंकारनाथस्वरुपी
प्रकाशे
ज्योतीरुपी
ह्या अमलेश्वराची
अनन्यभावे
करितो स्तुती मी ।। ४१.२ ।।
पूर्वोत्तरे
पारलिकाभिधाने
सदाशिवं तं
गिरिजासमेतम् ।
सुरासुराराधितपादपद्मं
श्री वैद्यनाथं
सततं नमामि ।। ५ ।।
दिशा मिळे
पूर्वचि उत्तरेला
दिशेस ईशान्यचि
त्या पवित्रा
श्रीवैद्यनाथे
परळी मधे ह्या
निवास केला
सह पार्वतीच्या ।। ५.१ ।।
गंधर्व वा
राक्षस देव दैत्य
यक्षांसवे
मानव मर्त्य जेथ
गौरी-गिरीशापदि
नम्र होत
त्या वैद्यनाथा
नमितो सदैव।। ५.२ ।।
आमर्दसंज्ञे नगरे च रम्ये
विभूषिताङ्गं विविधैश्च भोगैः ।
सद्भुक्ति-मुक्ति-प्रदमीशमेकं
श्रीनागनाथं शरणं प्रपद्ये
।। ६ ।।
(भोग
– नागाचा पसरलेला फणा )
आमर्दनामे
नगरीत रम्या
श्रीनागनाथासचि
सर्पमाला
नाना प्रकारे सजवी तनूला
त्यांचे उभारून फणे सुरम्या
।। ६.१ ।।
घेती लपेटून सदाशिवाला
प्रकार त्यांचे
किति हे अनंता
म्हणून ज्योतिर्मय
ह्या शिवास
येथेच संबोधति
नागनाथ ।। ६.२ ।।
भक्तांस द्याया
सुख भाग्य सारे
पवित्र ते
सात्विक भोग सारे
मुक्तिसुखाचाच प्रसाद थोर
येईच तो ईशचि
एकमेव ।। ६.३ ।।
त्या नागनाथा
नमितो सदा मी
आलो तयाच्या
नित आश्रयासी
संबोधती आजचि
त्यास औंढा
आहे महाराष्ट्रि
निवास त्याचा ।। ६. ४ ।।
सानन्दमानन्दवनेवसन्तं
आनन्दकन्दं हतपापवृन्दम्
।
वाराणसीनाथमनाथनाथं
श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये
।। ७ ।।
राहेच जो
सौख्यवनी सुखात
आनंदमूर्तीच
अनाथनाथ
नेई लया पापगिरी
समस्त
वाराणसीचा
प्रभु विश्वनाथ ।।७.१
त्या विश्वनाथा
अति नम्रभावे
माझे असो
वंदन ते सदाचे ।। ७. २
यो डाकिनीशाकिनिकासमाजे
निषेव्यमाणः पिशिताशनैश्च
।
सदैव भीमादिपदप्रसिद्धं
तं शङ्करं भक्तहितं नमामि
।। ८ ।।
डाकीण शाकीण
पिशाच सारी
वा भूत प्रेते
गण राक्षसादि ।
गंधर्व वा
किन्नर ज्यास मानी
त्यांच्या
वसे संगति नित्य जोची ।। ८.१
ज्याच्याच
साजेल पराक्रमासी
लाभे जया
भीम अशी उपाधी ।
प्रेमे जपे
भक्त हितास जोची
त्या शंकरा
मी नमितो सदाची ।। ८.२
श्रीताम्रपर्णीजलराशियोगे
निबध्य सेतुं निशिबिल्वपत्रैः
।
श्रीरामचन्द्रेण समर्चितं
तं
रामेश्वराख्यं सततं नमामि
।। ९ ।।
श्री ताम्रपर्णी
सरिता मिळे ती
रामेश्वराच्या
निकटी समुद्री ।
बांधीयला
सेतु जिथे समुद्री
श्रीराम आज्ञेवरुनी
कपींनी ।। ९.१
स्थापीयले
जे शिवलिंग तेथे
रामेश्वरम्
नाम प्रसिद्ध ज्याचे।
रात्रीस ज्या
पूजुन राघवाने
प्रस्थान
लंकेस सुसज्ज केले ।। ९.२
त्या लिंगरूपीच
सदाशिवासी
तेजोनिधीसी नमितो सदा मी ।। ९.३
सह्याद्रिशीर्षे विमले
वसन्तं
गोदावरीतीर-पवित्रदेशे
।
यद्दर्शनात्पातकमाशु नाशं
प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे
।।१०।।
( आशु - सत्वर )
सह्याद्रि
रांगात गिरीकुशीत
निसर्ग तो
निर्मळ जेथ शांत
गोदावरीच्याच
तिरी पवित्र
वास्तव्य
शंभू करितोच नित्य ।। १०.१।।
त्या चंद्रमौळी
शिवशंभुचेची
झाले जरी
दर्शन एकवेळी ।
जाती लया
सर्वच पापराशी
त्या त्रंबकेशा
नमितो सदा मी ।।१०.२
हिमाद्रि-पार्श्वेऽपितटे
रमन्तं
सम्पूज्यमानं सततं मुनीद्रैः।
सुरासुरैर्यक्ष -महोरगाद्यै
केदारसंज्ञं शिवमीशमीडे
।। ११ ।।
अत्युच्च
रांगात हिमालयाच्या
मंदाकिनी
- शांत तटी सुरम्या
केदार नामे
शिवलिंग शोभे
पूजी तया
किन्नर यक्ष सारे ।। ११.१
वा दैत्य
वा राक्षस सर्प सारे
पूजी महर्षीगण चित्तभावे
कल्याणकारी
शिव शंकरा त्या
भावे नमस्कार
असोचि माझा ।। ११.२
एलापुरीरम्यशिवालयेऽस्मिन्
समुल्लसन्तं त्रिजगद्वरेण्यम्
।
वन्दे महोदार-तर-स्वभावं
सदाशिवं तं धिषणेश्वराख्यम्
।। १२ ।।
( सम्मुलसन्तम् – अत्यंत चमकदार, अत्यंत आनंदी. वरेण्य – पूज्य,
अभिलषणीय, प्रमुख, पात्र. धिषणेश्वर – धिषणा – बुद्धी, बुद्धीचा ईश्वर तो धिषणेश्वर
)
त्रैलोक्य
माने अति पूज्य ज्यासी
प्रसन्नता
भूषविते मुखासी ।
स्वामी असे
जो मतिचा विवेकी
स्वभावतः
शंभु उदार भारी ।। १२. १ ।।
वेरूळच्या
त्या रमणीय स्थानी
शिवालयी भव्य
प्रशांत जागी ।
सदाशिवा मूर्त
स्वरुप येई
नमोनमः त्या
धिषणेश्वरासी ।। १२.२ ।।
एतानि लिङ्गानि सदैव मर्त्याः
प्रातः पठन्तोऽमलमानसाश्च
।
ते पुत्रपौत्रैश्च धनैरुदारैः
सत्कीर्तिभाजः सुखिनो भवन्ति ।।१३।।
म्हणे प्रभाती
नर स्तोत्र नेमे
प्रसन्न जो
निर्मल चित्तभावे ।
लाभे तया
वैभव ते गजान्त
कीर्ती मिळे
उत्तम निष्कलंक ।।१३.१।।
त्या पुत्र
पौत्रादि सुखेच सारी
मिळे समाधान
सदैव चित्ती ।।१३.२।।
ज्योतिर्मयं-द्वादश-लिङ्गकानां
शिवात्मनां प्रोक्तमिदं
क्रमेण ।
स्तोत्रं पठित्वा मनुजोऽतिभक्त्या
फलं तदालोक्य निजं भजेच्च
।। १४ ।।
शिवस्वरूपी शिवलिंग बारा
येथे क्रमे वर्णियली समस्ता
।
प्रत्यक्ष लाभे शिवदर्शनाने
नरास जे जे फळ श्रेष्ठ
सारे ।। १४. १
ते ते मिळे स्तोत्र म्हणे
तयासी
जो गातसे स्तोत्र प्रसन्न चित्ती ।। १४.२
----------------------------------------------------
श्रीमती रूपा भाटी यांच्या भाषणाचे मराठी रूपांतरण. लीना दामले (खगोलीना) मध्य भारतातली ज्योतिर्लिंगे आणि वसंत संपात - खगोलशास्त्रीय संबंध ज्योतिर्लिंग हा जो शब्द आहे त्यात ज्योती (ज्योतिष- खगोलीय ज्योती, तारे, तारका) आणि लिंग हे दोन शब्द एकमेकांशी जोडलेले आहेत. पुराणात एक कथा आली आहे. शिव पार्वतीच्या विवाहाच्या निमित्ताने सर्वच लोक हिमालयाजवळ जमले होते ,तिथे एकाच बाजूला सगळी गर्दी जमल्यामुळे पृथ्वीचा तोल ढळायला लागला. म्हणून महादेव अगस्त्यांना म्हणाले की हे तुम्हीच करू शकता. तुम्ही दक्षिण दिशेला जाल तेव्हा हिमालयाचा भार कमी होईल. तुम्हीच काही करा. या कथेत आपल्याला एक गोष्ट समजते की एक असा मार्ग आहे ज्यावरून अगस्त्य ऋषी निघाले. तिथे वाटेत अनेक तीर्थे आहेत. (तीर्थ याचा अर्थही पदयात्रा करून त्या ठिकाणी जाणे). भारतात जी १२ ज्योतिर्लिंगे आहेत , तशी तर ६४ आहेत असे म्हणतात, त्यातली बरीचशी ज्योतिर्लिंगे भारताच्या मध्यातल्या एका पट्ट्या मध्ये येतात. जणू काही ती तोल सांभाळायचा प्रयत्न करताहेत. पण कुठल्या प्रकारे हा तोल सांभाळला जातोय? मात्र या ठिकाणी काही महत्वपूर्ण घटना घडल्या असतील म्हणून ही ज्योतिर्लिंगे या ठिकाणी आहेत. तसेच अजून एक गोष्ट लक्षात घेण्या सारखी आहे ती म्हणजे उज्जैन,अवंतीपुरी म्हणजेच अवंती इ ठिकाणे फार महत्वाची अशी आहेत, ती या पट्ट्यात आहेत. तिथे महाकालेश्वर, ओंकारेश्वर इ शिव मंदिरे आहेत. आता ग्रीनविच जवळून जाणारे prime मेरीडिअन ब्रिटिश काळाच्या आधी भारतातुन जाते असे समजले जात होते, तेही उज्जैन वरून जात होते. या मधल्या महत्वपूर्ण अशा पट्ट्यावर सूर्य कसा व कुठल्या दिशेने उगवतो, मावळतो आणि त्याचा शिवलिंगाशी कसा संबंध आहे ते बघूया. वसंत संपात आणि शरद संपात या दोनच दिवशी सूर्य अगदी बरोबर पूर्वेला उगवतो आणि बरोबर पश्चिमेला मावळतो. एरवीच्या दिवशी सूर्य अगदी परफेक्ट पूर्वेला ऊगवत नाही आणि परफेक्ट पश्चिमेला मावळत नाही. तसेच सूर्याचा आकाशातला मार्ग ही नेहेमीच चित्रात दाखवल्या प्रमाणे असा तिरकाच असतो. कारण पृथ्वीचा अक्षीय कल. जो 23.5 अंश आहे. पृथ्वीचा अक्ष ecliptic शी 23.5 अंशाचा कोन करतो. वसंत संपाता पासून शरद संपाता पर्यंत सूर्य उत्तर गोलार्धात उगवतो आणि मावळतो. तेव्हा तिथे उन्हाळा असतो आणि दक्षिण गोलार्धात हिवाळा. उत्तर गोलार्धात आपण दक्षिणायनारंभ अनुभवतो. सूर्य सगळ्यात उत्तरेच्या बिंदू वरून परत दक्षिणेकडे जायला फिरतो तो दक्षिणायनारंभ. शरद संपाता नंतर सूर्य दक्षिण गोलार्धात उगवतो आणि मावळतो. ज्योतिषशास्त्र (खगोलशास्त्र) सूर्यावर अवलंबून आहे. २१ जून ला सूर्य सगळ्यात उत्तरदिशेला असतो आणि तिथून त्याचा खालच्या दिशेला (दक्षिणेला) प्रवास सुरु होतो. हळू हळू सूर्य खाली उतरत जातो. वसंत संपात दिनी सूर्य शून्य अंश अक्षांशावर पूर्वेला उगवतो. हळू हळू त्याच्या उगवण्याचा बिंदू वर वर सरकत जाऊन दक्षिणायनारंभाच्या दिवशी (summer
solstice च्या दिवशी) सगळ्यात उत्तरेचा बिंदू म्हणजे २३.४४ अंशावर उगवतो, भारतात उज्जैनच्या अक्षांशावर. त्यानंतर मग परत तो सरकत खाली खाली जातो. परत 0 अंशावर आला की शरद संपात सुरू होतो. तिथून सूर्य खाली खाली सरकत जाऊन उत्तरायणाच्या आरंभाच्या दिवशी (winter solstice) सगळ्यात खालच्या बिंदूवर म्हणजे २३.४४ अंशावर उगवतो. शरद संपात दिनी उज्जैनच्या अक्षांशावर सूर्य कशा तऱ्हेने उगवतो आणि त्याची सावली पृथ्वीवर कशी पडते ते बघूया. सूर्य पूर्वेला उगवतो, चित्रात दाखवला आहे तो हिरवा पृथ्वीचा गोल समजा. त्याच्या मध्यबिंदूवर, विषुववृत्तावर एक शंकू उभा केला आहे. Animation मध्ये सूर्याची सावली कशी पडत जाते ते दाखवले आहे. संपात दिनाच्या दिवशीच ती सावली एका सरळ रेषेत पडते. चित्रात ती सावली शंकूपासून थोड्या अंतरावर दिसते, ते अंतर म्हणजे त्या ठिकाणचे अक्षांश. इतर दिवशी सावली मध्यरेषेपासून दूर जाते, एका सरळ रेषेत रहात नाही. इथे चित्रात ते अंतर २३.५ अंश उत्तर आहे कारण आपण उज्जैनच्या अक्षांशाचा विचार केला आहे. दिल्लीमध्ये शंकू स्थापित केला तर सावली दिल्लीच्या अक्षांशावर म्हणजे साधारण २८ अंशावर दिसेल. सरळ सावली पडते याचा अर्थ सूर्य बरोबर पूर्वेला उगवून बरोबर पश्चिमेला मावळतो. त्यामुळे अगदी exact उत्तर आणि दक्षिण दिशा सुद्धा समजते. हा दिवस वास्तू संबंधित कार्य करण्यासाठी महत्वाचा असतो. असे दोनच दिवस आपल्याला मिळतात. शरद संपात आणि वसंत संपात, याच दोन दिवशी पूर्वीपासून वास्तू निर्माणाचे काम सुरू केले जात असे. हल्ली आपण कंपास चा वापर करतो पण त्यात १३ अंशाचा फरक पडतो. वरील पद्धतीत कुठलीही चूक होत नाही. वर आपण वाचले की संपात दिनी सूर्याची सावली जमिनीवर एका सरळ रेषेत पडते त्याचाच उपयोग दक्षिणेतील पद्मनाभ मंदिरात केला आहे. सुर्य मावळताना एका सरळ रेषेत खाली उतरतो. पद्मनाभ मंदिराच्या गोपुरात एका सरळ रेषेत असलेल्या छिद्रांमधून (खिडक्यातून) मावळता सूर्य खाली खाली सरळ रेषेत सरकत जाताना दिसतो. ते बघायला अनेक लोक संपात दिनी तिथे येतात. महादेवाच्या अनेक मंदिरात गोपुराच्या छतावर छिद्र केले जात असे जिथून सूर्याची किरणे शिव पिंडीवर पडत. ज्या वेळी मंदिरेच नव्हती त्याही वेळी पिंडी च्या सावली वरून त्या काळी लोकांना वर्षातला कुठला काळ, मास आणि ऋतू कुठले ते समजे. आता आपण सूर्य जेव्हा परम क्रांतीवर असेल तेव्हा म्हणजे summer
solstice, २३.५ अंश उत्तरेला असेल तेव्हा त्याची सावली कशी आणि कुठे पडते ते बघू. मधला शंकू म्हणजे शिवलिंग समजू. अँनिमेशन मध्ये दाखवल्या प्रमाणे सावली मधल्या रेषेपासून दूर पडते. परम क्रांतीच्या दिवशी महाकाल मंदिराच्या बाबतीत मध्यान्हीला पिंडीची सावलीच पडत नाही. ही घटना खुप अद्भुत आहे. महाकाल मंदीरावर जर छत नसते तर पिंडीवरून असाच सूर्य जाताना सावली पडली नसती. त्यामुळे पहिलं ज्योतिर्लिंग किंवा पिंडी जेव्हा उभी केली असेल तेव्हा सावलीच लुप्त होते या घटनेने त्या काळी लोक अचंबीत झाले असतील. आणि त्या जागेचा महिमा वाढला असेल. ही आपली प्राचीन ग्रामीण परंपरा आहे. आदिवासी लोकांमध्ये आजही एक प्रथा आहे की जंगलाच्या सीमेवर ते एखादा उभा पाषाण स्थापित करतात. त्याला देव मानून त्याची परवानगी घेऊन ते जंगलात आपल्या कामाला जातात. अशा तऱ्हेने पाषाणाची स्थापना करण्याची प्रथा पडली असावी. जसे इंग्लंड मधील स्टोन हेंज उभारले गेले आणि त्याचा संबंध धार्मिक आणि खगोलशास्त्र दोन्हीशी प्रस्थापित केला गेला तसेच आपल्याकडेही शिवलिंगाचा ज्योतिष शास्त्राशी संबंध प्रस्थापित केला गेला असावा. आता आपण कर्क वृत्तावर असलेल्या किंवा त्याच्या वर असलेल्या सुर्यमंदिरांबद्दल माहिती घेऊया. २३.५ अंश अक्षांशावर म्हणजे कर्क वृत्तावर गुजराथ मधले मोढेरा मंदिर आहे. मोढेरा मंदिर बरोबर २३.५८३५° उत्तर या अक्षांशावर आहे. Summer solstice च्या दिवशी म्हणजे दक्षिणायनारंभा च्या दिवशी या मंदिराची सावली पडत नाही. हे एक प्रकारे sun dial म्हणूनही काम करते. आणि लेखिका असे आवाहन करते की सर्वांनी ते दक्षिणायनारंभा च्या दिवशी जरूर बघावे. तसेच कोणार्क चे सूर्यमंदीर १९.८८७६°उत्तर या अक्षांशावर आहे. सुर्यामुळे सावली त्या रथचक्रावर पडते. सूर्य जसा हलतो तशी सावली हलत जाते त्यावरून आपल्याला वेळ समजते. दिवस छोटा मोठा झालेलाही यावरून समजतो. आपल्या पृथ्वीचा अक्ष जो २३.५° अंशाने कललेला आहे तो प्राचीन काळी २४.५° पासून २२.५° पर्यंत कलत होता. हे बदल साधारण ४०,००० वर्षांच्या दरम्यान होतात. जेव्हा आपला अक्ष २२.५° अंशाने कलला होता तेव्हा २२.५° अंश वृत्तावर मांधाता बांधले गेले आहे का? शिवलिंग स्थापित करून आपले पूर्वज वेगवेगळी अक्षांशे आरेखित करत होते का? शून्य सावलीचा परिसर शोधून तिथे शिवलिंग स्थापित करत होते का? महाकाल मंदिर २३.५° वर आहे तर मांधाता २२.५° वर अक्ष असताना बांधले गेले आहे का? आपले पूर्वज एका ठिकाणचे शिवलिंग उचलून दुसऱ्या ठिकाणी नेत होते असे तर नाही ना? आपले पूर्वज एवढे सूक्ष्म निरीक्षण करत होते का? या साठी अर्वाचीन काळातील एक उदाहरण देता येईल. उज्जैन येथे एक observatory राजा सवाई जयसिंग यांनी १७०० च्या दरम्यान स्थापन केली होती. तिथले जे sun dial आहे ते आता योग्य समय दाखवत नाही पण जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा योग्य समय दाखवत होते, कारण आता ३०० वर्षांच्या काळाचा फरक पडला आहे. एवढ्या वेळा मध्ये अगदी सूक्ष्म फरक पडला असला तरी योग्य समय दाखवत नाही. काळा नुसार त्यात बदल करावेच लागतात. त्यामुळे ती observatory दुसऱ्या ठिकाणी हलवणे जरुरी आहे. स्वतः राजा सवाई जयसिंग यांनीही प्राचीन काळची नाडी यंत्रे जी त्या काळात योग्य वेळ दाखवत होती ती दाखवेनाशी झाली म्हणून त्यांचे स्थान बदलले होते. त्यांचे पुनर्निर्माण केले होते. संपात दिनाच्या दिवशी जी सरळ रेषा मिळते ती स्थिर असते पण solstice च्या वेळी अक्षाच्या कलण्यामुळे जो बदल होतो त्याने आपले अक्षांश तर नाही बदलत पण सूर्याची सावली बदलत जाते. जिथे शून्य सावली दिसत होती ती जागा बदलत जाते. मांधाता हा राजा अति प्राचीन काळात होऊन गेला आहे. इक्षवाकु वंशातला रामाच्याही खूप आधीच्या काळातला हा राजा होता. आताच्या नवीन शोधांप्रमाणे (श्री. निलेश ओक यांच्या) रामायण १४००० वर्षांच्या पूर्वी घडले . त्याही आधीच्या काळात हा राजा मांधाता होऊन गेला आहे. साहजिकच त्याच्या नावाचे मंदिर बांधले गेले तेही अति प्राचीन काळी असेल आणि त्यावेळी पृथ्वीच्या अक्षाची स्थिती २२.५° अशी असेल. म्हणून ते मंदिर तिथे बांधले गेले. मांधाता या इकक्षवाकू वंशातील प्राचीन राजाचा काल या संबंधीचे संशोधन रुपाजींनी केले आहे, ते Tale of Three Cities या लवकरच प्रकाशीत होणाऱ्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. आपण अशी आशा करूया की लवकरच ते आपल्या हाती येईल. धन्यवाद. *लीना दामले (खगोलीना)*