मणिकर्णिकाष्टकम्


(
वृत्तशादूलविक्रीडित, अक्षरे -19, गण- , यति- 12,7)

त्वत्तीरे मणिकर्णिके हरिहरौ सायुज्यमुक्तिप्रदौ
वादं तौ कुरुतः परस्परमुभौ जन्तोः प्रयाणोत्सवे।
मद्रूपो मनुजोऽयमस्तु हरिणा प्रोक्तः शिवःस्तत्क्षणा-
त्तन्मध्याभृगुलाञ्छनो गरुडगः पीताम्बरो निर्गतः॥1

हे गंगे मणिकर्णिके तव तिरी येताचि मृत्यू कुणा
देती श्रीपति पार्वतीपति तया सायुज्य मुक्ती सदा
राहे शंभु हरी उपस्थित तिथे प्राणप्रयाणोत्सवा
त्यावेळी हरिसी वदे हर असे `मद्रूप होवोचि हा'1.1

जीवातूनचि तत्क्षणी प्रकटली विष्णू छवी साजिरी
बैसोनी गरुडावरीच सहजी पीतांबरा लेवुनी
छातीशी भृगुपादचिह्न मिरवी अत्यंत प्रेमादरे
जीवा येत असे हरी-हरपणा माते तुझ्याची जले॥1.2

इन्द्राद्यास्त्रिदशाः पतन्ति नियतं भोगक्षये ते पुन-
र्जायन्ते मनुजास्ततोऽपि पशवः कीटाः पतङ्गादयः।
ये मातर्मणिकर्णिके तव जले मज्जन्ति निष्कल्मषाः
सायुज्येऽपि किरीटकौस्तुभधरा नारायणाःस्युर्नराः॥2

जाता पुण्य लया अधःपतनही देवादिकांचे घडे
घेती जन्म धरेवरी पुनरपी होती पशू वा किडे
हे माते मणिकर्णिके परि तुझ्या स्पर्शे पुरी पातके
जावोनी विलयांस त्यांस मिळते सायुज्य मुक्ती इथे॥2.1

कंठी कौस्तुभ शोभतो मुकुट त्या माथ्यावरी कांचनी
तो नारायण होतसे पुनरपी ऐसी तुझी थोरवी॥2.2


काशी धन्यतमा विमुक्तिनगरी सालंकृता गङ्गया
तत्रेयं मणिकर्णिका सुखकरी मुक्तिर्हि तत्किंकरी।
स्वर्लोकस्तुलितः सहैव विबुधैः काश्या समं ब्रह्मणा
काशी क्षोणितले स्थिता गुरुतरा स्वर्गो लघुः खं गतः॥3

काशी धन्य असे नरांस मिळती मुक्तीहि चारी इथे
काशी-भूषण-जाह्नवी उजळवी काशीपुरी क्षेत्र हे
त्यामध्ये मणिकर्णिका सुखकरी मुक्तीहि दासी बने
जोडूनी कर नम्र होऊन वदे माते करू काय गे॥3.1

काशीची करण्यास योग्य तुलना देवादि स्वर्गासवे
ब्रह्म्याने तिज तोलता, झरझरा काशी भुईसी भिडे
स्वर्गाचे बहु पारडेचि हलके जाई नभाच्याकडे
ऐसा हा गरिमाचि श्रेष्ठ जगती काशीपुरीचा असे॥3.2


गङ्गातीरमनुत्तमं हि सकलं तत्रापि काश्युत्तमा
तस्यां सा मणिकर्णिकोत्तमतमा यत्रेश्वरो मुक्तिदः।
देवानामपि दुर्लभं स्थलमिदं पापौघनाशक्षमं
पूर्वोपार्जितपुण्यपुञ्जगमकं पुण्यैर्जनैः प्राप्यते॥4

गंगा तीर सुदीर्घ सुंदर असे त्याच्यात काशी खुले
तेथेही मणिकर्णिका अनुपमा विश्वेश राहे जिथे
तो योगीश्वर देतसे सकलची जीवांस मुक्ती इथे
सांगे `तारकमंत्र' त्याचि मनुजा अज्ञान दूरी करे॥4.1

आहे स्थानचि हे अलौकिक महा थारा पापा जरा
पापांचे जळतीच पर्वत इथे ऐसी असे योग्यता
आहे हे बहु स्थान दुर्लभ अती देवांसही दुर्लभ
लाभाया गतजन्मिचे फळतसे ते पूर्वपुण्यामृत॥4.2

(ज्ञानाशिवाय मोक्ष नाही तरीही काशीस मरण आल्यास मुक्ती मिळते. ही दोन विधाने जरी पूर्ण विरुद्ध वाटली तरी काशीस मरण पावणार्या जीवाच्या कानात स्वतः विश्वेश्वर `श्रीराम तारक मंत्राचा' उपदेश करतात. ज्यामुळे त्याला आत्मसाक्षात्कार घडून ज्ञान प्राप्त होते.)


दुःखाम्भोधिगतो हि जन्तुनिवहस्तेषां कथं निष्कृतिः
ज्ञात्वा तद्धि विरिञ्चिना विरचिता वाराणसी शर्मदा।
लोकाः स्वर्गमुखास्ततोऽपि लघवो भोगान्तपातप्रदाः
काशी मुक्तिपुरी सदा शिवकरी धर्मार्थमोक्षप्रदा॥5

शर्म आनंद,  शर्मदा आनंद देणारी

              पाहोनी बुडतीच जीव सगळे दुःखाचिया सागरी             
धात्याने अति सौख्यपूर्ण नगरी वाराणसी निर्मिली
जाता पुण्य लया अधःपतन हे होतेचि स्वर्गातुनी
नेई उद्धरुनी जनांस अवघ्या वारणसी एक ती॥5.1

देई धर्मचि अर्थ काम मनुजा मुक्तीहि वाराणसी
मोक्षाचे निजधाम पावन असे कल्याणकारी पुरी॥5.2


एको वेणुधरो धराधरधरः श्रीवत्सभूषाधरः
योऽप्येकः किल शङ्करो विषधरो गङ्गाधरोमाधरः।
ये मातर्मणिकर्णिके तव जले मज्जन्ति ते मानवाः
रुद्रा वा हरयो भवन्ति बहवस्तेषां बहुत्वं कथम्॥6

माते एक असेचि वेणुधर तो श्रीवत्सधारी हरी
जोची एक करांगुलीवर धरे गोवर्धनाचा गिरी
आहे तो शिव एकटाच जगती कंठी विषासी धरी
राहे भागिरथी शिरीच जयिच्या अंकी उमा साजिरी।।6.1

माते हे मणिकर्णिके परि असे जादू जळी या तुझ्या
सारेची हर वा हरीच बनती या स्पर्शमात्रे तुझ्या
देसी माय बहुत्वची हरि हरा ऐसी तुझी थोरवी
दृष्टी जाय तिथे हरी-हर दिसे आहे कृपा ही तुझी॥6.2


त्वत्तीरे मरणं तु मङ्गलकरं देवैरपि श्लाघ्यते
शक्रस्तं मनुजं सहस्रनयनैद्रष्टुं सदा तत्परः।
आयान्तं सविता सहस्रकिरणैः प्रत्युद्गतो।भूत्सदा
पुण्यासौ वृषगोऽथवा गरुडगः किं मन्दिरं यास्यति॥7

मृत्यूही मणिकर्णिके तव तटी सौभाग्यदायी असे
ऐशा या मरणास स्तुत्य म्हणुनी वाखाणती देव हे
तो देवेन्द्र हजार नेत्र उघडे; उत्कंठतेने बघे
आहे कोणचि पुण्यवान नर तो मी पाहतो सत्वरे॥7.1

सामोरा सविताच ये पसरुनी त्याच्या हजारो भुजा
त्याच्या भव्यचि स्वागतास करण्या देण्यास आलिंगना
बैसोनी गरुडावरीच अथवा नंदीवरी तो नर
पोचे विष्णुपदी सुखेचि अथवा कैलास लाभे घर 7.2


मध्याह्ने मणिकर्णिकास्नपनजं पुण्यं वक्तुं क्षमः
स्वीयैरब्दशतैश्चतुर्मुखधरो वेदार्थदीक्षागुरुः।
योगाभ्यासबलेन चन्द्रशिखरस्तत्पुण्यपारं गत-
स्वत्तीरे प्रकरोति सप्तपुरुषं नारायणं वा शिवम्॥8

मध्याह्नी मणिकर्णिकेत करता ते स्नान पुण्यप्रद
त्याचे वर्णन शब्दबद्ध करण्या ब्रह्मा नसे सक्षम
योगाभ्यासबळे महेश तरुनी जाई तुझ्या पार गे
जाती सात पिढ्या तरून जन ते विष्णू शिवाच्या रुपे॥8

कृच्छैः कोटिशतैः स्वपापनिधनं यच्चाश्वमेधैः फलं
तत्सर्वं मणिकर्णिकास्नपनजे पुण्ये प्रविष्टं भवेत्।
स्नात्वा स्तोत्रमिदं नरः पठति चेत्संसारपाथोनिधिं
तीर्त्वा पल्वलवत्प्रयाति सदनं तेजोमयं ब्रह्मणः॥9

जी पापे शमण्या व्रते खडतरी आहेत कोट्यावधी
प्रायश्चित असे जयास बहुला सायास ज्या लागती
पापे ती मणिकर्णिकेत विरती एकाच स्नानामधे
लाभे पुण्यचि त्या नरास अवघे  त्या अश्वमेधादिचे॥9.1

चित्ती त्या मणिकर्णिकेस स्मरुनी सुस्नात होवोनीया
स्तोत्रासी म्हणताचि ब्रह्म स्वरुपी तो पोचतो सर्वदा
ओलांडूनचि जावयास डबके ना कष्टदायी जसे
तैसा तो भवसागरापलिकडे जाई सुखाने त्वरे 9.2

---------------------------------------

जय नाम संवत्सर, फाल्गुन शुद्ध (आमलकी) एकादशी, 1 मार्च 2015



No comments:

Post a Comment