जिह्वा प्रार्थना


(वृत्त- आर्या , मात्रा 57)

मत्प्रियसखि मज्जिह्वे मय्यनुकम्पां कुरुष्व नौमि त्वाम्।
अन्यापवादरहिता भज सततमों नमः शिवायेति।।1

माझ्या प्रिय सखि जिह्वे! करणे अनुकंपा मजवर तू गे
जोडुन कर मी विनवी। परनिंदा सोडुनी तू दे।।1.1

शरण शरण तव पायी । मम ऐक ऐक गे माझे सखये
अविरत जपत रहा तू । अमृतकण ॐ नमो शिव हे।।1.2



वाणीगुणानुनिलये त्वां वन्दे मा कुरुष्व परनिन्दाम्।
त्यज सकललोकवार्तां भज सततमों नम शिवायेति।।2

आश्रय तूचि गुणांसी। माधुर्य, ओज, सत्य, प्रसादासी
सोड सोड  निंदेसी। तुज शपथ असे सखे माझी ।।2.1

चर्चा सकल जगाची । कुजबुज, अफवा, तर्क, कुतर्कासी
मैत्रिणि रसने सोडी । जपत रहा ॐ नमो शिव हे।।2.2



कट्वम्ललवणतिक्तस्वादुकषायादिसर्वरसवाञ्छाम्।
जिह्वे विहाय भक्त्या । भज सततमों नम शिवायेति।।3

माहित आहे मजसी । तुज षड्रस पक्वांन्नांची गोडी
तू तिखट, मधुर,खारे। आंबट ,तुरट,कटु रस-लोभी।।3.1

रसने! शिवनामाचे। माधुर्य आगळे सर्वांहूनी
प्रेमे सेवी नित ते । अमृतकण ॐ नमो शिव हे।।3.2



रसने रचितोयमञ्जलिस्ते परनिन्दापरुषैरलं वचोभिः।
दुरितापहं नमः शिवायेत्यमुमादिप्रणवं भजस्व मत्रम् ।।4

जोडुनि कर तुज रसने। फिरुन फिरुन तुजला मी विनवी गे
खोचक बोचक वाक्ये। उच्चारी ना कटू वचने।।4.1

तुरटीने जल निवळे । तैसे प्रणवसहित शिवनामाने
निर्मळ होते मन हे। जपत रहा ॐ नमो शिव हे।।4.2


----------------------

विजयनामसंवत्सरम् वैशाख शु. गंगासप्तमी, 17 एप्रिल 2013


श्री. पांडुंगशास्त्री गोस्वामी यांच्या सुबोध स्तोत्रसंग्रहात श्री आद्य शंकराचायर्य लिखित हे अतिशय सुंदर स्तोत्र आहे. ह्या  स्तोत्रातील पाच पैकी चारच श्लोक उपलब्ध आहेत. कोणाला पाचवा श्लोक उपलब्ध असल्यास तो आवश्य कळवावा.



1 comment: