।। श्रीगणेशध्यानम् ।।
Image result for lord ganesh images free download

(वृत्त - शार्दूलविक्रीडित, अक्षरे- 19, गण- सज , यति- 12,7)

खर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं लम्बोदरं सुन्दरं
प्रस्यन्दन्मदगन्धलुब्धमधुपव्यालोलगण्डस्थलम्।।
दन्ताघातविदारितारिरुधिरैः सिन्दूरशोभाकरं
वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम्।।1

मूर्ती ही तव रे लहान असुनी  चित्तास ती मोहवी
हे लंबोदर गोजिरा दिसतसे ह्या बाळशाने अती
आहे मोहक चेहरा गजमुखा अत्यंत हा साजिरा
तूची नाचवि सोंड ऊंच वरती, मागे, पुढे चंचला।।1

हे दानोदक पाझरे शिरि तुझ्या गंडस्थलातून रे
गंधाने भुलुनी तयावर करी गुंजारवा भृंग हे
दाताने करुनी प्रहार वधिले तू दुष्ट दैत्यांसही
त्यांच्या या रुधिरात ही निथळते काया तुझी सर्व ही।।2

सर्वांगी उटि शोभते गजमुखा ही शेंदुराची तुला
गौरी-शंकरनंदना गणपती हे वक्रतुंडा महा
भक्तांना वर, सिद्धि  देउन करी कल्याण लंबोदरा
ठेवीतो मम मस्तका गजमुखा ह्या पादपद्मी तुझ्या।।3


--------------------No comments:

Post a Comment