।। लक्ष्मीनृसिंहपञ्चरत्नम् ।।


Image result for लक्ष्मीनृसिंह pictures
                  पाच अमूल्य रत्नांप्रमाणे पाच अमोघ श्लोक असलेले हे स्तोत्र फारच सुंदर आहे. श्री रामदासस्वामींनी मनाला जसा उपदेश केला तसाच श्री आद्यशंकराचार्यांनी केलेला हा मनोबोधच आहे.
             ज्याप्रमाणे आरशातील आपले प्रतिबिंब सुंदर दिसावे म्हणून आपण स्वतःचे मुख किंवा शरीर (म्हणजे बिंब) दागिन्यांनी सजवतो त्याप्रमाणे जीव (म्हणजेच आत्म्याचे अन्तःकरणात पडलेले प्रतिबिंब) सुंदर व्हावे असे वाटत असेल तर लक्ष्मीनरसिंहाच्या रूपाचे आपल्या मनात अनन्य भावाने ध्यान करावे असे आचार्य म्हणतात.
      
                ज्या प्रमाणे अनंतफंदीच्या `बिकट वाट वहिवाट नसावी ' ह्या फटक्यामधे (वृत्ताचे नाव फटका किंवा हरिभगिनी) प्रत्येक ओळीत 30 मात्रा असतात त्याप्रमाणे ह्याही स्तोत्राच्या प्रत्येक ओळीत 30 मात्रा आहेत. यति 8,16, 24 वर आहे. पण फटक्यामधे काही चरणांच्या जोड्यांनंतर 14 मात्रांच्या ओळींचा अंतरा असतो तसा ह्यात नाही.

(स्तोत्र म्हणतांना कुठे थांबावे हे कळण्यासाठी प्रत्येक ओळीतील ते अक्षर Bold  गडद रंगात दिले आहे.)
त्वत्प्रभुजीव-प्रियमिच्छसि चेन्नरहरि-पूजां कुरु सततं
प्रतिबिम्बालंकृति-धृति-कुशलो बिम्बालंकृतिमातनुते ।
चेतोभृङ्ग भ्रमसि वृथा भवमरुभूमौ विरसायां
भज भज लक्ष्मीनरसिंहानघ-पद-सरसिज-मकरन्दम् ।। 1
 ( प्रभु - स्वामी, अधिपती,शासक, )

मना मधुकरा भलेचि व्हावे असे वाटते तुला जरी
मन-भृंगा हे ऐक ऐक रे गोष्ट हिताची तुझ्याच ही
जीव असे तव मालक बाबा समजुन घे हे सत्य उरी
जीव सुखी तर सुखीच तू रे विसरु नको ही मेख खरी ।। 1.1

जीव असे तो परमात्म्याची चैतन्याची एक छबी
उमटे अन्तःकरणी जी रे प्रतिबिंबात्मक रूप धरी
दर्पणि दिसण्या आकर्षक छबि मुखास सजवी कुशल कुणी
घालुन नाना अलंकार ते देहावरती योग्य रिती  ।। 1.2

म्हणुनी भजता अनन्य भावे बिंबरूप त्या नरसिंहा
ध्याता होतो ध्येयरूप रे सोऽहं येते अनुभवता
मना माझिया कल्याणाची मनी कामना तुला जरी
शरणचि जावे नरहरिसी त्या धावा त्याचा नित्य करी

मना- मधुकरा फुका फिरसि का  निरस अशा ह्या संसारी
मरुभूमी ही इथे न मधु रे व्यर्थ गुंजना तू न करी
लक्ष्मीनरसिंहाच्या पाव पदकमलांची कास धरी
अनुपम सुख-मधु मिळेल तुजला तृप्त करे जो जन्मभरी ।। 1.3

Image result for लक्ष्मीनृसिंह pictures


शुक्तौ रजत-प्रतिभा जाता कटकाद्यर्थ-समर्था चेद्
दुःखमयी ते संसृतिरेषा निर्वृतिदाने निपुणा स्यात् ।
चेतोभृङ्ग भ्रमसि वृथा भवमरुभूमौ विरसायां
भज भज लक्ष्मीनरसिंहानघ-पद-सरसिज-मकरन्दम् ।। 2
(शुक्तिः - शिंपला, रजत-प्रतिभा - चांदीचा/ चांदीच्या रुपयांचा आभास, निर्वृति - संतृप्ति, प्रसन्नता, सुख, आनंद )      

पुळणीवरती दुरून दिसती  शिंपा चमचम रुप्यासमा
चांदीचे परि रुपये तेची  देउन सोने मिळेल का?
संसारासी तसे समजसी  आनंदाचा खजिना हा
येती रोरावत आपत्ती  माथी दुःखाची छाया ।। 2.1
( पुळण- समुद्रकिनारा किंवा त्यावरील रेती, वाळू )
मना- मधुकरा फुका फिरसि का   निरस अशा ह्या संसारी
मरुभूमी ही इथे न मधु रे मकरंदाची आस धरी
लक्ष्मीनरसिंहाच्या पाव पदकमलांची कास धरी
अनुपम सुख-मधु मिळेल तुजला तृप्त करे जो जन्मभरी ।। 2.2

Image result for लक्ष्मीनृसिंह pictures
आकृति-साम्याच्छाल्मलि-कुसुमे स्थलनलिनत्व- भ्रममकरोः
गन्धरसाविह किमु विद्येते विफलं भ्राम्यसि भृशविरसेऽस्मिन् ।
चेतोभृङ्ग भ्रमसि वृथा भवमरुभूमौ विरसायां
भज भज लक्ष्मीनरसिंहानघ-पद-सरसिज-मकरन्दम् ।।3

काटेसावर फुलता भासे कमळे ही तर भूवरची
मनभृंगा त्या रंगरुपाला भुलुनी जाशिल जर जवळी 
सुवास कुठला, मधही कुठला भ्रमनिरास होईल मनी
व्यर्थचि जाईल गुंजारव त हिंपुटि होशिल घे ध्यानी ।। 3.1

मना- मधुकरा फुका फिरसि का  निरस अशा ह्या संसारी
मरुभूमी ही इथे न मधु रे मकरंदाची आस धरी
लक्ष्मीनरसिंहाच्या पाव पदकमलांची कास धरी
अनुपम सुख-मधु मिळेल तुजला तृप्त करे जो जन्मभरी ।। 3.2
Image result for लक्ष्मीनृसिंह pictures
स्त्रक्चन्दन-वनितादीन्विषयान्सुखदान्मत्वा  तत्र विहरसे
गन्धफली-सदृशा ननु तेऽमी भोगानन्तरदुःखकृतः स्युः ।
चेतोभृङ्ग भ्रमसि वृथा भवमरुभूमौ विरसायां
भज भज लक्ष्मीनरसिंहानघ-पद-सरसिज-मकरन्दम् ।। 4
(गन्धफली - चाफा )
( चाफ्याला षट्पदातिथि किंवा भृङ्गमोही  असे म्हणतात म्हणजे भुंगे अतिथीप्रमाणे त्याच्याकडे धाव घेतात. पण त्याच्या गंधाच्या सेवनाने भुंग्यांना मोह म्हणजे मूर्छा येते. किंवा नुसत्या त्याच्या स्पर्शानेही ते मरतात असे म्हणतात.)
अत्तर परिमल, नाना द्रव्ये चंदनलेप सुखावह ते
कमनीयचि त्या ललना सुंद मना मानुनी खरी सुखे
रमून जाशिल उपभोगात घात तुझा लिहिलाचि असे
चाफा असला सुंदर गंधि  मूर्च्छा भ्रमरासी येते ।। 4.1

मना- मधुकरा फुका फिरसि का  निरस अशा ह्या संसारी
मरुभूमी ही इथे न मधु रे मकरंदाची आस धरी
लक्ष्मीनरसिंहाच्या पाव पदकमलांची कास धरी
अनुपम सुख-मधु मिळेल तुजला तृप्त करे जो जन्मभरी ।। 4.2

Image result for लक्ष्मीनृसिंह pictures

तव हितमेकं वचनं वक्ष्ये शृणु सुखकामो यदि सततं
स्वप्ने दृष्टं सकलं हि मृषा जाग्रति च स्मर तद्वदिति ।
चेतोभृङ्ग भ्रमसि वृथा भवमरुभूमौ विरसायां
भज भज लक्ष्मीनरसिंहानघ-पद-सरसिज-मकरन्दम् ।। 5

मना मधुकरा ऐकुन घे रे बोल हिताचे दोन तुझ्या
जरी निरंतर सौख्य मिळावे असे वाटते सतत तुला
जागे होता जसे संपते स्वप्नांचे ते राज्य वृथा
तसे समज रे सुख वैभव हे स्वप्न तुझे रे हो जागा ।। 5.1

मना- मधुकरा फुका फिरसि का  निरस अशा ह्या संसारी
मरुभूमी ही इथे न मधु रे मकरंदाची आस धरी
लक्ष्मीनरसिंहाच्या पाव पदकमलांची कास धरी
अनुपम सुख-मधु मिळेल तुजला तृप्त करे जो जन्मभरी ।। 5.2

प्रवीण-जाया अरुंधतीने रत्ने पाच अलौकिक ही
मराठमोळ्या कनककोंदणी जडवुन केला हार सही
रत्नहार हा असे अलौकिक  कंठी शोभे कुणासही

चोरुन नेता कुणी तयासी नगास नग तैसा राही
------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment