ह्या एकाच श्लोकात असलेल्या यमक, अनुप्रास इत्यादि अलंकारांमुळे हे गणेशस्मरण प्रत्यक्षात
स्मरणात राहण्यास सुद्धा सुंदर आणि सोपे झाले आहे.
(वृत्त - भुजंगप्रयात, अक्षरे -12, गण - य य य य)
गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं
चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डम्
लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं
शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्।।
( दान – दानोदक, हत्तीच्या
गंडस्थळातून पाझरणारा द्रव; शौण्ड – कुशल, दक्ष, तरबेज; लस् – चमकणे; कान्डम् – खण्ड, अंश, तुकडा; शिवप्रेमपिण्ड् –प्रेमाने
महटले जाते की माझा पोटचा गोळा आहे त्याप्रमाणे शिवाचा लाडका पोटचा गोळा. वक्रतुण्ड – दुष्ट
प्रवृत्तिचे, खल प्रवृत्तिचे लोक. त्यांना तुडवतो, नष्ट करतो तो वक्रतुण्ड )
गणेशा गुणेशा तुला पूजितो मी । तुझे सुंदरा रूप चित्ती
स्मरे मी
शिरी पाझरे त्याच दानोदकानी। सुवासीक ओलेति गंडस्थले ही।।1.1
किती भृंग झुंडी तिथे गुंजताती । रसास्वाद घेवोनि ते लुब्ध
होती
झुले सोंड तालात मोही मनासी । कटीबद्ध तू रक्षिण्या या
जगासी।।1.2
सुळा एक शोभे तुझा हस्तिदंती । करी तूच निःपात आपत्तिचा ही
शिवाचा असे लाडका पुत्र तूची। करी दुष्ट संहार विघ्नेश
मूर्ती।।1.3
----------------------------------------
#Ganeshstotram
#MarathiBhavanuvad
#लेखणीअरुंधतीची-