अन्नपूर्णाश्लोकत्रय


(वृत्त मालिनी, अक्षरे 15, गण न न म य य )

भगवति भवरोगात् पीडितं दुष्कृतोत्थात्
सुतदुहितृकलत्रोपद्रवेणानुयातम्।
विलसमृतदृष्ट्या वीक्ष विभ्रान्तचित्तं
सकलभुवनमतास्त्राहि मामों नमस्ते।।1

( ॐ अ,उ,म म्हणजेच ब्रह्मा, विष्णु आणि महेश स्वरूपी अन्नपूर्णा )

छळति मजसि कृत्ये दुष्ट केलीच जी मी
 भिववि भयद व्याधी दुःखदायी भवाची
भुण भुण करुनी हे आप्त पिच्छा न सोडी
 लव हि  सुचु न देती कामिनी, पुत्र, पुत्री।।1.1

कुठुन मग मिळे ती सौख्य, आनंद, शांती
त्रिभुवन जननी गे तूच तारून नेई
तवची सुखमयी ही दृष्टि गे अमृताची
मजवरि नित राहो स्नेह वात्सल्यतेची।।1.2

भगवति असशी तू पूर्ण ॐ काररूपी
हरि, हर असशी तू , तूच ब्रह्मा अनादि
पदकमल तुझे हे वंदितो भक्तिभावे
मुखि स्तवन करी मी ‘ॐ नमो ’ अन्नपूर्णे।।1.3

(वृत्त इंद्रवज्रा, अक्षरे- 11, गण त त ज ग ग)

माहेश्वरीमाश्रितकल्पवल्ली-
महंभवोच्छेदकरीं भवानीम्।
क्षुधार्तजायातनयाद्युपेत-
स्त्वामन्नपूर्णे शरणं प्रपद्ये।।2

(भव शंकर/कल्याण; भवानी- शंकर पत्नी पार्वती/कल्याण करणारी)

महेश्वराची सुकुमार पत्नी
असे अधिष्ठात्रि तु गे शिवाची
शंभूवरी माय विसावलेली
शोभे जणू सुंदर कल्पवल्ली।।2.1

इच्छा मनीच्या पुरवी त्वरेनी
नाशी अहंभाव सदा शिवानी
उत्कर्ष, कल्याण, समृद्धिदात्री
कल्याणकारी असशी भवानी।।2.2

पत्नी मुले मी परिवार माझा
क्षुधार्त आलो चरणी तुझ्या या
दावी दया ह्या शरणागताला
माते सदापूर्ण चि अन्नपूर्णा।।2.3


दारिद्य्रदावानलदह्यमानं
पाह्यन्नपूर्णे गिरिराजकन्ये
कृपाम्बुधौ मज्जय मां त्वदीये
त्वत्पादपद्मार्पितचित्तवृत्तिम्।।3

 दारिद्य्र पीडा वणवाच मोठा
जाळून टाकी मम जीविताशा
धावून ये माय करी सहाय्या
तू गे दयाळू गिरिराजकन्या।।3.1

तुझ्या कृपेच्या सुखसागरी या
ठेवी मला गे जननी  निमग्ना
पद्मासमा कोमल पावली या
अनन्य राहो मम चित्त आता।।3.2


इत्यन्नपूर्णास्तुतिरत्नमेतत्
श्लोकत्रयं य पठतीह भक्त्या।
तस्मै ददात्यन्न समृद्धिमम्बा
श्रियं च विद्यां च यशश्च मुक्तिम् ।।4

रत्नाप्रमाणे चि अमूल्य आहे
हे स्तोत्र माता जगदंबिकेचे
जो ची म्हणे हे अनन्य भावे
त्यालाच विद्या यश मुक्ति लाभे।।4.1

त्यासी कमी ना धन धान्य यांची
तया समृद्धी जननी च देई।।4.2

इति शंकराचार्य विरचितं अन्नपूर्णा स्तोत्रं संपूर्णम्।

असे हे जगद्गुरू शंकराचार्य यांनी केलेले स्तोत्र पूर्ण झाले.
-------------------------------------------

(खर नाम संवत्सर 1933, जेष्ठ कृष्ण योगिनी एकादशी/27 जून 2011)




No comments:

Post a Comment