अखण्डे सच्चिदानन्दे निर्विकल्पैकरूपिणि ।
स्थितेऽद्वितीयभावेऽस्मिन्कथं पूजा विधीयते ॥1
व्यापून टाकिता विश्वा । ओतःप्रोतचि
सर्वदा
अद्वैत रूप तत्त्वाने । सर्वकाळीच
सर्वदा
सच्चिदानंदरूपासी । नसे स्थित्यंतर
जया
निराकार असे जेची । भेद ना
कुठला जया ॥1.1
अद्वैताचेच त्या होता । अधिष्ठान
हृदि दृढा
अर्पावी त्या तया कैसी । पूजा
हे न कळे मला ॥1.2
पूर्णस्यावाहनं कुत्र । सर्वाधारस्य चासनम्
स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं च । शुद्धस्याचमनं कुतः ॥2
सर्वत्र भरला त्यासी । समीप बोलवू कसे
आधार विश्वाचा जो । अर्पू त्या
आसना कसे
असे शुद्ध अत्यंत । त्यास प्रक्षाळण्या
कसे
अर्घ्य पाद्य देऊ मी । आचमनही
वा उगे ।।2
निर्मलस्य कुतः स्नानं । वासो विश्वोदरस्य च।
अगोत्रस्य त्ववर्णस्य कुतस्तस्योपवीतकम् ॥3
निष्कलंक असे त्यासी । स्नाना
प्रयोजन नसे
ज्या पोटी विश्व सामावे । वस्त्र
त्या कुठले कसे
वर्ण गोत्र जया नाही । आश्रमांचे निबंधन
यज्ञोपवीत त्या भावे । करू
कैसेचि अर्पण ॥3
निर्लेपस्य कुतो गन्धः । पुष्पं निर्वासनस्य च ।
निर्वैशेषस्य का भूषा । कोऽलङ्कारो निराकृते॥ 4
जो अलिप्त सर्वातूनी । गंध-लेपन
त्या कसे
वासनारहितासी त्या । फूल वासास
कोण दे
जगता भूषवी त्यासी । भूषवू
ना कळे कसे
निराकारा अलंकारे । सजवू मी
कसे कसे ॥ 4
निरञ्जनस्य किं धूपैर्दीपैर्वा सर्वसाक्षिणः ।
निजानन्दैकतृप्तस्य नैवेद्यं किं भवेदिह ॥5
अज्ञानरहितासी त्या । सर्वसाक्षी
निरंजना
ज्ञानरूपास त्या कैसे । लावू
धूप नीरांजना
आनंदकंद जो आहे । स्वस्वरूपी
रमे सदा
नित्य-तृप्तास त्या द्यावा
। कोणी नैवेद्य कोणता ॥5
विश्वानन्दयितुस्तस्य किं ताम्बूलं प्रकल्प्यते
स्वयंप्रकाशचिद्रूपो योऽसार्वकादिभासकः
गीयते श्रुतिभिस्तस्य नीराजनविधिः कुतः ॥6.
'आनंदघन जो वर्षे । सौख्य मोद
जगी सदा
तया तांबूल देणे ही । हास्यास्पद
असे क्रिया
स्पर्शता दीप दीपासी । दुजा
उजळे तत्क्षणी
स्वतेजे तेवूनी तैसा । सूर्य
चंद्र प्रकाशवी ॥
प्रज्ज्वलीत करे अग्नी । धग
ज्वालांस देऊनी'
गौरवोनी असे ज्यासी । वेद गातीच
थोरवी
ज्योतीने आरती कैसी । तेजाची
करणे भली
दीपकाच्या प्रकाशी का । निरखावे
तया कुणी ॥6
प्रदक्षिणमनन्तस्य । प्रणामोऽद्वयवस्तुनः ।
वेदवाचामवेद्यस्य । किं
वा स्तोत्रं विधीयते ॥7
अनंत अक्षयाची या । शक्य का
ती परिक्रमा
घनदाटचि सर्वत्र । त्यास कायचि
दक्षिणा
बघता विश्वरूपाते । `मी' ही
जाणीव ओसरे
मीपणा संपता माझा । नमे कोण कुणापुढे ॥
न कळे आम्हा ह्याचे । रूप अद्भुत
आगळे
ऐसेच म्हणुनी जेथे । वेद स्तब्धचि
जाहले
ऐशा ह्या परमात्म्याची । स्तुति
स्तोत्रेच साजिरी
काय गावी पामराने । रजा घेईच
वैखरी ॥ 7
अन्तर्बहिश्च पूर्णस्य । कथमुद्वासनं भवेत् ।
एवमेव परा पूजा । सर्वावस्थासु सर्वदा ॥
एकबुद्ध्या तु देवेशे । विधेया ब्रह्मवित्तमैः ।।8
अन्तर्बाह्य सदा राहे । व्यापुनी
जगता उरे
काळातीत असे जोची । त्या विसर्जन
ना उरे
ऐशा ब्रह्मास जाणोनी । घेई
ज्यांची मती सदा
तयांनी एकचित्ताने । आचरावी
परा-पूजा ॥8
असो अवस्था ती काही । बाल तारुण्य
वा जरा
असावा परमेशाचा । ध्यास एकचि
अंतरा
परा-पूजा अद्वितीया । शंकराचार्य
सांगती
तिला ठेवी मराठीच्या । सिंहासनी
अरुंधती॥8
---------------------------------------------------------------

दुर्मुखनाम सवत्सरे वैशाख पौर्णिमा (बुद्ध पौर्णिमा ) 21 मे 2016