।। #श्रीगणेशध्यानम् ।।




Image result for lord ganesh images free download

(वृत्त - शार्दूलविक्रीडितअक्षरे- 19, गण स ज    यति- 12,7)

 

खर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं लम्बोदरं सुन्दरं

प्रस्यन्दन्मदगन्धलुब्धमधुपव्यालोलगण्डस्थलम्।।

दन्ताघातविदारितारिरुधिरैः सिन्दूरशोभाकरं

वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम्।।1

 

मूर्ती ही तव रे लहान असुनी  चित्तास ती मोहवी

हे लंबोदर गोजिरा दिसतसे ह्या बाळशाने अती

आहे मोहक चेहरा गजमुखा अत्यंत हा साजिरा

तूची नाचवि सोंड उंच वरतीमागेपुढे चंचला।।1

 

हे दानोदक पाझरे शिरि तुझ्या गंडस्थलातून रे

गंधाने भुलुनी तयावर करी गुंजारवा भृंग हे

दाताने करुनी प्रहार वधिले तू दुष्ट दैत्यांसही

त्यांच्या या रुधिरात ही निथळते काया तुझी सर्व ही।।2

 

सर्वांगी उटि शोभते गजमुखा ही शेंदुराची तुला

गौरी-शंकरनंदना गणपती हे वक्रतुंडा महा

भक्तांना वरसिद्धि  देउन करी कल्याण लंबोदरा

ठेवीतो मम मस्तका गजमुखा ह्या पादपद्मी तुझ्या।।3

 

--------------------

 

#Ganeshstotram
#MarathiBhavanuvad
#लेखणीअरुंधतीची-


।। #गणेशभुजङ्गस्तोत्रम् ।।


Image result for lord ganesh images free download

                   पहाटे जाग आल्यावर रोजच्या कामाला सुरवात होण्यापूर्वी त्या दिवसाच्या कामाचा आराखडा आपल्या मनात तयार होत असतो. मनात तयार होणार्‍या ह्या संकल्पानुसार मग कामाला सुरवात होते. हे संकल्प शुद्ध, कल्याणकारी असावेत, ते निर्विघ्नपणे पार पडावेत म्हणून पहाटे उठल्याबरोबर गणेशाचे स्मरण करावे.

         आचार्यांनी  कृपाकोमल अशा गणेशाचे सगुण रूप ह्या स्तोत्रात साकार केले आहे तसेच सातव्या आणि आठव्या श्लोकात त्याच्या निर्गुण रूपाचीही ओळख करून दिली आहे. 

(वृत्त- भुजंगप्रयात, अक्षरे-12, गण- )

रणत्क्षुद्रघण्टानिनादाभिरामं  चलत्ताण्डवोद्दण्डवत्पद्मतालम्।
लसत्तुन्दिलाङ्गोपरिव्यालहारं। गणाधीशमीशानसूनुं तमीडे।।1

(क्षुद्र छोटा/छोटी ; ईशान -शासक, स्वामी, मालक ; सूनुः - पुत्र ; तुंदिल  गुबगुबीत,बाळसेदार ;

व्याल  साप,नाग ; ईड्  स्तुती करणे)

करे नर्तना बाळ गौरी-शिवाचा  धरे पद्मतालावरी छान ठेका
निनादे ध्वनी छुन् छुनुन् पैजणांचा  मना मोहवी नाद हा मेखलेचा।।1.1
तनू गोजिरी बाळसेदार त्याची  चकाके भुजंगावली स्वर्ण जैसी
असे तात ज्याचे गणांचेच स्वामी  उमा-शंभु पुत्रास त्या वंदितो मी।।1.2


ध्वनिध्वंसवीणालयोल्लासिवक्त्रं। स्फुरच्छुण्डदण्डोल्लसद्बीजपूरम्।
गलद्दर्पसौगन्ध्यलोलालिमालं  गणाधीशमीशानसूनुं तमीडे।।2

लयीला धरोनी कुणी छेडितांना  जशी गोड झंकारते मुग्ध वीणा
प्रफुल्लीत तैशी तुझी भावमुद्रा  जिथे गोडवा पूर्ण ये प्रत्ययाला।।2.1

हले देखणी सोंड तालावरी ही  धरोनी फळा नाचवी अग्रभागी
सुगंधी मदस्राव गंडस्थलीचा  करे धुंद भृंगास आकर्षुनीया।।2.2

सदा झुंडिने भृंग हे गुंजनासी करीती जयाच्याच गंडस्थलांगी
अशा लाडक्या शंभुबाळा तुला बा। असो नित्यनेमे नमस्कार माझा ।।2.3


प्रकाशज्जपारक्तरत्नप्रसूनप्रवालप्रभातारुणज्योतिरेकम्।
प्रलम्बोदरं वक्रतुण्डैकदन्तं  गणाधीशमीशानसूनुं तमीडे।।3

जसे पुष्प जास्वंदिचे हे फुले वा  प्रभा माणिकाचीच दे सौख्य नेत्रा
प्रभातीस ये केशरी सूर्य जैसा  तशी दिव्य कांती तुझी एकदंता।।3.1

तुझे नाम हे गोड लंबोदरा बा  तुला आळवीतो सुखे वक्रतुंडा
उमा शंकराच्याच या लाडक्याला  मनापासुनी पूजितो मीच आता।।3.2


विचित्रस्फुरद्रत्नमालाकिरीटं  किरीटोल्लसच्चन्द्ररेखाविभूषम्।
विभूषैकभूषं भवध्वंसहेतुं  गणाधीशमीशानसूनुं तमीडे।।4

(विभूष – अलंकारादि वैभवरहित असलेले परम विरक्त भक्तजन ; भवध्वंसहेतुं – संसार दुःखाचा नाश करणारा)

गळा हार त्या दिव्य रत्नावलीचा  सुखावे तयाची प्रभा लोचनांना
शिरोभूषणे चित्तवेधी तुझी बा  तुझ्या कुंतला भूषवी चंद्रमा हा।।4.1

हृदी एकदंताविना आस ना ज्या । मुखी भालचंद्राविना नाम ज्यांच्या 
हव्यास ज्यांसी असे भूषणांचा  नसे वैभवाची मनी लालसा वा ।।

विराजे विरक्तांचिया कंठदेशी गणाधीश नामे महारत्नकंठा।। 
अशा लाडक्या शंभुबाळा पदी हा। नमस्कार माझा मनापासुनीया।।4.2


उदञ्चद्भुजावल्लरीदृश्यमूलोच्चलद्भ्रूलताविभ्रमभ्राजदक्षम् 
मरुत्सुन्दरीचामरैः सेव्यमानं। गणाधीशमीशानसूनुं तमीडे।।5

( भ्राज्-चमकणे;  भ्राज - देदिप्यमान, सात सूर्यांपैकी एक )


उभारे भुजा  कल्पवल्ली समा या  सदा भक्तवृंदास आशीश द्याया
तयाच्या मुळाशी सदा भ्रूलता या  अती चंचला भूषवीती मुखाला।।5.1

उभ्या अप्सरा घालण्यासीच वारा। करी घेऊनी हालवीतीच चौर्या
उमा शंकराच्याच या लाडक्याला  मनापासुनी पूजितो मीच आता।।5.2


स्फुरन्निष्ठुरालोलपिङ्गाक्षितारं  कृपाकोमलोदारलीलावतारम्।
कलाबिन्दुगं गीयते योगिवर्यैर्गणाधीशमीशानसूनुं तमीडे।।6

लोल - चंचल  पिङ्गाक्षितारम् – पिंगट रंगाची बुबुळे असलेला

तुझे न्यायनिष्ठूर हे नेत्र पिंगे। जरा तूचि विस्फारिता दुष्ट कापे
परी सज्जनांसी दयापूर्ण भासे  तुझी लोचने नीववी सज्जनाते।।6.1

अधिष्ठान ज्याचे मुलाधारचक्री। कला, नाद, बिंदू तुझे रूप हेची
असे तूच ओंकार योगी मुनींसी  उमा शंभुच्या लाडक्या वंदितो मी।।6.2

असे मूळ तू थोर वाग्वैभवाचे  अधिष्ठान अर्थास तू लाभलेले
असे शब्द तू , अर्थ ही एक तूची  तयाचा घडे नाद तो पूर्ण तूची।।6.3

असे वर्णमालेतला तू  कार  तयाच्यावरी बिंदु तो बीजमंत्र
तुझे रूप एकाक्षरी मंत्र गं हे  तुला वंदितो वंदितो मी तुला रे।।6.4



यमेकाक्षरं निर्मलं निर्विकल्पं  गुणातीतमानन्दमाकारशून्यम् 
परं पारमोङ्कारमाम्नायगर्भं  वदन्ति प्रगल्भं पुराणं तमीडे ।।7
(एकाक्षर -ओंकार; निर्विकल्प  भेदरहित  गुणातीत -  तिनही गुणांच्या पलीकडे ;  आम्नायगर्भम् -  वेदांच्या गर्भात असलेला / वेदांना आपल्या गर्भात ठेवणारा  पुराणं -  सर्वात जुना / पुराsपि नव एव – कितीही मागच्या कालात जाऊन पाहिले तरी नवाच दिसतो.)

नसे भेद ज्या जो असे निर्विकल्प  असे शुद्ध एकाक्षरी जे  स्वरूप
गुणातीत जो शुद्ध आनंदकंद  निराकार ओंकार तो श्रेष्ठ एक।। 7.1

तुझ्या पोटि सामावले वेद चारी। असे तूच सामावला वेदघोषी
तुझे रूप प्राचीन नाविन्यपूर्ण। तुला वंदितो मी सदा एकचित्त।। 7.2


चिदानन्दसान्द्राय शान्ताय तुभ्यं  नमो विश्वकर्त्रे  हर्त्रे  तुभ्यम् 
नमोSनन्तलीलाय कैवल्यभासे  नमो विश्वबीज प्रसीदेशसूनो।।8

(सान्द्र – संपृक्त, घन ;  चिदानन्दसान्द्र – आनंदघन )

असे तूचि चैतन्य,आनंदकंदा। तुझ्या मानसी काम-क्रोधा  जागा
करी विश्व उत्पन्न नेसी लयाला  असा विश्वकर्ताचि तू विश्वहर्ता।।8.1

अनंता तुझ्या सर्व लीला अगाधा। जगत्-कारणा, तेजसा, ब्रह्मरूपा
उमा शंभुच्या लाडक्या एकदंता। करी रे कृपा चिन्मया एकवेळा।।8.2



इमं सुस्तवं प्रातरुत्थाय भक्त्या  पठेद्यस्तु मर्त्यो लभेत्सर्वकामान् 
गणेशप्रसादेन सिध्यन्ति वाचो  गणेशे बिभौ दुर्लभं किं प्रसन्ने।।9

म्हणे गोड हे स्तोत्र जो सुप्रभाती  तयासी हवे ते मिळे सर्वकाही
गणेश-प्रसादे तयाचीच  वाणी  वदे ते घडे ही मिळे त्यास सिद्धी।।9.1

कृपाछत्र ज्याच्यावरी सुंदराचे  तया शक्य नाही असे काय आहे
तुझ्या पायि आलो प्रभो भक्तिभावे। उमाशंभु-पुत्रा तुला वंदितो रे।।9.2
------------------

#Ganeshstotram
#MarathiBhavanuvad
#लेखणीअरुंधतीची-