अखण्डे सच्चिदानन्दे । निर्विकैल्पैकरूपिणि
स्थितेऽद्वितीयभावेस्मिन्कथं पूजा विधीयते
।। 1 ।।
निर्विकार निराकारी एकरूप अखंड जो
भेद नाही जया ठायी । सत् चित् आनंदरूप जो
।
परब्रह्मस्वरूपी तो । भाव अद्वैत जागता
दृढ होता हृदी कैसे । पूजावे परमेश्वरा ।।
1 ।।
पूर्णस्यावाहनं कुत्र । सर्वाधारस्य चासनम्
स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं च । शुद्धस्याचमनं
कुतः ।। 2 ।।
व्यापून विश्व जो राहे । आवाहन कसे तया
असे आधार विश्वाचा । त्या कैसे अर्पु आसना
निर्मळासीच त्या द्यावे । कैसे पाय धुण्या
जल
आचमन कसे द्यावे । आहे जो शुद्ध निर्मल ।।
2 ।।
निर्मलस्य कुतः स्नानं । वासो विश्वोदरस्य
च।
अगोत्रस्य त्ववर्णस्य । कुतस्तस्योपवीतकम्
।। 3 ।।
मळ नाही जया त्यासी । घालावे स्नान ते कसे
ज्या पोटी विश्व सामावे । वस्त्र त्या कोणते
भले
वर्ण गोत्र नसे ज्यासी । नसे आश्रम कोणता
यज्ञोपवीत त्या कसे । कर्माधिकार ना जया
।। 3 ।।
निर्लेपस्य कुतो गन्धः । पुष्पं निर्वासनस्य
च
निर्विशेषस्य का भूषा । कोऽलङ्कारो निराकृतेः
।। 4 ।।
गंध लेपन त्या कैसे । लागे ना लेपही जया
जयासी वासना नाही । पुष्प वासार्थ काय त्या
विश्वरूपे नटे जोची । सजवावे कसे तया
आकारही नसे ज्यासी । भूषवावे कसे तया ।। 4 ।।
निरञ्जनस्य किं धूपैर्दीपैर्वा सर्वसाक्षिणः
।
निजानन्दैकतृप्तस्य नैवेद्यं किं भवेदिह
।। 5 ।।
संसारधर्म नसे त्यासी । धूप दावावा कसा
सर्वसाक्षी असे त्याला । लावावा कोणता दिवा
स्वस्वरूपी रमे जोची । निजानंदीच तृप्त जो
अर्पावा कोणता कैसा । स्वादु नैवेद्य त्यास
तो ।। 5 ।।
विश्वानन्दयितुस्तस्य किं ताम्बूलं प्रकल्प्यते
।
स्वयंप्रकाशचिद्रूपो योऽसावर्कादिभासकः ।।
गीयते श्रुतिभिस्तस्य नीराजनविधिः कुतः ।।
6 ।।
असे स्वयंप्रकाशी जो । तेज देईच भास्करा
प्रकाशित करी चंद्रा । देई अग्नीस उष्णता
वेदांनी वर्णिले ऐसे । दीप त्या उजळी कसा
विश्व मोदे भरे त्यासी । तांबूल सुखवी कसा
।। 6 ।।
प्रदक्षिणमनन्तस्य प्रणामोऽद्वयवस्तुनः ।
वेदवाचामवेदस्य किं वा स्तोत्रं विधीयते
।। 7 ।।
अनंत अक्षयासी त्या । घालू कैची प्रदक्षिणा
दक्षिणा काय द्यावी त्या । तयाहून दुजी तया ।।
द्वैत नाही जिथे तेथे । प्रणाम करणे कुणा
वेद ज्याच्यापुढे मौन । स्तुति स्तोत्रे फुकी तया ।। 7
।।
अन्तर्बहिश्च पूर्णस्य कथमुद्वासनं भवेत्
।
एकमेव परा पूजा सर्वावस्थासु सर्वदा ।।
एकबुद्ध्या तु देवेशे विधेया ब्रह्मवित्तमैः
।। 8 ।।
अर्न्तबाह्यचि सर्वत्र । सर्वकाळी असे सदा
आवाहन तया कैसे । करू कैसे विसर्जना ।।
परब्रह्मस्वरूपी त्या । परेशासीच सर्वदा
रूप अद्वैत जाणोनी । पूर्णरूपी गजानना ।।
भजावे ब्रह्मवेत्यांनी । चित्त एकाग्र ठेऊनी
परा पूजा करावी ही । सर्वावस्थेमधे मनी ।। 8 ।।
विकारी नाम संवत्सर भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषिपंचमी ) 3 सप्टेंबर 2019